चिंताजनक! लस दिल्यानंतरही कमी होणार नाही कोरोना विषाणूंचा धोका, जाणून घ्या कारण
By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2020 05:07 PM2020-06-16T17:07:51+5:302020-06-16T17:08:47+5:30
रुग्णांला मृत्यूपासून वाचवता आलं तरी गंभीर स्थितीपासून वाचवता येणार नाही. असं सुद्धा होण्याची शक्यता आहे.
कोरोना व्हायरसचं जगभरात थैमान पसरलं आहे. दोन ते तीन महिन्यानंतर आता लॉकडाऊन हटवण्यात आलं आहे. या कालावधीत अनेक देश कोरोनाचे नवीन हॉटस्पॉट ठरत आहेत. कोरोना व्हायरसचं संक्रमण नियंत्रणात आणण्यासाठी लस शोधण्याचा प्रयत्न सुरू आहे. ऑक्सफोर्ड यूनिव्हर्सिटीसह अनेक देशांमध्ये लसीच्या चाचण्या सुरू झाल्या आहेत.
जितक्या लवकर कोरोनाची लस तयार होईल तितक्या लवकर लोक आपापल्या कामाला सुरूवात करू शकतात. असं मत व्यक्त केलं जात आहे. पण लवकर लस तयार झाल्यास उपचारांदरम्यान अनेक मर्यादा येण्याची शक्यता आहे. रुग्णांला मृत्यूपासून वाचवता आलं तरी गंभीर स्थितीपासून वाचवता येणार नाही. असं सुद्धा होण्याची शक्यता आहे.
इंपीरियल कॉलेजचे प्राध्यापक रॉबिन शॅटॉक यांनी दिलेल्या माहितीनुसार कोरोनाच्या लसीमुळे इन्फेक्शन होण्यापासून वाचवता आले नाही तरी गंभीर स्थती होण्यापासून वाचवता येऊ शकतं. जगभरात कोरोनाची लस तयार करण्याासाठी प्रयत्न केले जात आहेत. सध्याच्या काळात लसीची गरज लक्षात घेता लहानांपासून मोठया फार्मा रिसर्च कंपन्यांना फंडीग देण्यात आले आहे.
अनेक कंपन्यांनी दोन ते तीन महिन्यात लस बाजारात आणण्याचा दावा केला आहे. तसंच ज्या कंपन्यांच्या लसीचे प्राण्यांवर चाचण्या यशस्वी झाल्या आहेत. अशा कंपन्या लवकरच माणसांवर ट्रायल करण्याासाठी प्रयत्न करणार आहेत. इन्फेक्शनला गंभीर स्थितीत जाण्यापासून वाचवू शकेल अशी लस बाजारात आणली जाणार आहे.
जर लसीमुळे फक्त इन्फेक्शनची तीव्रता आटोक्यात आणता येत असेल, तसंच इन्फेक्शन नष्ट करता येत नसेल तर लोकांमध्ये संभ्रमाचं वातावरण तयार होऊ शकतं. कारण लस घेतल्यानंतर लोकांनी आपले नेहमीचे रुटीन सुरू केले तर गर्दीच्या ठिकाणी किंवा लोकांच्या संपर्कात आल्यानंतर गंभीर परिणामांचा सामना करावा लागू शकतो.
सेंट लुइसमधील वॉशिंग्टन यूनिव्हर्सिटीतील तज्ज्ञ माइकल किंच यांनी दिलेल्या माहितीनुसार लक्षणं दिसत नसलेल्या रुग्णांच्या माध्यमातून संक्रमण पसरत आहे. अशा स्थितीत लस दिलेले लोक कोरोना पॉझिटिव्ह झाले आणि त्यांच्यातील लक्षणं न दिसल्यास आजाराबाबत माहिती मिळू शकणार नाही. त्यामुळे संक्रमणाचा वेग वाढत जाईल. लसीमुळे शरीरातील विषाणू निष्क्रिय होऊन रोगाशी लढत असलेल्या एंटीबॉडीज तयार होतात. त्यामुळे इन्फेक्शन पुन्हा झाल्यास व्हायरसला रोखता येऊ शकतं.
धक्कादायक! चीनकडे होता जगातील सर्वात विध्वंसक 'टाईम बॉम्ब,' तज्ज्ञांचा अंदाज ठरला खरा
कोरोनाकाळात वावरताना 'या' सवयी बदलायला हव्या, अन्यथा संक्रमणाचा असू शकतो धोका