चिंताजनक! दुसऱ्यांदा कोरोनाचं संक्रमण झाल्यास मृत्यूचा धोका कितपत?; तज्ज्ञ म्हणाले की...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2020 04:43 PM2020-08-26T16:43:41+5:302020-08-26T16:45:11+5:30

CoronaVirus News & Latest Updates : जवळपास ५ महिन्यांनी या व्यक्तीला पुन्हा कोरोनाचं संक्रमण झालं.

CoronaVirus News : First case of coronavirus reinfection explained 2 majot takeaways | चिंताजनक! दुसऱ्यांदा कोरोनाचं संक्रमण झाल्यास मृत्यूचा धोका कितपत?; तज्ज्ञ म्हणाले की...

चिंताजनक! दुसऱ्यांदा कोरोनाचं संक्रमण झाल्यास मृत्यूचा धोका कितपत?; तज्ज्ञ म्हणाले की...

Next

कोरोना व्हायरसच्या आतापर्यंत अनेक केसेस समोर आल्या आहेत.  ज्यात एकदा संक्रमण झाल्यानंतरही पुन्हा लोकांना कोरोनाचं संक्रमण झालं आहे. संशोधकांनी पहिल्यांदा संक्रमण झाल्यानंतर पुन्हा संक्रमित  झालेल्या रुग्णांबाबत एक रिपोर्ट जारी केला आहे.   क्लिनिकल इंफेक्शियस डिजीस नावाच्या जर्नलमध्ये हा अभ्यास  प्रकाशित करण्यात आला आहे. ही घटना हाँगकाँगमध्ये घडलीआहे. हाँगकाँगमधील एका ३० वर्षीय व्यक्तीला मार्च महिन्यात कोरोनाचं संक्रमण झाल्यामुळे रुग्णालयात भरती करण्यात आलं होतं. त्यानंतर  काही दिवसांनी रुग्णालयातून सोडण्यात आलं. 

जवळपास ५ महिन्यांनी या व्यक्तीला पुन्हा कोरोनाचं संक्रमण झालं. स्पेनवरून आल्यानंतर हाँगकाँग एअरपोर्टवर स्क्रिनिंग दरम्यान या व्यक्तीला कोरोना झाल्याचं निदर्शनास आलं. हाँगकाँगमध्ये या प्रकारची पहिलीच घटना दिसून आली आहे. संशोधकांनी दिलेल्या माहितीनुसार  या घटनेवरून महत्वपूर्ण बाबी समोर आल्या आहेत.

जसजशी कोरोना व्हायरसची माहामारी वाढत आहे तसतसं कोरोनाचे अधिक रुग्ण समोर येत आहेत. दुसरं म्हणजे दुसऱ्यांदा संक्रमित झाल्यानंतर रुग्णामध्ये हलकी लक्षणं दिसून येत आहेत. कारण पहिल्यांदा संक्रमण झाल्यानंतर काही प्रमाणात व्हायरसशी लढत असलेल्या एंटीबॉडीज तयार झालेल्या असतात. त्यामुळे लक्षणांची तीव्रता कमी असते.

7

संशोधकांच्या टीमला दिसून आलं की, SARS-CoV-2 वेगवेगळ्या स्टेन्सची संक्रमित झालेला आहे.  संक्रमित व्यक्तीच्या शरीरात व्हायरसचे आरएनए अनेक महिन्यांपर्यंत राहतात. अमेरिकेचे एमोरी वॅक्सिन सेंटरचे प्रोफेसर सिंथिया डेरडेन यांनी दिलेल्या माहितीनुसार जे लोक कोरोना माहामारीत लवकर संक्रमित झाले आहेत. त्यांना पुन्हा व्हायरसची लागण होऊ शकते. संक्रमण होण्याचा धोका वाढतो.  जर इम्यून रिस्पॉन्स म्हणजेच रोगप्रतिकारकशक्ती चांगली असेल तर पुन्हा संक्रमण झाल्यानंतरही त्यातून सुखरूप बाहेर पडता येऊ शकतं. 

कोरोनाच्या संकटाचा अनेक देश सामना करत आहेत. जगभरातील कोरोनाग्रस्तांची संख्या ही तब्बल दोन कोटींच्यावर गेली असून रुग्णांची एकूण संख्या 24,058,354 आहे. कोरोनामुळे आतापर्यंत आठ लाखांहून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. 823,510 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 16,608,018 जणांनी कोरोनावर मात केली आहे. देशातील एकूण कोरोनाग्रस्तांच्या संख्येने 31 लाखांचा टप्पा पार केला आहे. तर आतापर्यंत 55 हजारांहून अधिक लोकांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे.

हे पण वाचा-

खुशखबर! नाकाद्वारे दिल्या जाणाऱ्या लसीची चाचणी यशस्वी; कितपत सुरक्षित ठरणार? जाणून घ्या

देशातील ५ ते १७ वर्षीय मुलांना कोरोनाचा अधिक धोका; सर्वेक्षणात खुलासा

Web Title: CoronaVirus News : First case of coronavirus reinfection explained 2 majot takeaways

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.