कोरोना विषाणूच्या संक्रमणामुळे मेंदूवर 'असा' होतोय परिणाम; तज्ज्ञांनी सांगितली नवी लक्षणं
By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2020 07:04 PM2020-07-21T19:04:26+5:302020-07-21T19:07:08+5:30
काही दिवसांपूर्वी तज्ज्ञांनी कोरोना व्हायरसच्या संक्रमणामुळे न्यरोलॉजिकल डिसॉर्डर उद्भवत असल्याचा दावा केला होता.
कोरोना व्हायरसने गेल्या काही महिन्यांपासून जगभरात हाहाकार निर्माण केला आहे. संक्रमणाच्या केसेस वाढत आहेत. लॉकडाऊनच्या नियमांमध्ये शिथिलता दिल्यानंतर आता कोरोना रुग्णांच्या संख्येत अनेक देशांमध्ये वाढ झालेली दिसून आली आहे. अलिकडे करण्यात आलेल्या संशोधनातून दिसून आले की कोरोना व्हायरसमुळे रुग्णांच्या मेंदूला सूज येण्याची समस्या उद्भवत आहे. कोरोनावर औषध आणि लस शोधण्यासाठी जगभरातील शास्त्रज्ञ प्रयत्न करत आहेत. माय उपचारशी बोलताना एम्सचे डॉ. अजय मोहन यांनी कोरोना विषाणूंबाबत माहिती दिली आहे.
काही दिवसांपूर्वी तज्ज्ञांनी कोरोना व्हायरसच्या संक्रमणामुळे न्यरोलॉजिकल डिसॉर्डर उद्भवत असल्याचा दावा केला होता. तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार कोरोनाच्या संक्रमणामुळे मेंदूला सूज येण्याची समस्या तीव्रतेने उद्भवते. हे संशोधन ब्रेन नावाच्या जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात आलं आहे. ज्या रुग्णांमध्ये कोरोनाची लक्षणं दिसून येत नाहीत. अशा रुग्णांनाही धोका असू शकतो. शरीरात सुजेशी निगडीत असलेल्या समस्या कोरोनाच्या संक्रमणाने तीव्रतेने उद्भवतात.
डॉक्टरांना मेंदूची सुज आणि डेलीरियम (मानसिक आरोग्याच्या समस्या) जास्त प्रमाणात दिसून आल्या आहेत. रिपोर्टनुसार जास्तीत जास्त लोकांमध्ये न्यूरोलॉजिकल डिसॉर्डरची आणि मेंदूत सुज येण्याची समस्या उद्भवत आहे. या संशोधनादरम्यान तज्ज्ञांना रुग्णांमध्ये डेलीरियम, ब्रेन डॅमेज, नर्व डॅमेज, ब्रेन इन्फ्लेमेशन आणि स्ट्रोकची समस्या दिसून आली आहे. माय उपचारशी बोलताना डॉ. नबी वली यांनी सांगितले की, डोकेदुखी, मासंपेशीतील वेदना, थकवा येणं, अशक्तपणा येणं, अशा समस्या उद्भल्यास वेळ न घालवता त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधायला हवा.
दरम्यान कोरोनाचा धोका हा १३ ते १९ वयोगटातील मुलांना अधिक असल्याची माहिती रिसर्चमधून समोर आली आहे. दक्षिण कोरियात तब्बल ६५ हजार लोकांचा अभ्यास करण्यात आला. त्यानंतर रिसर्चमधून मोठा खुलासा झाला आहे. संशोधकांनी दिलेल्या माहितीनुसार, १० ते १९ या वयोगटामुळे सर्वात जास्त आणि जलद कोरोनाचा प्रसार होतो. १० वर्षांच्या खालच्या वयोगटातील मुलांमुळे कोरोनाचा प्रसार होण्याची संख्या कमी आहे.
कोरोनाच्या लसीने आशेचा किरण दाखवल्यानंतर; आता WHO च्या तज्ज्ञांनी दिले स्पष्टीकरण
मास्कच्या वापराबाबत 'या' गोष्टी माहीत असतील तरच होईल संक्रमणापासून बचाव; वेळीच सावध व्हा