खुशखबर! आता एम्समध्ये होणार स्वदेशी लस COVAXIN ची सगळ्यात मोठी मानवी चाचणी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2020 11:48 AM2020-07-19T11:48:56+5:302020-07-19T11:59:33+5:30

CoronaVirus News & Latest Updates : पहिल्या टप्प्यात ३७५ लोकांवर परिक्षण करण्यात येणार आहे. यात एम्समधील १०० लोकांचा समावेश असेल.

CoronaVirus News : Coronavirus vaccine human trial in aiims delhi | खुशखबर! आता एम्समध्ये होणार स्वदेशी लस COVAXIN ची सगळ्यात मोठी मानवी चाचणी

खुशखबर! आता एम्समध्ये होणार स्वदेशी लस COVAXIN ची सगळ्यात मोठी मानवी चाचणी

Next

आता एम्सकडून कोविड 19 ची स्वदेशी लस कोवॅक्सिनच्या मानवी परिक्षणासाठी शनिवारी परवागनी देण्यात आली आहे. या मानवी चाचणीसाठी स्वच्छेने सहभागी होत असलेल्या स्वयंसेवकांना सामिल करून घेतलं जाणार आहे. कोवॅक्सिनच्या दुसऱ्या मानवी चाचणीसाठी आयसीएमआरने दिल्लीतील एम्ससोबतच १२ संस्थांची निवड केली आहे. पहिल्या टप्प्यात ३७५ लोकांवर परिक्षण करण्यात येणार आहे. यात एम्समधील १०० लोकांचा समावेश असेल.

एम्समधील सेंटर ऑफ कम्यूनिटी मेडीसिनचे प्रोफेसर डॉ. संजय राय यांनी दिलेल्या माहितीनुसार एम्सच्या समितीने कोवॅक्सिनचे मानवी परिक्षण सुरू करण्यासाठी परवानगी दिली आहे. या परिक्षणात निरोगी असलेल्या लोकांना सामिल करून घेतलं जाणार आहे. ज्यांना कोणताही आजार नाही आणि जे लोक १८ ते ५५ वयोगटातील आहेत अशा लोकांचा समावेश मानवी चाचणीसाठी करून घेतला जाणार आहे.

काही लोकांनी परिक्षणासाठी आधीच रजिस्ट्रेशन केले आहे. आता प्रत्येक व्यक्तीची तपासणी केल्यानंतर सोमवारी लसीच्या चाचणीला सुरूवात होईल. एम्सच्या वेबसाईटवर मानवी चाचणी संदर्भातील माहिती देण्यात आली आहे. कोवॅक्सिन ही हैदराबादमधील भारत बायोटेक आणि आयसीएमआरने मिळून विकसित केली आहे. डीसीजीआईनेही या मानवी परिक्षणास परवानगी दिली आहे.

भारत बायोटेकने दिलेल्या माहितीनुसार ३७५ स्वयंसेवकांवर मानवी चाचणी केली जाणार आहे. हे परिक्षण तीन टप्प्यात असेल. एम्ससह १२ संस्थांचा या मानवी परिक्षणात समावेश आहे. पटना एम्समधील १० स्वयंसेवकांनी ही लस देण्यात आली आहे. आत्तापर्यंत या लसीचे कोणतेही साईड इफेक्ट्स दिसून आलेले नाहीत. यामुळे वैज्ञानिकांमध्ये उत्साहाचं वातावरण पसरलेलं आहे. एम्स पटनानंतर पीजीआय रुग्णालय रोहतक मधील ३ रुग्णांना लस देण्यात आली होती. याबाबत हरीयाणाच्या आरोग्य मंत्रालयाने  माहिती दिला आहे. सगळयात मोठं मानवी परिक्षण दिल्लीतील एम्समध्ये होणार आहे. 

या लसीला BBV152 COVID vaccine हे नाव देण्यात आलं आहे. या स्वदेशी लसीचे प्राण्यांवरील परिक्षण सफल झाल्यानंतर मानवी चाचणीसाठी CDSCO कडून परवागनी मिळाली. विविध राज्यांमधल्या १२ हॉस्पिटल्समध्ये या लसीची चाचणी केली जाते आहे. 

ज्या व्यक्तीला भेटलात तीच व्यक्ती कोरोना पॉझिटीव्ह आल्यास; संक्रमणापासून कसा कराल बचाव?

Coronavirus : ६ प्रकारच्या कोरोना व्हायरस आजाराची माहिती आली समोर, वाचा कोणता किती घातक?

Web Title: CoronaVirus News : Coronavirus vaccine human trial in aiims delhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.