मोठं यश! 'या' कंपनीच्या लसीची प्राण्यांवर चाचणी यशस्वी; लवकरच माणसांवर परिक्षण होणार 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2020 09:55 AM2020-06-12T09:55:47+5:302020-06-12T10:06:57+5:30

ही लस लवकरात लवकर बाजारात उपलब्ध होऊ शकेल असं मत तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

CoronaVirus News : Johnson johnson develops a covid19 vaccine trail soon | मोठं यश! 'या' कंपनीच्या लसीची प्राण्यांवर चाचणी यशस्वी; लवकरच माणसांवर परिक्षण होणार 

मोठं यश! 'या' कंपनीच्या लसीची प्राण्यांवर चाचणी यशस्वी; लवकरच माणसांवर परिक्षण होणार 

Next

संपूर्ण जग कोरोना व्हायरसचे युद्ध लढत आहे. आता पाच महिन्यांपेक्षा जास्तकाळ या माहामारीमुळे लोकांना त्रास सहन करावा लागत आहे. अनेक देशांतील कंपन्यांनी लसींचे किंवा औषधांचे पहिल्या टप्प्यातील प्रयोग यशस्वी ठरल्याचा दावा केला आहे. अमेरिकेतील बहुराष्ट्रीय कंपनी जॉनसन एंड जॉनसन ने दिलेल्या माहितीनुसार कोरोना व्हायरसशी लढण्यासाठी या कंपनीची लस तयार झाली आहे.

जॉनसन एंड जॉनसनचे प्रमुख  पॉल स्टोफेल सांगितले की, कोरोना व्हायरसशी लढण्यासाठी त्यांनी तयार केलेल्या लसीचे सकारात्मक परिणाम दिसून आले आहेत.  SARS-CoV-2 नावाने तयार करण्यात आलेल्या या लसीचे क्लिनिकल ट्रायल पुढिल महिन्यात सुरू होणार आहे. ही लस लवकरात लवकर बाजारात उपलब्ध होऊ शकेल असं मत तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

कंपनीकडून या लसीच्या पहिल्या आणि त्यानंतरच्या टप्प्यातील आकड्यांवर विश्लेषण केले जाणार आहे.  दरम्यान १ हजारांपेक्षा जास्त रुग्णांवर वैद्यकिय परिक्षण करण्यात येणार आहे. यात १८ ते ५५ या वयोगटातील लोकांचा सहभाग असेल. तसंच काही प्रमाणात ६५ वर्ष वरील वयोगटातील लोकांना सहभागी करून घेण्यात येणार आहे.

कंपनीतील तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार संपूर्ण जगभरात ही लस उपलब्ध करून देण्यासाठी इतर कंपन्याशी चर्चा सरू आहे.  जेणेकरून कमीतकमी वेळेत जास्तीत जास्त लोकांना फायदा मिळू शकेल.  भारतातही कोरोनाचे संक्रमण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. त्यामुळे या लसीचे माणसांवरिल परिक्षणाचे परिणाम सकारात्मक परिणाम दिसून आल्यास नक्कीच जगभरातील लोकांना कोरोनापासून वाचवण्यात यश येऊ शकेल.

तुमच्या आजूबाजूलाही फिरकणार नाही कोरोना विषाणू; जर लक्षात ठेवाल 'या' ५ गोष्टी

पावसाळ्यात घश्यातील खवखवीमुळे कोरोनाचा धसका घेण्याआधी; 'या' उपायांनी तब्येत सांभाळा

Web Title: CoronaVirus News : Johnson johnson develops a covid19 vaccine trail soon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.