CoronaVirus News :कोरोनावरील उपचारांसाठी रेमडिसिव्हिर ठरेल गेमचेंजर

By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2020 02:54 AM2020-06-22T02:54:43+5:302020-06-22T02:54:54+5:30

CoronaVirus News :कोरोनावरील उपचारांत हे औषध गेम चेंजर ठरणार असल्याचा दावा या कंपनीने केला आहे.

CoronaVirus News :Gamedonger will be the remedy for the treatment of corona | CoronaVirus News :कोरोनावरील उपचारांसाठी रेमडिसिव्हिर ठरेल गेमचेंजर

CoronaVirus News :कोरोनावरील उपचारांसाठी रेमडिसिव्हिर ठरेल गेमचेंजर

Next

नवी दिल्ली : देशामध्ये कोरोना विषाणूच्या संसर्गावरील उपचारांत रेमडिसिव्हिर या औषधाचा वापर करण्यास केंद्र सरकारने परवानगी दिली आहे. हे औषध लवकरच उपलब्ध करून देणार असल्याचे हेटेरो या कंपनीने म्हटले आहे. कोरोनावरील उपचारांत हे औषध गेम चेंजर ठरणार असल्याचा दावा या कंपनीने केला आहे. कोरोना रुग्णांवरील उपचारांसाठी फेविपिराविर या औषधाची जेनेरिक आवृत्ती भारतात उपलब्ध करून देण्यास ग्लेनमार्क फार्मास्युटिकल्स या कंपनीला परवानगी देण्यात आली आहे. ग्लेनमार्कने फॅबिफ्लू या नावाने हे औषध बाजारात आणले आहे.
रेमडिसिव्हिर औषधासंदर्भात हेटेरो या उत्पादक कंपनीने म्हटले आहे की, कोरोना आजारामुळे प्रकृती गंभीर बनलेल्या रुग्णांना रेमडिसिव्हिर आता देता येईल. भारतातील कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यांच्यावरील उपचारांत रेमडिसिव्हिर सामील केल्याने हे रुग्ण लवकर बरे होण्यास मोठी मदत मिळणार आहे.
कोविफॉर हे औषध १०० मिलिग्रॅम इंजेक्शनमध्ये उपलब्ध होणार आहे. या औषधासाठी हेटेरो कंपनीने अमेरिकेच्या गिलियड सायन्सेस या कंपनीसोबत करार केला आहे. भारतामध्ये या औषधाचा पुरेसा साठा उपलब्ध करून देण्यात येईल असे या कंपनीतर्फे सांगण्यात आले.
>कोरोना विषाणूच्या संसर्गाची सौम्य लक्षणे असणाऱ्या रुग्णांवर फॅबिफ्लू औषधाचा चांगला परिणाम होत असल्याचे त्याबद्दलच्या चाचण्यांमध्ये दिसून आले आहे. हे औषधही देशभरात उपलब्ध करून देण्यासाठी उत्पादक कंपनी केंद्र सरकारशी चर्चा करत आहे. फॅबिफ्लूच्या प्रत्येक गोळीची किंमत १०३ रुपये असणार असल्याचेही सांगण्यात आले. कोरोनावर प्रतिबंधक लस तयार करण्यासाठी भारतासह अनेक देशांमध्ये प्रयत्न सुरू आहेत. जो देश ही प्रतिबंधक लस तयार करण्यात यश मिळवेल, त्याने ती लस जगभरातील सर्व कोरोनाग्रस्त रुग्णांना वाजवी किमतीत उपलब्ध करून द्यावी, अशीही मागणी झाली होती.

Web Title: CoronaVirus News :Gamedonger will be the remedy for the treatment of corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.