एम्समध्ये कोवॅक्सिनच्या पहिल्या मानवी चाचणीला सुरूवात; ३० वर्षीय स्वयंसेवकाला दिला पहिला डोस

By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2020 01:31 PM2020-07-26T13:31:04+5:302020-07-26T13:46:43+5:30

CoronaVirus News : सुरूवातीच्या चाचण्यांचा रिपोर्ट  सकारात्मक आल्यानंतर एम्समध्ये १०० निरोगी लोकांचे लसीकरण केले जाणार आहे. 

CoronaVirus News : First dose of covaxin given to 30 year old volinteer in aiims | एम्समध्ये कोवॅक्सिनच्या पहिल्या मानवी चाचणीला सुरूवात; ३० वर्षीय स्वयंसेवकाला दिला पहिला डोस

एम्समध्ये कोवॅक्सिनच्या पहिल्या मानवी चाचणीला सुरूवात; ३० वर्षीय स्वयंसेवकाला दिला पहिला डोस

Next

कोरोना व्हायरसविरुद्धच्या लढ्यात अग्रेसर असलेल्या कोवॅक्सिन या लसीच्या मानवी चाचणीला २४ जुलैला सुरूवात झाली. दिल्लीतील ३० वर्ष वयोगटातील १९ लोकांना ही लस देण्यात आली आहे. पहिला डोस ०.५ मिली इंट्रामस्क्युसर इंजेक्शनचा दुपारी जवळपास १:३० वाजता देण्यात आलं होता. पहिले दोन तास त्यांना निरिक्षणाखाली ठेवण्यात आलं होतं. आता पुढील ७ दिवस  या स्वयंसेवकांना निरिक्षणाखाली ठेवलं जाणार आहे. त्यांचा चाचणी अहवाल आल्यानंतर आणखी काही स्वयंसेवकांना लस दिली जाणार आहे. सुरूवातीच्या चाचण्यांचा रिपोर्ट  सकारात्मक आल्यानंतर एम्समध्ये १०० निरोगी लोकांचे लसीकरण केले जाणार आहे. 

पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील परिक्षणासाठी आयसीएमआरकडून १२ संस्थांची निवड करण्यात आली आहे. त्यातील एम्स हे एक आहे. पहिल्या टप्प्यातील मानवी परिक्षणात ३७५ स्वयंसेवकांना सहभागी करून घेतलं जाणार आहे. त्यातील स्वयंसेवक १०० हे एम्समधील असतील. त्यानंतरच्या चाचणीसाठी ७५० लोकांना  सहभागी करून घेतलं जाणार आहे. एम्सचे प्रमुख डॉक्टर रणजदीप गुलेरिया यांनी दिलेल्या माहितीनुसार दुसऱ्या टप्प्यात १२ ते ६५ वयोगटातील लोकांचा समावेश असेल. चाचणीसाठी जवळपास १ हजार ८०० स्वयंसेवकांनी  नोंदणी केली होती. 

आईसीएमआर आणि नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ वायरोलॉजी (एनआईवी) च्या मदतीने हैदराबातमधील भारत बायोटेकने कोविड 19 ची लस विकसीत केली आहे. आत्तापर्यंत या लसीचे कोणतेही साईड इफेक्ट्स दिसून आलेले नाहीत. यामुळे वैज्ञानिकांमध्ये उत्साहाचं वातावरण पसरलेलं आहे. एम्स पटनानंतर पीजीआय रुग्णालय रोहतक मधील ३ रुग्णांना लस देण्यात आली होती. याबाबत हरीयाणाच्या आरोग्य मंत्रालयाने  माहिती दिली आहे. सगळयात मोठं मानवी परिक्षण दिल्लीतील एम्समध्ये होणार आहे.

या लसीला BBV152 COVID vaccine हे नाव देण्यात आलं आहे. या स्वदेशी लसीचे प्राण्यांवरील परिक्षण सफल झाल्यानंतर मानवी चाचणीसाठी CDSCO कडून परवागनी मिळाली. विविध राज्यांमधल्या १२ हॉस्पिटल्समध्ये या लसीची चाचणी केली जाणार आहे. 

कोरोनानंतर आता 'या' देशात नवीन संकट; ६०० लोकांना झाली आजाराची लागण

काळजी वाढली! कोरोना संक्रमणातून बाहेर आल्यानंतरही पाठ सोडणार नाहीत 'या' समस्या

Web Title: CoronaVirus News : First dose of covaxin given to 30 year old volinteer in aiims

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.