दिलासादायक! कोरोना लसीबाबत WHO च्या प्रमुखांची मोठी घोषणा; तज्ज्ञ म्हणाले की.....

By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2020 04:35 PM2020-10-07T16:35:46+5:302020-10-07T16:52:26+5:30

CoronaVirus News & Latest Updates : जागतिक आरोग्य संघटनेनं सगळ्या नेत्यांना लसीचे समान वितरण करण्यासाठी आवाहन केलं आहे. 

CoronaVirus News : Covid-19 vaccine may be ready by year end says who chief | दिलासादायक! कोरोना लसीबाबत WHO च्या प्रमुखांची मोठी घोषणा; तज्ज्ञ म्हणाले की.....

दिलासादायक! कोरोना लसीबाबत WHO च्या प्रमुखांची मोठी घोषणा; तज्ज्ञ म्हणाले की.....

Next

जगभरात कोरोना व्हायरसच्या लसीच्या चाचण्या सुरू आहेत. या दरम्यान कोरोनाच्या लसीबाबत जागतिक आरोग्य  संघटनेच्या तज्ज्ञांनी एक सकारात्मक माहिती दिली आहे. जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख एडनॉम गेब्रियेसस यांनी सांगितले की, एक सुरक्षित आणि परिणामकारक लस या वर्षाच्या शेवटापर्यंत येऊ शकते. यासोबतच जागतिक आरोग्य संघटनेनं सगळ्या नेत्यांना लसीचे समान वितरण करण्यासाठी आवाहन केलं आहे. 

जागतिक आरोग्य संघटनेत्या कार्यकारी बोर्डाच्या बैठकीत टेड्रोस यांनी सांगितले की, ''सध्याच्या माहामारीत आपल्याला लसीची आवश्यकता असून लवकरात लवकर म्हणजेच या वर्षाच्या शेवटी कोरोनाची लस उपलब्ध होऊ शकते. त्यासाठी एकजूटीने राहून व्हायरशी लढण्यासाठी पुरेपूर उर्जेचा वापर करायला हवा.'' जागतिक आरोग्य संघटनेच्या तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार सध्या ग्लोबन लस फॅसिलीटीच्या ९ प्रायोगिक लसी या  निर्मिती प्रक्रियेत आहेत. लसीचे समान  वितरण करण्यासाठी प्रत्येक देशातील राजकिय नेत्यांशी चर्चा केली जाणार आहे. या माध्यामातून  १६८ देश जागतिक आरोग्य संघटनेच्या कोवॅक्समध्ये सहभागी झाले आहेत.  चीन, अमेरिका आणि रशिया या देशांचा यात सहभाग नाही. 

GAVI लस कराराअंतर्गत ९२ कमी, मध्यम आणि जास्त लोकसंख्या असलेल्या देशांना लसीसाठी मंजूरी देण्यात आली आहे. युरोपच्या ड्रग रेग्यूलगेटरी आणि फायजर इंक तसंच बायोएनटेकने अलिकडे आपल्या प्रायोगिक लसीच्या परिक्षाला सुरूवात केली आहे. याद्वारे  चाचणीदरम्यान लसीचे परिणाम कसे दिसून आले हे समजून घेण्यसाठी वैद्यकिय कंपन्यांना मदत होईल. 

विश्व स्वास्थ्य संगठन ने दी अच्छी खबर

जगातील प्रत्येक १० व्या व्यक्तीला कोरोनाची शक्यता

जागतिक आरोग्य संघटनेनं सांगितले  होते की, ''जगातील प्रत्येक 10 व्या व्यक्तीला कोरोना व्हायरसची लागण होऊ शकते. डब्ल्यूएचओच्या या दाव्यावर विश्वास ठेवल्यास, सध्या जगातील कोरोना रुग्णांची संख्या पॉझिटिव्ह आढळलेल्या एकूण रुग्णांपेक्षा 20 पट जास्त असू शकते. भविष्यात कोरोनाची परिस्थिती आणखी बिकट होईल,'' अशी भीती डब्ल्यूएचओने व्यक्त केली होती. खुशखबर! आता Reliance तयार करणार कोरोनाची लस; जाणून घ्या कोरोना लसीचे अपडेट्स  

डब्ल्यूएचओच्या आपातकालीन कार्यक्रमांचे प्रमुख डॉ. मायकेल रियान म्हणाले होते की, "ही आकडेवारी गावांपासून शहरापर्यंत वेगवेगळी असू शकते. वेगवेगळ्या वयोगटातील असू शकतात. परंतु याचा स्पष्ट अर्थ असा आहे की, जगातील बहुसंख्य लोकसंख्या कोरोनाच्या धोक्यात आली आहे." कोरोना संक्रमणासंदर्भात आयोजित 34 सदस्यांच्या कार्यकारी मंडळाच्या बैठकीत डॉ. मायकेल रियान म्हणाले की, "महामारीच्या रोगाचा प्रसार अजूनही सुरू आहे. मात्र, संक्रमण रोखण्याचे आणि जीव वाचविण्याचे मार्ग देखील उपलब्ध आहेत." आयुष-64 औषधानं होईल कोरोना संक्रमणापासून बचाव; आयुष मंत्रालयानं दिल्या 'या' गाईडलाईन्स

Web Title: CoronaVirus News : Covid-19 vaccine may be ready by year end says who chief

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.