चिंताजनक! दातांच्या डॉक्टरांना कोरोनाचा धोका जास्त; WHO नं दिल्या 'ओरल चेकअप' च्या गाईडलाईन्स
By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2020 01:43 PM2020-08-17T13:43:25+5:302020-08-17T14:04:22+5:30
CoronaVirus News & Latest Updates : WHO नं माहामारीच्या काळात दातांच्या डॉक्टरांना धोका सगळ्यात जास्त असल्याचे सांगितले असून गाईडलाईन्स दिल्या आहेत.
संपूर्ण जगभरात कोरोना विषाणूने हाहाकार पसरवला आहे. संक्रमित रुग्णांचे उपचार करत असलेल्या अनेक आरोग्यक्षेत्रातील कर्मचारी, डॉक्टर्स यांना कोरोनाची लागण झाली आहे. अनेक कोरोनायोद्ध्यांना या माहामारीत आपला जीव गमवावा लागला आहे. अशा स्थितीत जागतिक आरोग्य संघटनेच्या तज्ज्ञांनी दातांच्या डॉक्टरर्सना सावधगिरी बाळगण्याचा इशारा दिला आहे. जागतिक आरोग्य संघटनेनं वाढत्या संक्रमणात डॉक्टरांकडून रुटीन चेकअप करताना स्वतःचा बचाव करण्याचा सल्ला दिला आहे. WHO नं माहामारीच्या काळात दातांच्या डॉक्टरांना धोका सगळ्यात जास्त असल्याचे सांगितले असून गाईडलाईन्स दिल्या आहेत.
या गाईडलाईन्समध्ये रुग्णाचे रुटीन चेकअप करताना काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे. तसंच जोपर्यंत कोरोनाचा प्रभाव कमी होत नाही तोपर्यंत रुग्णांची ओरल ट्रीटमेंट न करण्याचंही आवाहन केलं आहे. इतकंच नाही तर जर आपातकालीन स्थिती उद्भवत असेल तर रुग्णांना व्हिडीओ कॉन्फरेंसिंगद्वारे रुग्णांना सल्ला देण्याचं सांगितले आहे. जागतिक आरोग्य संघटनेनं दिलेल्या माहितीनुसार डॉक्टरर्स सध्या संक्रमणाच्या हाय रिस्क जोनमध्ये आहे. अशा स्थितीत दातांसंबंधी समस्यांचा उपचार करत असताना लाळेत असलेल्या व्हायरसमुळे संक्रमण पसरण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे कोणत्याही मार्गातून व्हायरसची लागण होऊ शकते.
डेंटल क्लीनिकमध्ये डॉक्टर एयरोसोल जनरेटिंग प्रक्रियेचा वापर करतात. याद्वारे संक्रमण पसरण्याचा धोका वाढतो. गाईडलाईन्सनुसार तोंडातील संक्रमण, रक्तस्त्राव, सूज येणं अशा समस्या औषधं, गोळ्यांनी नियंत्रणात येत नसतील तरच दवाखान्यात जाण्याचा सल्ला दिला आहे. सामान्य समस्यांसाठी दवाखान्यात शक्यतो जाऊ नये असं WHO च्या तज्ज्ञांनी सांगितले आहे.
दरम्यान कोरोनावर शोधून काढण्यात येणारी लस शंभर टक्के प्रभावी असण्याची शक्यता खूप कमी आहे. मात्र, ही लस ५० टक्के जरी प्रभावी असेल, तर एक वर्षाच्या आत जनजीवन पूर्वीप्रमाणे सुरळीत होईल, असे संसर्गजन्य रोगांचे अमेरिकेतील आघाडीचे तज्ज्ञ डॉ. अँथनी फौसी यांनी म्हटले आहे. कोरोना साथीसंदर्भात राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे सल्लागार म्हणूनही फौसी सध्या काम पाहत आहेत. त्यांनी सांगितले की, पुढच्या वर्षीपर्यंत कोरोना प्रतिबंधक लस उपलब्ध होण्याची शक्यता आहे.
त्यानंतर या साथीला प्रभावी आळा घालता येईल. त्यामुळे २०२१ च्या अखेरीपर्यंत जगातील जनजीवन पूर्वपदावर येण्याची शक्यता आहे. कोरोनाची लस विकसित झाली तरी हा विषाणू पृथ्वीतलावरून नष्ट होणार नाही, याची प्रत्येकाने नोंद घेतली पाहिजे. जगातून फक्त देवीचे विषाणू नष्ट करण्यात शास्त्रज्ञांना यश आले आहे. कोरोनाच्या लसीमुळे या विषाणूचे उपद्रव्यमूल्य कमी करता येईल.
हे पण वाचा
..... तर २०२१ च्या शेवटापर्यंत कोरोनाची माहामारी पूर्ण नष्ट होणार; तज्ज्ञांचा दावा
युद्ध जिंकणार! शरीरात कोरोना विषाणूंची वाढ होण्यापासून रोखणार 'हे' नवीन औषध, तज्ज्ञांचा दावा
शेवटच्या टप्प्यात पोहोचली चीनी कंपनीची कोरोना लस; 'या' देशाला लसीचे डोस पुरवणार