CoronaVirus News : कोरोनाच्या महामारीत लोकांना घरच्याघरी उद्भवत आहेत 'या' गंभीर समस्या

By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2020 10:03 AM2020-05-06T10:03:01+5:302020-05-06T10:15:03+5:30

CoronaVirus Marathi News and Live Updates: लॉकडाऊनमुळे कोरोनाच्या महामारीव्यतिरिक्त इतर संकटांचा सामना करावा लागत आहे.

Coronavirus News Marathi : coronavirus increasing psychiatric patient in india myb | CoronaVirus News : कोरोनाच्या महामारीत लोकांना घरच्याघरी उद्भवत आहेत 'या' गंभीर समस्या

CoronaVirus News : कोरोनाच्या महामारीत लोकांना घरच्याघरी उद्भवत आहेत 'या' गंभीर समस्या

Next

कोरोना व्हायरसमुळे जगभरात हाहाकार  झाला आहे. कोरोना व्हायरसचं संक्रमण झाल्यामुळे अडीच लाखांहून जास्त लोकांचा जगभरात मृत्यू झाला आहे. कोरोनाच्या महामारीला आटोक्यात आणण्यासाठी सर्वच देशांमधून प्रयत्न केले जात आहेत. अशात लॉकडाऊनमुळे कोरोनाच्या महामारीव्यतिरिक्त इतर संकटांचा सामना करावा लागत आहे.

अमेरिकेतील अनेक रुग्णालयांतील मनोरुग्णांना कोरोनाच्या महामारीमुळे घरी पाठवण्यात आलं आहे. यामुळे फक्त मनोरुग्णांचे उपचारच थांबलेले नाहीत, तर घरच्यांना मनोरुग्णांना सांभाळण्यासाठी सुद्धा अडचडींचा सामना करावा लागत आहे. गेल्या काही दिवसात मेंटल हेल्थ सेंटरमध्ये मदतीसाठी येत असलेल्या कॉल्सचं प्रमाण वाढलं आहे. लॉकडाऊनमुळे मनोरुग्णांच्या कुटुंबातील लोकांच्या अडचणी वाढल्या आहेत. 

कोरोना रुग्णांसाठी ही रुग्णालयं खाली करण्यात आली होती. मानसिक आरोग्य तज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार ज्यांच्या घरात मानसिक रुग्ण आहेत. अशा लोकांनी आपल्या प्रियजनांची काळजी घेण्यासाठी सावध राहायला हवं. घरातील मानसिक रुग्णांच्या हालचालींकडे लक्ष असायला हवं. अनेक कुटुंबात रुग्णांमध्ये असणारी भीती, पॅनिक अटॅक याची कल्पना नसल्यामुळे समस्या आणखी वाढत जातात. 

मानसिक आजारांनी ग्रस्त असलेल्या लहान मुलांना सांभाळणं कठीण काम असतं. जास्तवेळ घराबाहेर राहिल्यामुळे घरातील इतर सदस्यांशी त्यांचा ताळमेळ नसतो. अशात पालकांनी सुद्धा सर्तकता बाळगणं गरजेचं आहे. घरात सुद्धा सोशल डिस्टेंसिंगचं पालन करायला हवं. आधीच कोरोना व्हायरसमुळे मानसिक आरोग्यावर नकारामत्मक परिणाम होत असताना घरी मानसीक रोगांनी पिडीत व्यक्ती असेल तर विचारपूर्वक वागायला हवं. (हे पण वाचा-आयर्नच्या जास्त प्रमाणामुळे फुप्फुसांच्या आजारांचे व्हाल शिकार, वेळीच व्हा सावध)

अनेक व्हिडीओ सेवांच्या माध्यामातून डॉक्टर मनोरुग्णांना टेलिथेरेपी देत आहेत. याशिवाय घरी राहत असलेल्या लोकांना सुद्धा कशी काळजी घ्यायची याबाबत मार्गदर्शन केले जात आहे. तज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार मानसिक विकारांनीग्रस्त असलेल्यांना कोरोनाची महामारी दुहेरी संकटाप्रमाणे आहे. अशा स्थितीत कुटुंबातील व्यक्तींनी मानसिक रुग्णांवर रागावणं , बंधन घालणं अशी वागणूक  केल्यामुळे मानसिक रुग्णांनी आत्महत्या केल्याच्या घटना समोर आल्या आहेत. (हे पण वाचा-CoronaVirus News : आतड्यांमध्ये वेगाने होत आहे कोरोना विषाणूंचा प्रसार, तज्ञांचा खुलासा)

Web Title: Coronavirus News Marathi : coronavirus increasing psychiatric patient in india myb

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.