धोका वाढला! या कारणामुळे जिममध्ये वेगानं पसरू शकतो कोरोना; CDC च्या तज्ज्ञांचा धोक्याचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2021 12:09 PM2021-03-15T12:09:56+5:302021-03-15T13:24:37+5:30

CoronaVirus News & Latest Updates : व्यायाम करताना, व्यक्ती वेगवान श्वास घेतो, ज्याद्वारे विषाणू एका व्यक्तीकडून इतरांच्या शरीरात शिरतो. म

CoronaVirus News : Covid-19 spread easily in gym cdc guidelines to keep yourself | धोका वाढला! या कारणामुळे जिममध्ये वेगानं पसरू शकतो कोरोना; CDC च्या तज्ज्ञांचा धोक्याचा इशारा

धोका वाढला! या कारणामुळे जिममध्ये वेगानं पसरू शकतो कोरोना; CDC च्या तज्ज्ञांचा धोक्याचा इशारा

Next

एका वर्षभरापासून कोरोनाच्या माहामारीनं  कहर केला आहे.  जिम वर्कआऊट करत असलेले लोक लॉकडाऊनच्या काळात पूर्णपणे जीमपासून लांब होते. आता हळूहळू पुन्हा त्यांचे पाय जिमकडे वळाले आहेत. अनेकांना फीट राहण्याबरोबरच स्वतःला सुरक्षितही ठेवायचं आहे. पण जिममध्ये जाऊन व्यायाम करणं सगळ्यात जास्त जोखिमेचं ठरू शकतं. सीडीसीच्या एका नव्या रिपोर्टनुसार सोशल डिस्टेंसिंग आणि इतर सावधगिरी बाळगल्यानंतरही कोरोना संक्रमण पसरू  शकतं.

समोर आलेल्या माहितीनुसार ऐरोसोलिज्ड थेंब हवेत तीन तासांपर्यंत राहू शकतात. ज्यामुळे व्हायरस परसण्याचा धोका जास्त असतो. लोक एकत्र व्यायाम करतात. त्यामुळे मोठ्या प्रमाणात घाम येतो त्यामुळे  कोरोनाच्या प्रसाराला धोका वाढतो. वास्तविक, व्यायाम करताना, व्यक्ती वेगवान श्वास घेतो, ज्याद्वारे विषाणू एका व्यक्तीकडून इतरांच्या शरीरात शिरतो. मग त्या व्यक्तीला कोविड -१९ ची लक्षणे नसली तरीही तो इतरांनाही संक्रमित करू शकतो. अशा परिस्थितीत आता घरात राहून वर्कआउट्स करणे चांगले ठरेल.

जिममध्ये कसा पसरतो संसर्ग?

कोविडची लस असूनही, लोक जिममध्ये जाण्याबद्दल गोंधळतात. विशेषत: लोकांना सर्व काळजी न घेता जिममध्ये जाणे कसे धोकादायक आहे हे समजत नाही.  शिंका येणे, खोकताना किंवा बोलत असताना कोरोना संक्रमित व्यक्तीच्या श्वासाच्या थेंबाने संसर्ग पसरतो. वारंवार संक्रमित जिम उपकरणांना स्पर्श केल्यास, सोशल डिस्टेंसिगचं पालन न करणं, मास्कचा वापर न करणं या कारणांमुळे कोरोनाचा धोका वाढतो.

मास्क न लावणं सगळ्यात मोठी जोखिम

सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशनने हवाई आणि शिकागोच्या सायकलिंग क्लासेस आणि फिटनेस स्टुडिओमधील घटना सांगितल्या आहेत. येथे लोक फिटनेस स्टुडिओ आणि सायकलिंग वर्गात मास्क नसलेले दिसले. सीडीसीने असा इशारा दिला आहे की जर त्यांनी मास्क लागू न केल्यास कोविड -१९ च्या उद्रेकासाठी लोक नवीन हॉटस्पॉट्स बनू शकतात. 

जीमला न  जाता कसं फीट राहायचं

घरच्याघरी सोलो वर्कआऊट करणं सोपा  पर्याय आहे. 

त्यासाठी तुम्ही जंपिंग जॅक,  धावणे, चालणे असे व्यायाम करू शकता.

आपण सायकलिंग, योग, ध्यान या  व्यायाम प्रकारांचा अवलंब करू शकता.

अशी घ्या काळजी

१) जीममधील उपकरणं वापरण्यापूर्वी साफ करून घ्या.

२) जिममध्ये वापरलेले कपडे टाळा. शक्य असल्यास स्वच्छ टॉवेल घेऊन जा.

३) गर्दी कमी असल्यास जिमला व्यायामासाठी जाऊ शकता. व्यायामादरम्यान सोशल डिस्टेंसिंग पाळा. 

४) एसी नसलेल्या जीमची निवड करा

५) जिममधील पाणी पिण्याची भांडी वापरू नये. आपण आपली बाटली सोबत घेतल्यास योग्य ठरेल. Healthy Breakfast Ideas : कमी कॅलरीजसह पौष्टीक नाष्ता करायचा असेल तर हे ५ पर्याय ठरतील बेस्ट ऑप्शन; फिट राहण्याचा सोपा फंडा

६) जिममध्ये व्यायाम करताना, जंतुनाशक स्प्रे किंवा सॅनिटायझरसह जिमच्या इतर पृष्ठभाग स्वच्छ करा. CoronaVirus News : धोका वाढला! शरीरात १२ आठवडे पडून राहतोय कोरोना; तज्ज्ञांनी सांगितली लॉन्ड कोविडची लक्षणं.....

Web Title: CoronaVirus News : Covid-19 spread easily in gym cdc guidelines to keep yourself

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.