CoronaVirus News : केंद्रानं सांगितली भारतातील वाढत्या रुग्णसंख्येमागची कारणं; या ३ उपायांनी कोरोनापासून होणार बचाव
By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2021 02:21 PM2021-04-06T14:21:53+5:302021-04-06T14:38:12+5:30
CoronaVirus News : भारतात कोरोना संक्रमण वाढण्याबाबत केंद्र सरकारकडून स्पष्टीकरण देण्यात आलं आहे.
भारतात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांमध्ये झपाट्यानं वाढ झालेली पाहायला मिळत आहे. रोज नवीन हादरवणारी आकडेवारी समोर येताना दिसत आहे. अमेरिका, ब्राझीलसारखे देश कोरोनापुढे हतबल झाले आहे. जगभरातील कोरोनाग्रस्तांची संख्या ही 13 कोटींवर गेली आहे. तर लाखो लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर दुसरीकडे देशामध्ये कोरोनाचा धोका दिवसेंदिवस वाढत असून, रुग्णांची संख्यादेखील वाढतेच आहे. देशातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येने तब्बल एक कोटीचा टप्पा पार केला आहे.
कोरोनामुळे देशातील स्थिती चिंताजनक आहे. यावर मात करण्यासाठी देशात लॉकडाऊन सुरू आहे. मात्र तरीही कोरोनाग्रस्तांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. भारतात कोरोना संक्रमण वाढण्याबाबत केंद्र सरकारकडून स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. देशातील वाढत्या कोरोना संक्रमणानंतर केंद्र सरकारनं बैठक केली होती. या बैठकीदरम्यान केंद्रानं सांगण्यात आलं होतं की, १० राज्यात कोरोनाचं संक्रमणाचा वेग वाढत आहे. लोकांचा निष्काळजीपणा संक्रमण वाढण्याचं कारण ठरत आहे.
मास्क न वापरणं
या बैठकीत केंद्रानं सांगितले की, देशात वेगवेगळ्या राज्यात कोरोनाचा प्रसार वाढण्याचं कारण मास्कचा उपयोग न करणं हे आहे. मास्कच्या वापराबाबत निष्काळजीपणा केल्यामुळे संक्रमणाच्या केसेसमध्ये झपाट्यानं वाढत आहे.
मास्कचा वापर योग्य पद्धतीनं न करणं
मास्कचा वापर ज्यावेळी योग्य पद्धतीनं केला जात नाही तेव्हा संसर्गाचा धोका वाढतो. जागतिक आरोग्य संघटनेच्या गाईडलाईन्सनुसार मास्क लावण्याआधी हात स्वच्छ धुवून घ्यायला हवेत. मास्क काढल्यानंतरही हात स्वच्छ धुवायला हवेत. डबल मास्क लावण्याचा प्रयत्न करायला हवा. सर्जिकल मास्कचा वापर करा. मास्क लावताना नाक, तोंड व्यवस्थित झाकलं जायला हवं. कोरोनातून रिकव्हर झालेल्यांना मोठा दिलासा; आता निश्चिंतपणे करता येईल अवयवदान
सोशल डिस्टेंसिंग न पाळणं
कोरोना व्हायरसपासून बचाव करण्यसाठी सोशल डिस्टेंसिंगचं पालन करणं महत्वाचं आहे. बाहेर वावरताना २ मीटरचं अंतर पाळायला हवं. अनावश्यक गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळा. पार्क किंवा मैदानात जाणं टाळणं सुरक्षित आहे. कारण मोकळ्या जागेत एखाद्या व्यक्तीच्या शिंकण्याने किंवा खोकण्यानं जास्तीत जास्त लोकांना संक्रमणाचा सामना करावा लागत आहे. समोर आला कोरोनाचा 'भारतीय स्ट्रेन'; महाराष्ट्रासाठी ठरतोय घातक; धोक्याचा इशारा देत तज्ज्ञ म्हणाले....