दिलासादायक! कोरोना रुग्णांना प्राण्यांच्या अँटीबॉडी दिल्या जाणार, लवकरच चाचणीला सुरूवात होणार

By ऑनलाइन लोकमत | Published: October 9, 2020 07:51 PM2020-10-09T19:51:34+5:302020-10-09T19:57:24+5:30

CoronaVirus News & Latest News : तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार कोरोना रुग्णांच्या शरीरात प्राण्यांच्या एंटीबॉडीज टाकल्या जाणार आहेत. ही पद्धत कितपत परिणामकारक ठरते हे पाहण्यासाठी लवकरच चाचणी प्रक्रिया सुरू होणार आहे.

CoronaVirus News : icmr ready to conduct clinical trials of animal derived antibodies antisera | दिलासादायक! कोरोना रुग्णांना प्राण्यांच्या अँटीबॉडी दिल्या जाणार, लवकरच चाचणीला सुरूवात होणार

दिलासादायक! कोरोना रुग्णांना प्राण्यांच्या अँटीबॉडी दिल्या जाणार, लवकरच चाचणीला सुरूवात होणार

Next

कोरोना व्हायरसचं संक्रमण आटोक्यात येण्यासाठी आणि लस औषधं तयार करण्यासाठी संपूर्ण जगभरातील शास्त्रज्ञ प्रयत्न करत आहेत. कोरोना रुग्णांचा जीव वाचवण्यासाठी गंभीर आजारांसाठी वापरात असलेल्या औषधांचा, प्लाज्मा थेरेपीचा वापर अनेक देशांमध्ये करण्यात येत आहे. दरम्यान कोरोना रुग्णांच्या उपचारांबाबत सकारात्मक माहिती समोर येत आहे.  तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार कोरोना रुग्णांच्या शरीरात प्राण्यांच्या एंटीबॉडीज टाकल्या जाणार आहेत. ही पद्धत कितपत परिणामकारक ठरते हे पाहण्यासाठी लवकरच चाचणी प्रक्रिया सुरू होणार आहे.

आयसीएमआर आणि हैदराबादमधील बायोलॉजिकल ई. लिमिटेड फार्मास्युटिकल कंपनीने मिळून एक अँटिसेरा विकसित केलं आहे. ज्याच्या मानवी चाचणीला आता मंजुरी मिळाली आहे. लवरकरच या उपचारपद्धतीचे क्लिनिकल ट्रायल सुरू होणार आहे. अँटिसेरा हे एक ब्लड सीरम आहे. म्हणजेच ज्यामध्ये आजाराविरोधात लढण्याची क्षमता असणाऱ्या अँटिबॉडीजचं पेशींचे प्रमाण अधिक असते. कोणत्याही  व्हायरसशी लढण्यासाठी रोगप्रतिकारक शक्ती लगेच वाढवण्यासाठी माणसांना हे सीरम इंजेक्शनच्या माध्यमातून दिलं जातं.

या माध्यमातून शास्त्रज्ञांनी बॅक्टेरिया आणि व्हायरसशी लढण्यासाठी आवश्यक असलेल्या अँटिबॉडी तयार केल्या आहेत. याआधी वॅक्सिनिया व्हायरस, टिटॅनस, डिप्थिरिया, रेबीज, हेपेटायटिस, या  आजारांच्या रुग्णांवर या पद्धतीने उपचार करण्यात आले होते. अशी माहिती आयसीएमआरच्या तज्ज्ञांनी दिली आहे. आयसीएमआरचे महासंचालक डॉ. बलराम भार्गव यांनी पत्रकार परिषदेत दिलेल्या माहितीनुसार घोड्याचा सेरा तयार केला असून याबाबत अभ्यासही पूर्ण  केला आहे. तसंच या उपचार पद्धतीच्या चाचणीसाठी परवानगी मिळाली आहे. हे अँटीसेरा कोरोना व्हायरसवर उपचारासाठी फायद्याचं तर ठरेलच शिवाय कोरोना संक्रमणापासून बचाव करण्यासाठीही याचा वापर करता येईल. 

हिवाळ्यात कोरोना अधिक धोकादायक होणार का?

हिवाळ्यात कोरोनाचा धोका वाढणार असल्याचं म्हटलं जात होतं. मात्र जागतिक आरोग्य संघटनेनेच याबाबत अत्यंत महत्त्वाची माहिती दिली होती. तापमानाचा कोरोनावर काय परिणाम होतो याबाबत जगभरातील तज्ज्ञ आपलं मत मांडत आहेत. प्रामुख्याने हंगामी व्हायरस हे (Seasonal Virus) हिवाळ्याम्ध्ये सक्रिय होतात. जगभरातील अनेक भागांमध्ये हिवाळ्यामध्ये इन्फ्युएंझाचा प्रकोप वाढताना दिसतो. आतापर्यंत कोरोनाच्या ट्रेंडमध्ये काही विशेष फरक झालेला दिसत नाही. आयुर्वेदाने कोरोनावर उपचार होतात? इंडियन मेडिकल असोसिएशनने सरकारकडून मागितला पुरावा

फ्लू व्हायरसमुळे हिवाळ्यात सर्वाधिक मृत्यू

व्हायरसमुळे होणारे श्वसनयंत्रणेशी संबंधित आजार हे थंड तापमानात वाढतात. याच कारणामुळे फ्लू व्हायरसमुळे हिवाळ्यात सर्वाधिक मृत्यू होत असतात. त्यामुळेच कोरोनामुळे हिवाळ्यात अधिक लोकांचा मृत्यू होऊ शकतो अशी भीती अनेकांनी वर्तवली होती. आतापर्यंत तापमानामुळे कोरोना व्हायरसच्या संसर्गात वाढ झाल्याचं स्पष्ट झालेलं नाही. भारतात एकूण सहा ऋतू असून हिवाळ्यात इन्फ्लुएंझाचा प्रकोप वाढताना दिसत नसून तो जून ते सप्टेंबर या काळात वाढतो असं तज्ज्ञांनी म्हटलं होतं. खुशखबर! कॅन्सरच्या उपचारांसाठी भारतीय वैज्ञानिकांनी तयार केलं अनोखं 'बँडेज', तज्ज्ञांचा दावा

Web Title: CoronaVirus News : icmr ready to conduct clinical trials of animal derived antibodies antisera

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.