CoronaVirus News : कोरोना उपचारासाठी 'फेव्हिपिरावीर' अनेक प्रकारे फायदेशीर, कंपनीचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2020 07:22 PM2020-11-23T19:22:13+5:302020-11-23T19:22:41+5:30
CoronaVirus News: कंपनी फेव्हिपिरावीरला फेबिफ्लू (Fabiflu) या ब्रँड नावाने विकते.
नवी दिल्ली : फार्मा कंपनी ग्लेनमार्क फार्मास्युटिकल्सने (Glenmark Pharma) असा दावा केला आहे की, कंपनीचे अँटी-व्हायरल औषध फेव्हिपिरावीर हे कोरोनावरील उपचारावर अनेक प्रकारे फायदेशीर आहे. या औषधाचा डोस जलद उपचारासाठी देखील उपयुक्त आहे.
कंपनीने सोमवारी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, नियंत्रित टप्प्यातील तीन क्लिनिकल चाचणांमध्ये हा निष्कर्ष समोर आला आहे. शेअर मार्केटला पाठवलेल्या सुचनेत कंपनीने म्हटले आहे की, चाचणीचे परिणाम इंटरनेशनल जर्नल ऑफ इन्फेक्शियस डिसिसीजमध्ये (आयजेआयडी) प्रकाशित करण्यात आले आहेत.
कंपनी फेव्हिपिरावीरला फेबिफ्लू (Fabiflu) या ब्रँड नावाने विकते. कंपनीने तिसऱ्या टप्प्यातील चाचणी १५० रुग्णांवर केली आहे. तसेच, ग्लेनमार्कने दावा केला की फेव्हिपिरावीर उपचारांत अनेक प्रकारे फायदेशीर आहे. हे जलद उपचारांसाठी मदत करते. ऑक्सिजन थेरपीची आवश्यकता देखील कमी करते.
याचबरोबर,"कोरोनाचा किरकोळ संसर्ग झालेल्या रुग्णांना उपचारादरम्यान फेव्हिपिरावीरचा डोस दिला गेला. त्यामुळए अशा कोरोना संक्रमित रूग्णांना रुग्णालयातून लवकर डिस्चार्ज देण्यात आले. या रूग्णांच्या क्लिनिकल उपचाराचा कालावधी अडीच दिवसांनी कमी झाला," असे कंपनीने म्हटले आहे.