हिवाळ्यात कोरोनाचं रौद्र रुप दिसणार; या देशात ८५ हजार मृत्यू होणार, सरकारी रिपोर्टमधून खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2020 01:22 PM2020-08-30T13:22:33+5:302020-08-30T13:34:20+5:30

CoronaVirus News & Latest Updates : .  देशातील प्रत्येकाला माहामारीशी लढण्यासाठी तयार करणं हे  या रिपोर्टमागचं उद्दीष्ट आहे. वेगवेगळ्या प्रदेशात व्हायरसच्या प्रसाराचं प्रमाण वेगळं असू शकतं.

CoronaVirus News : Coronavirus winter worst case scenario 85000 deaths | हिवाळ्यात कोरोनाचं रौद्र रुप दिसणार; या देशात ८५ हजार मृत्यू होणार, सरकारी रिपोर्टमधून खुलासा

हिवाळ्यात कोरोनाचं रौद्र रुप दिसणार; या देशात ८५ हजार मृत्यू होणार, सरकारी रिपोर्टमधून खुलासा

Next

(Image credit _ Swimswam)

हिवाळ्यात कोरोना व्हायरस रौद्ररुप दाखवू शकतो अशी शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे. ब्रिटन सरकारच्या एका  कागदपत्राद्वारे मिळालेल्या माहितीनुसार कोरोना विषाणूंचा उद्रेक झाल्यास ब्रिटनमध्ये ८५ हजार लोकांचा जीव जाण्याची शक्यता आहे. ब्रिटनमध्ये कोरोनामुळे आतापर्यंत ४१ हजार ४८६ लोकांचा मृत्यू झाला आहे.  ब्रिटन सरकारच्या साइंटिफिक एडवाइजरी ग्रुप फॉर इमरजेंसीज (SAGE) ने आपल्या रिपोर्टमध्ये  हिवाळ्यात कोरोनामुळे उद्भवू शकणाऱ्या स्थितींबाबत अभ्यास केला आहे.  

mirror.co.uk च्या रिपोर्टनुसार (SAGE) च्या मते ब्रिटन सरकारला पुन्हा एकदा लॉकडाऊन करावं लागू शकतं. कोरोना विषाणूंचा प्रसार वाढत राहिला तर लॉकडाऊनशिवाय  कोणताही पर्याय उरणार नाही.  (SAGE) सेजच्या रिपोर्टनुसार शाळा बंद ठेवणं अनिवार्य ठरेल. देशातील प्रत्येकाला माहामारीशी लढण्यासाठी तयार करणं हे  या रिपोर्टमागचं उद्दीष्ट आहे. वेगवेगळ्या प्रदेशात व्हायरसच्या प्रसाराचं प्रमाण वेगळं असू शकतं.

ब्रिटनमध्ये आतापर्यंत कोरोना विषाणूंमुळे ४१ हजार ४८६ लोकांचा मृत्यू झाला आहे. माहामारीच्या काळात ६० हजारांपेक्षा जास्त मृत्यूंची नोंद झाली आहे.  सेजच्या रिपोर्टनुसार टेस्टिंग्स, क्वारंटाईन, आयसोलेशन केल्यास कोरोना रुग्णांची आकडेवारी ४० टक्क्यांनी कमी होईल. रिपोर्टमध्ये दिलेल्या माहितीनुसार नोव्हेंबरमध्ये अधिक बंधनं घालावी लागतील. हा लॉकडाऊन मार्च २०२१ पर्यंत ठेवण्याची स्थिती उद्भवू शकते. कोरोनामुळे इंग्लंड आणि वेल्समध्ये २७ हजारांपेक्षा जास्त लोकांचा मृत्यू होण्याची शक्यता आहे.

 हिवाळ्यात कोरोना हाहाकार माजवणार, WHOचा गंभीर इशारा

येत्या हिवाळ्यात कोरोना युरोपसह जगाच्या बर्‍याच भागात कहर माजवेल. या काळात रुग्णालयांमध्ये दाखल झालेल्यांची संख्या वाढेल आणि मृत्यूचे प्रमाणही वाढेल, असे जागतिक आरोग्य संघटने(डब्ल्यूएचओ)ने म्हटले आहे. युरोपमधील डब्ल्यूएचओचे प्रादेशिक संचालक हेनरी क्लुग म्हणाले, "हिवाळ्यामध्ये वृद्ध लोकांपेक्षा तरुण लोक या आजाराच्या विळख्यात मोठ्या प्रमाणात सापडतील. आम्हाला अनावश्यक भाकीते करायची नाहीत, पण निश्चितच अशी शक्यता आहे."

हेनरी क्लुग यांनी येत्या काही महिन्यांत तीन मुख्य कारणांवर लक्ष केंद्रित करण्यास सांगितले आहे. यामध्ये शाळा पुन्हा सुरू करणे, हिवाळा-थंडीचा हंगाम आणि हिवाळ्यातील वृद्धांचा अधिक मृत्यूदर, त्यामुळे संसर्ग प्राणघातक ठरण्याची शक्यता आहे. 

ते म्हणाले की, जगातील देशांनी त्यांच्या इशाऱ्यानुसार आतापासूनच तयारी करायला हवी. अमेरिकेत शाळा व महाविद्यालये सुरू झाल्यामुळे बर्‍याच ठिकाणी संसर्ग पसरण्याच्या घटना घडल्या आहेत. मिसिसिपीच्या एका शाळेत ४००० मुले आणि ६०० शिक्षकांना अलग ठेवण्यात आले होते. 

डब्ल्यूएचओने म्हटले आहे की, त्यांनी एक समिती स्थापन केली आहे, जी आरोग्य आणीबाणी घोषित करण्याच्या नियमांमध्ये बदल करेल. कोरोना साथीच्या नंतर डब्ल्यूएचओवर जगाला उशिरा माहिती देण्याचा आरोप आहे. ३० जानेवारीला डब्ल्यूएचओने कोरोनामुळे आरोग्य आणीबाणी जाहीर केली  होती. असा दावा केला जातो की, या काळात चीनमध्ये फक्त १०० प्रकरणे होती.  आता डब्ल्यूएचओने आपल्या नियमांचा आढावा घेण्यासाठी एक समिती गठीत केली आहे. नियमांमध्ये काही बदल केले पाहिजेत की नाही त्याचा विचार करण्यात येणार आहे.

हे पण वाचा-

खुशखबर! अमेरिका, ब्रिटनची कोरोना लस २०२० च्या अखेरीस येणार, तज्ज्ञांचा दावा

वाढत्या कोरोनाच्या प्रसारात तुम्हालाही सर्दी, खोकला होण्याची भीती वाटते? 'अशी' घ्या काळजी 

Web Title: CoronaVirus News : Coronavirus winter worst case scenario 85000 deaths

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.