CoronaVirus News : कोरोनावर रेमडेसिविरसारखं प्रभावी ठरतंय हे स्वस्त औषध; हजारो रूपये खर्च करण्याआधी वाचा तज्ज्ञांचा सल्ला
By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2021 06:14 PM2021-04-21T18:14:20+5:302021-04-21T18:16:10+5:30
CoronaVirus News : रेमडेसिविरच्या मागे धावण्यात काही अर्थ नाही. डॉक्टरांनी सुद्धा रुग्णांना यााबाबत समजावून सांगायला हवं.
सध्याच्या स्थितीत कोरोनाबाधित झालेले लोक आणि ज्यांचे नातेवाईक कोरोनाबाधित झाले आहेत. ते उपचारांसाठी रेमडेसिविर औषध मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. हे औषध मिळवण्यासाठी वाट्टेल ती किंमत मोजण्याची लोकांची तयारी आहे. या इंजेक्शनबद्दल तज्ञ म्हणतात की या इंजेक्शनचा कोणताही महत्त्वपूर्ण फायदा नाही, म्हणून हे औषध जागतिक आरोग्य संघटनेद्वारे अधिकृत मान्यता मिळालेली नाही.
ज्याप्रमाणे इतर एंटीबायोटिक औषधं खाल्ल्यानंतर सात दिवसांनंतर बरं वाटू लागतं त्याच प्रमाणे या इंजेक्शनचाही प्रभाव आहे.
रिसर्च सोसाइटी ऑफ एनेस्थीसिया एंड क्लीनिकल फार्माकोलॉजीचे सचिव आणि संजय गांधी पीजीआयचे आयसीयू एक्सपर्ट्स संदीप साहू यांनी सांगितले की, ''रेमडेसिविरच्या मागे धावण्यात काही अर्थ नाही. डॉक्टरांनी सुद्धा रुग्णांना यााबाबत समजावून सांगायला हवं. हे इंजेक्शन कोरोना संक्रमित रुग्णामध्ये Acute respiratory distress syndrome (ARDS) रोखण्यात फारसं प्रभावी नाही.''
न्यू इंग्लँड जर्नल आफ मेडिसिनमध्ये प्रकाशित केलेल्या संशोधनाचा हवाला देत प्राध्यापक साहू यांनी सांगितले की, ''डेक्सामेथासोन हे औषध स्वस्त आणि सहज उपलब्ध होणारं आहे. ज्या रुग्णांमध्ये ऑक्सिजनची कमतरता असते, त्या रुग्णांसाठी हे इंजेक्शन प्रभावी ठरते. ८ ते १० मिलिग्राम औषध २४ तासांनी दिल्यानंतर व्हेंटिलेटरवर जाण्याची शक्यता कमी होते.''
आता मृतांमध्ये झपाट्यानं वाढतंय तरूणांचं प्रमाण; 'ही' लक्षणं दिसल्यास लगेचच करा चाचणी
शास्त्रज्ञांनी दोन हजार कोरोना-संक्रमित रूग्णांवर संशोधन केले. ज्यांच्यात ऑक्सिजनचे प्रमाण ९० पेक्षा कमी होते आणि डेक्सामेथासोन दिल्यानंतर २८ दिवसानंतर, त्यांच्यात मृत्यूचे प्रमाण कमी झाल्याचे तसेच व्हेंटिलेटरची कमी गरज असल्याचे निष्कर्षांवरून दिसून आले. रेमाडेसिव्हिर केवळ एका विशिष्ट श्रेणीमध्ये आराम प्रदान करू शकते. या औषधाचा कोणताही खुला अभ्यास नाही, फक्त फार्मा उद्योगाद्वारे प्रायोजित केलेले संशोधन पुढे आले आहे.
कोणत्या व्हिटॅमिन किंवा सप्लीमेंटने तुमचा कोरोनापासून बचाव होईल? वाचा एक्सपर्ट काय म्हणाले...
प्राध्यापक संदीप साहू म्हणतात की, ''आयसीयूमध्ये प्रवेश घेतलेल्या कोविड नसलेल्या रुग्णांमध्ये एआरडीएस रोखण्यासाठी डेक्सामेथासोन प्रभावी ठरले आहे. हजारो रुग्णांमध्ये हे पाहिले गेले आहे. या औषधाची योग्य मात्रा दिल्यास सायटोकिन स्ट्रोम्स थांबविण्यात मदत होते.''