संक्रमणाचं कारण ठरू शकतो घामाने ओला झालेला मास्क; जाणून घ्या बचावाचे उपाय

By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2020 10:24 AM2020-06-30T10:24:57+5:302020-06-30T10:26:14+5:30

CoronaVirus News : कोरोना काळात आपण वापरत असलेला मास्क ओला झाल्यास संक्रमणाचा धोका जास्त असू शकतो.

CoronaVirus News : How to protect from wet face mask here are tips | संक्रमणाचं कारण ठरू शकतो घामाने ओला झालेला मास्क; जाणून घ्या बचावाचे उपाय

संक्रमणाचं कारण ठरू शकतो घामाने ओला झालेला मास्क; जाणून घ्या बचावाचे उपाय

Next

कोरोना व्हायरसच्या संक्रमणाचा सामना संपूर्ण देश करत आहे. जगभरात कोरोनाच्या माहामारीने हाहाकार पसरला आहे. भारतात कोरोना रुग्णांची संख्या ५ लाखांवर पोहोचली आहे. कोरोनापासून बचाव करण्यासाठी मास्क आणि सॅनिटायजरचा वापर शस्त्राप्रमाणे केला जात आहे. तसंच सोशल डिस्टेंसिंगचं पालन अनेक ठिकाणी होताना दिसून येत आहे.

पण सतत तोंडाला मास्क लावल्यामुळे खूप घाम येतो. अलिकडेच तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार ओला मास्क वापरणं आरोग्यासाठी सुरक्षित नाही. ओल्या मास्कमुळे कोरोना व्हायरसपासून बचाव होऊ शकत नाही. आज आम्ही तुम्हाला मास्कच्या वापराबाबत योग्य माहिती देणार आहोत.  

तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार कापडाचा मास्क तर ओला नसेल तरच कोरोना व्हायरसपासून बचाव होऊ शकतो.  मास्क घामामुळे ओला झाल्यास व्हायरसपासून बचाव करण्यासाठी प्रभावी ठरत नाही. अशात घामाने मास्क ओला झाला तर संक्रमण पसरण्याचा धोका वाढू शकतो. तसंच ओल्या कापडामुळे व्हायरसचा शरीरात सहजतेने प्रवेश होऊ शकतो. 

Increase the use of homemade masks | घरगुती मास्कचा वापर वाढवा

डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार घाम येणं की सामन्य गोष्ट आहे. पावसाळा सुरू होण्याच्या आधी वातावरणातील आद्रतेमुळे खूप घाम येतो. पण कोरोना काळात आपण वापरत असलेला मास्क ओला झाल्यास संक्रमणाचा धोका जास्त असू शकतो. अशा स्थितीत  स्वतःजवळ दोन मास्क ठेवण्याचा सल्ला दिला जातो. जेणेकरून गैरसोयीचा सामना करावा लागणार नाही. काही कारणाने मास्क ओला झाल्या दुसरा मास्क वापरता येऊ शकतो. याशिवाय आरोग्य तज्ज्ञांच्यामते, कॉटनचा मास्कऐवजी हलके सर्जिकल मास्क वापरल्यास फायदेशीर ठरेल. त्यामुळे पुरेशी हवा मिळाल्याने घाम येण्याचं प्रमाणं कमी होतं. 

मास्क शक्यतो वॉशेबल असल्यास उत्तम ठरेल. बाहेरून घरी आल्यानंतर मास्क काढून साबण आणि पाण्याने धुवा. उन्हात मास्क सुकू द्या. नंतरच पुन्हा वापरा. जेणेकरून संक्रमणाचा धोका उद्भवणार नाही. पावसाळ्यात वातावरणात ओलावा असतो. त्यामुळे कपडे सुकण्यासाठी वेळ लागतो. अशा स्थितीत  प्रेशर कुकरमध्ये पाणी घाला. त्यात मीठ घाला.  यात १५ मिनिटांपर्यंत मास्क घालून ठेवा. त्यानंतर मास्क पाण्यातून बाहेर काढून पिळून सुकवायला ठेवा. 

CoronaVirus: भारतीय वैज्ञानिकांच्या लढ्याला मोठं यश! देशात कोरोनाची पहिली लस तयार; जुलैमध्ये होणार ट्रायल

पालकांनो, मुलांची काळजी घ्या! कोरोनाग्रस्त लहानग्यांना आता कावासकीचा धोका

Web Title: CoronaVirus News : How to protect from wet face mask here are tips

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.