चिंता वाढली! कोरोनाच्या प्रसाराबाबत नवीन माहिती समोर; 'या' ५ Genes च्या लोकांना धोका जास्त

By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2020 10:51 AM2020-12-13T10:51:02+5:302020-12-13T10:59:17+5:30

CoronaVirus News & Latest Updates : पाच विशिष्ट प्रकारची जीन्स (Genes) असलेल्या व्यक्तींना कोरोनापासून सर्वांत जास्त धोका आहे, असा निष्कर्ष त्या संशोधनातून निघाला आहे.

CoronaVirus News : Five genes increase covid-19 patient dying risk | चिंता वाढली! कोरोनाच्या प्रसाराबाबत नवीन माहिती समोर; 'या' ५ Genes च्या लोकांना धोका जास्त

चिंता वाढली! कोरोनाच्या प्रसाराबाबत नवीन माहिती समोर; 'या' ५ Genes च्या लोकांना धोका जास्त

Next

(Image Credit Pixaby)

कोरोना व्हायरसच्या माहामारीने संपूर्ण जगभरात गेल्या १० ते ११ महिन्यांपासून कहर केला आहे. अजूनही  काही देशात रुग्णांची संख्या ही दिवसागणिक वाढत आहे. कोरोनाचा सामना करण्यासाठी उपाय शोधण्यासाठी संपूर्ण जगभरातील शास्त्रज्ञ प्रयत्न करत आहेत. दरम्यान कोरोनाच्या प्रसाराबाबत एक नवीन माहिती समोर आली आहे. ब्रिटनमधल्या एडिंबरा विद्यापीठातल्या संशोधनातून एक चिंताजनक बाब समोर आली आहे. पाच विशिष्ट प्रकारची जीन्स (Genes) असलेल्या व्यक्तींना कोरोनापासून सर्वांत जास्त धोका आहे, असा निष्कर्ष त्या संशोधनातून निघाला आहे. ‘डेली मेल’ या वृत्तसंस्थेच्या हवाल्याने हिंदी माध्यमांनी याबाबत माहिती दिली आहे.

TYK2, CCR2, OAS1, IFNAR2 आणि DPP9 अशी या जीन्सची नावं आहेत. या संशोधनासाठी शास्त्रज्ञांनी ब्रिटनमधल्या २०८  अतिदक्षता केंद्रामधल्या (ICU) २७०० कोरोना रुग्णांच्या डीएनएच्या माहितीचं विश्लेषण केलं. तसंच, या रुग्णांच्या माहितीची तुलना ब्रिटनमधल्या (Britain) आणखी एक लाख लोकांच्या माहितीसोबत केली गेली.  तज्ज्ञांनी  ज्या २७०० रुग्णांवर अभ्यास केला.

स्टडी है महत्वपूर्ण

त्यातील २२ टक्के लोकांचा मृत्यू झाला असून ७४ टक्के लोकांना श्वास  घेण्यासाठी त्रास झाला. अनेकांना व्हेंटिलेटरची आवश्यकता भासली. या संशोधकांनी ज्या २७०० रुग्णांचा अभ्यास केला, त्यापैकी २२ टक्के रुग्णांचा मृत्यू झाला, तर ७४ टक्के रुग्णांना श्वास घ्यायला त्रास होत होता. काहींना व्हेंटिलेटरची गरज भासली होती.

काळजी वाढली! समोर आलं कोरोना संक्रमणाचं नवं लक्षणं; संशोधनानंतर तज्ज्ञांचा दावा

शास्त्रज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, TYK2 आणि DPP9 ही जीन्स १९ क्रमांकाच्या गुणसूत्रावर आढळतात. IFNAR2 हे जीन २१ क्रमांकाच्या गुणसूत्रावर आढळतं, तर CCR2 जीन चौथ्या गुणसूत्रावर असतं. काही व्यक्तींना कोरोनाच्या संक्रमणामुळे गंभीर त्रास होतो तर काहींना कोरोनाची लागण झालेली असतानाही जास्त त्रास होत नाही. या  मागचं कारण कळण्यासाठी अधिक परिक्षण केलं जाईल असं तज्ज्ञांनी सांगितले आहे. 

हिवाळ्यात शिंका, सर्दीच्या समस्येने हैराण आहात; 'या' घरगुती उपायांनी सायनसची समस्या होईल दूर

कोरोना व्हायरसचा जास्त परिणाम होणारी जीन्स शोधल्यामुळे आता तज्ज्ञांना कोरोनावरील उपचारांसाठी औषध विकसित करण्यासाठीही मदत होणार आहे. सध्या अस्तित्वात असलेल्या औषधांचाही काही वेगळ्या पद्धतीने वापर करणं शक्य असल्यास त्याचीही चाचपणी करणं शक्य होणार आहे. व्हायरशी लढण्याची रोगप्रतिकारकशक्ती आणि फुफ्फुसांच्या वेदना या दोन गोष्टींचा संबंध जीन्सशी असल्याचे या संशोधनातून दिसून आलं.
 

Web Title: CoronaVirus News : Five genes increase covid-19 patient dying risk

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.