CoronaVirus News : आता मृतांमध्ये झपाट्यानं वाढतंय तरूणांचं प्रमाण; 'ही' लक्षणं दिसल्यास लगेचच करा चाचणी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2021 11:42 AM2021-04-21T11:42:41+5:302021-04-21T11:55:18+5:30
CoronaVirus News : सायटोकीन स्ट्रोम्समुळे तरुणांचे जास्त प्रमाणात मृत्यू होतात. अशा परिस्थितीत, रुग्णाला प्रथम तो ठीक असल्याचे जाणवते, परंतु 4-5 दिवसांच्या आत, त्याच्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती अति सक्रिय होते आणि रुग्णाचा मृत्यू होतो.
दररोज कोरोनाची प्रकरणे झपाट्याने वाढत आहेत. दरम्यान, एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे ती म्हणजे कोरोनाच्या दुसर्या लाटेत तरुणही बळी पडत आहेत. पहिल्या लाटेत, बहुतेक वृद्ध लोकांना त्याचा फटका बसला होता, परंतु यावेळी तरूण अधिक बळी पडत आहे. मध्य प्रदेशात गेल्या दीड महिन्यांत कोरोनामुळे मृत्यू होत असलेल्यांमध्ये 50 टक्क्यांपेक्षा जास्त तरूणांचा समावेश आहे.
ही लक्षणं दिसल्यास वेळीच तपासणी करा
कोरोनाच्या सुरुवातीच्या लक्षणांमध्ये ताप, घसा खवखवणे आणि वेदना, कोरडे खोकला, सर्दी आणि श्वास लागणे, अशक्तपणा, थकवा येणे, भूक न लागणे, पोटदुखी, अतिसार, उलट्या होणे, डोकेदुखी आणि श्रवण क्षमता कमी होणे यांचा समावेश आहे. अशा परिस्थितीत, जर एखाद्यास यापैकी कोणतीही लक्षणे दिसली तर त्वरित तपासणी करा. तपासणीस उशीर झाल्यास संसर्ग होण्याचा धोका वाढतो आणि यामुळे परिस्थिती आणखी बिघडू शकते.
समोर आलं कारण
सायटोकीन स्ट्रोम्समुळे तरुणांचे जास्त प्रमाणात मृत्यू होतात. अशा परिस्थितीत, रुग्णाला प्रथम तो ठीक असल्याचे जाणवते, परंतु 4-5 दिवसांच्या आत, त्याच्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती अति सक्रिय होते आणि रुग्णाचा मृत्यू होतो. त्याच वेळी, तरुण चाचण्या करून घेण्यात आणि रुग्णालयात जाण्यात निष्काळजीपणा दाखवतात. त्यामुळे गंभीर स्वरूपात संक्रमण पसरतं. यासह, तरुणांना संसर्ग होण्याचे एक कारण असे आहे की 45 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना लसीकरण देखील केले गेले आहे, ज्यामुळे त्यांच्यासाठी धोका कमी झाला आहे आणि तरुणांमध्ये लसीकरण न झाल्यामुळे धोका वाढण्याची शक्यता आहे.
त्वरित तपासणी करा
लक्षणे दिसताच त्यांची त्वरित तपासणी करा आणि आपल्या स्तरावर उपचार करु नका. तसेच, शरीरात कोणतेही बदल किंवा नवीन लक्षणे दिसल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. वेळेवर तपासणी आणि वैद्यकीय सल्ल्याने संसर्ग नियंत्रित केला जाऊ शकतो.
कोरोना लसींची आयात अधिक सुलभ होणार, मोदी सरकार अजून एक मोठा निर्णय घेणार
१ मे पासून १८ वर्षांवरील सर्वांना लस
१ मेपासून १८ वर्षांवरील सर्वांना कोरोना लस देण्यात येणार असल्याचा निर्णय केंद्राकडून घेण्यात आला आहे. १ मेपर्यंत देशातील बाजारपेठेत कोरोना लस उपलब्ध होण्याची दाट शक्यता आहे. या लसीची किंमत काय असणार याबद्दलचा निर्णय अद्याप व्हायचा आहे. यापुढे राज्य सरकारं थेट कंपन्यांकडून कोरोना लसींची खरेदी करू शकतात.
पहिल्या टप्प्यात 15 दिवसांचा 'कडक' लॉकडाऊन गरजेचा, कॅबिनेटमध्ये चर्चा
१८ वर्षांवरील सर्वांना लस; जाणून घ्या नोंदणी प्रक्रिया
१ मेपासून १८ वर्षांवरील सर्वांना कोरोनाची लस घेता येईल. यासाठी आधी नोंदणी करावी लागेल. कोविन ऍप किंवा आरोग्य सेतु ऍपवर तुम्ही लसीकरणासाठी नोंदणी करू शकता. त्यासाठी ऍपवर आवश्यक माहिती भरून तुमचं ओळखपत्र अपलोड करावं लागेल. तुम्ही लसीकरण केंद्रावर जाऊनदेखील नोंदणी करू शकता. रुग्णालयं, लसीकरण केंद्रांवर गेल्यावरही नोंदणी करता येऊ शकते. पण तिथे गर्दी असण्याची शक्यता असल्यानं ऑनलाईन नोंदणी हा चांगला पर्याय आहे. आधार कार्ड, मतदान ओळखपत्र, पासपोर्टसारख्या वैध ओळखपत्रांच्या आधारे तुम्ही लसीकरणासाठी नोंदणी करू शकता.