CoronaVirus News : पल्स ऑक्सिमीटरचा वापर कसा करतात, जाणून घ्या...
By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2020 04:05 AM2020-06-24T04:05:56+5:302020-06-24T07:22:29+5:30
होम आयसोलेशनमधील व्यक्तीला स्वत:च्या शरीरातील आॅक्सिजनची पातळी घरच्या घरी मोजण्यासाठी पल्स ऑक्सिमीटरचा उपयोग होऊ शकतो.
- डॉ. अमोल अन्नदाते
शरीरातील ऑक्सिजनची पातळी व हृदयाचे ठोके मोजण्यासाठी वापरण्यात येणारी वैद्यकीय उपकरण म्हणजे पल्स आॅक्सिमीटर. लक्षणविरहीत तसेच सौम्य व मध्यम लक्षणे असणाऱ्या होम आयसोलेशनमधील व्यक्तीला स्वत:च्या शरीरातील आॅक्सिजनची पातळी घरच्या घरी मोजण्यासाठी पल्स ऑक्सिमीटरचा उपयोग होऊ शकतो.
कोरोना रुग्णाला ऑक्सिजनची पातळी मोजणे का गरजेचे असते ?
कोरोनामध्ये श्वास घेण्यास त्रास सुरु होण्या आधी कमी झालेल्या ऑक्सिजनवरून न्यूमोनिया किंवा ऑक्सिजन कमी करणाºया इतर गुंतागुंतीचे निदान करता येते.
नॉर्मल ऑक्सिजनची पातळी किती असते?
सहसा ९४-१०० ही नॉर्मल ऑक्सिजनची पातळी असते. कधी ९३ पर्यंतही चालते. पण ९० च्या खाली मात्र तातडीने रुग्णालयात जायला हवे.
रीडिंग कशी बघावी ?
पल्स ऑक्सिमीटर हृदयाचे ठोके व ऑक्सिजनची पातळी अशा दोन्ही रीडिंग दाखवते. ऑक्सिजन दाखवले जाते तिथे रढड2 असे लिहिलेले असते. सहसा वर दाखवलेली रीडिंग आॅक्सिजनची असते आणि खाली दाखवलेली हृदयाच्या ठोक्याची असते. काही पल्सआॅक्समध्ये हे उलटे असू शकते व कुठली पातळी कशाची आहे हे मशिनच्या कव्हरवर लिहिलेले असते. पल्स आणल्यावर घरातील एक दोन स्वस्थ व्यक्तींना लावून बघावे. जिथे सगळ्यांची रीडिंग ९० च्या पुढे दिसते आहे ती आॅक्सिजनची पातळी दाखवणारी रीडिंग आहे हे मार्क करून घ्यावे. हे नीट समजून घेण्याचे कारण म्हणजे हृदयाचे ठोके ही आॅक्सिजनची पातळी समजून रुग्ण घाबरून जातात. रीडिंग दाखवण्यासाठी किमान ३० सेकंद लागतात.
पल्स आॅक्सिमीटर लावण्याआधी बोटे तळहातावर चोळून गरम
करून घ्यावे.
आॅक्सिजनची पातळी
कमी दाखवत असेल तर ?
आॅक्सिजनची पातळी कमी दाखवली तरी दर वेळी ती बरोबर असेल असे नाही. व्यक्ती नॉर्मल , स्वस्थ असताना ही पातळी
कमी दाखवण्याची खालील
करणे असू शकतात -
मशिन बोटाला नीट लावलेले नसेल.
हाताला मेंदी / नखाला नेल पॉलिश लावलेले असेल.
हात थंड असतील.
शरीरात लिपिड - चरबीचे प्रमाण जास्त असणे.
नख मोठे असल्याने पल्सआॅक्स बोटावर नीट न बसने.
खोलीतील जास्त प्रमाणात असलेला प्रकाश / सूर्यप्रकाश पल्सआॅक्सच्या लाईटशी ढवळाढवळ करत असणे.
म्हणून आॅक्सिजन कमी
दाखवले तर लगेच घाबरून
जाऊ नये व मशिन योग्यरित्या काम करते आहे का, हे तपासून पाहावे.
घरात प्रत्येकाने पल्सआॅक्स
विकत घ्यावे का ?
प्रत्येकाने घरोघरी विकत घेण्याची गरज नाही पण पूर्ण सोसायटीत सगळ्यांनी मिळून एखादे पल्सआॅक्स किंवा काही
कुटुंबांच्या ग्रुपने मिळून एखादे घेण्यास हरकत नाही. कारण सगळ्यांना हे एकाच वेळी लागणार नाही.
काहीही लक्षणे नसलेल्यांना
प्रतिबंध म्हणून रोज पल्सआॅक्सने आॅक्सिजनची पातळी तपासावी का ?
याची मुळीच गरज नाही आणि याचा वापर फक्त कोरोना संसर्ग झाल्यावरच करावा.
स्मार्टफोनमध्ये अॅपमध्ये आॅक्सिजनची पातळी मोजावी का ?
फोनमधील आॅक्सिजनची पातळी दाखवणारे अॅप हे सदोष आहेत व त्यामुळे चुकीची पातळी दाखवण्याचे प्रमाण आहे म्हणून शक्यतो हे अॅप वापरू नये .
एकापेक्षा जास्त जण वापरणार असेल तर पल्स आॅक्सिमीटीर सॅनिटायजरने क्लीन करून घ्यावे.
(लेखक बालरोगतज्ज्ञ असून, वैद्यकीय साक्षरतेसाठी कार्यरत आहेत.)