दिलासादायक! 'या' महिन्यात भारतातून नष्ट होऊ शकते कोरोनाची माहामारी, तज्ज्ञांचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 7, 2020 01:26 PM2020-06-07T13:26:11+5:302020-06-07T13:34:47+5:30
CoronaVirus latest news update : गणितीय प्रमाणांच्या आधारांवर हे विश्लेषण केलं आहे.
कोरोना व्हायरसची माहामारी कधी संपणार, जनजीवन कधी सुरळीत होणार असा प्रश्न सगळ्यांनाच पडत आहे. कोरोनाची माहामारी सप्टेंबरच्या मध्यात भारतातून नष्ट होऊ शकते. असा दिलासादायक दावा आरोग्य तज्ज्ञांनी केला आहे. गणितीय प्रमाणांवर आधारित हे विश्लेषण केलं आहे. या अभ्यासात दिसून येत आहे की, जेव्हा गुणांक १०० टक्क्यांपर्यंत पोहोचेल तेव्हा ही माहामारी संपेल, हे संशोधन ऑनलाइन जर्नल एपीडेमीयोलॉजी इंटरनॅशनलमध्ये प्रकाशित करण्यात आलं आहे.
हे अध्ययन डीजएसएच चे उपसंचालक डॉ अनिल कुमार आणि उपसाहाय्यक संचालक रूपाली रॉय यांनी केले आहे. त्यांनी या निष्कर्षापर्यंत पोहोचण्यासाठी गणितीय प्रमाणांचा वापर केला आहे. ज्यामध्ये माहामारीचा प्रसार आणि त्यातून बाहेर येत असलेल्या लोकांच्या क्षमतेचा अभ्यास केला गेला होता. या अभ्यासातून संक्रमण झालेल्या व्यक्तीकडून कधीपर्यंत संक्रमण पोहोचू शकतं. याबाबत परिक्षण करण्यात आले. एकूणच संक्रमणाचा दर आणि कोरोनातून बाहेर येत असलेल्या रुग्णांचा दर यांतील संबंधाचा अभ्यास करण्यात आला. रिपोर्टनुसार भारतात ही माहामारी २ मार्चला सुरू झाली त्यानंतर कोरोनाचे रुग्ण वाढत गेले.
या अभ्यासााठी तज्ज्ञांनी भारतातील कोरोना रुग्णाची आकडेवारी आणि वर्ल्डमीटर्स डॉट इंफो कडून १ ते १९ मार्चपर्यंत नोंद करण्यात आलेल्या आकडेवारी यांवर अभ्यास करण्यात आला. रिपोर्टनुसार बेलीज रिलेटिव रिमूवल रेट (बीएमआरआरआर), कोविड19 च्या सांखिकीय विश्लेषणात भारतीय सांखिकीय अभ्यास प्रकाशित करण्यात आला आहे. यानुसार सप्टेंबर महिन्यापर्यंत कोरोनाची माहामारी भारतातून नष्ट होऊ शकते.
कोरोनाचे तीव्र परिणाम अजूनही दिसलेले नाहीत; कम्युनिटी ट्रांसफरचा धोका अधिक
कोरोना व्हायरसनंतर आता 'या' जीवघेण्या व्हायरसचा धोका; WHO ने दिल्या सुचना