खुशखबर! मेड इन इंडिया लसीबाबत 'या' राज्यातून समोर आली दिलासादायक माहिती, जाणून घ्या
By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2020 11:30 AM2020-07-28T11:30:50+5:302020-07-28T11:39:50+5:30
CoronaVirus News & Latest Updates : आयसीएमआर आणि भारत बायोटेकने तयार केलेल्या कोवॅक्सिनची मानवी चाचणी विविध राज्यांमध्ये सुरू आहे.
कोरोनाच्या माहामारीविरुद्ध संपूर्ण देश लढत आहे. कोरोनाची लस कधी तयार होणार याबाबत संपूर्ण जगभरातील लोकांना प्रतिक्षा आहे. दरम्यान कोरोनाची मेड इन इंडीया लस म्हणजेच कोवॅक्सिनबाबत एक दिलासादायक माहिती ओरिसामधून समोर येत आहे. आयसीएमआर आणि भारत बायोटेकने तयार केलेल्या कोवॅक्सिनची मानवी चाचणी विविध राज्यांमध्ये सुरू आहे. विशेष म्हणजे मानवी चाचणी दरम्यान स्वयंसेवकांना लस दिल्यानंतर या लसीचे कोणतेही दुष्परिणाम दिसून आलेले नाहीत.
कोवॅक्सिनच्या लसीच्या चाचणीसाठी आयसीएमआरडून 12 केंद्रांची निवड करण्यात आली आहे. त्यात आयुर्विज्ञान संस्था, एसयुएम रुग्णालयात बीबीवी 152 कोविड 19 किंवा कोवॅक्सिनच्या लसीचे परिक्षण सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी 12 संस्थांची निवड करण्यात आली आहे. चाचणी प्रक्रियेचे प्रमुख डॉ. ई वेंकट राव यांनी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार भारत बायोटेकद्वारे विकसित करण्यात आलेली कोवॅक्सिन ही लस मानवी चाचणीसाठी स्वतःहून पुढाकार घेतलेल्या लोकांना देण्यात आली होती. लस दिल्यानंतर या स्वयंसेवकांना निरिक्षणाखाली ठेवण्यात आलं होतं. ज्यांना लस देण्यात आली होती. त्यांची प्रकृती सुरक्षित असल्याचे त्यांनी सांगितले.
पुढे त्यांनी सांगितले की, लसीच्या चाचणीसाठी आलेल्या स्वयंसेवकांना खूप मोठ्या प्रक्रियेतून जावं लागलं. भारताच्या डिसीजीआयकडून देण्यात आलेल्या नियमांचे पालन करत या स्वयंसेवकांना लस देण्यात आली. या स्वयंसेवकांना 14 दिवसांच्या अंतराने 2 लसी दिल्या जाणार आहेत.
दरम्यान देशामध्ये कोरोनाचा उद्रेक पाहायला मिळत आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाचे नवे 47,704 रुग्ण सापडल्याने देशभरातील आकडेवारीने तब्बल 14 लाखांचा टप्पा पार केला आहे. कोरोनाच्या रुग्णसंख्येत विक्रमी वाढ पाहायला मिळालेली असताना 654 मृत्यूही नोंदविले गेले आहेत. देशातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा 14,83,157 वर गेला आहे.
तर आतापर्यंत देशभरात 33,425 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. मात्र याच दरम्यान एक दिलासादायक माहिती समोर आली आहे. भारतातील कोरोना रुग्णांचा रिकव्हरी रेट म्हणजेच रुग्ण बरे होण्याचं प्रमाण हे 64.23% टक्के झाले आहे. तसेच देशातील 9 लाख लोकांनी कोरोनाची लढाई जिंकली आहे. 9,52,744 लोक उपचारानंतर बरे झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
दालचिनीच्या सेवनाने होतात 'हे' ६ फायदे; कोरोनाशी लढण्यासाठी रोगप्रतिकारकशक्ती वाढण्यास होईल मदत
जास्त खाणं सोडाल तरच कोविड 19 मुळे होणाऱ्या मृत्यूचा टळेल धोका, 'या' देशातील आरोग्यमंत्र्यांचा सल्ला