काळजी वाढली! लस निष्क्रीय ठरण्याचं कारण असू शकतं कोरोना विषाणूंचं बदलतं स्वरुप

By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2020 01:01 PM2020-06-28T13:01:15+5:302020-06-28T13:30:02+5:30

CoronaVirus Latest News Updates : भारतातील कोरोनाबाधितांच्या संख्येनं ५ लाखांचा टप्पा ओलांडला आहे.

CoronaVirus News Marathi : Coronavirus mutating genetic changes vaccine | काळजी वाढली! लस निष्क्रीय ठरण्याचं कारण असू शकतं कोरोना विषाणूंचं बदलतं स्वरुप

काळजी वाढली! लस निष्क्रीय ठरण्याचं कारण असू शकतं कोरोना विषाणूंचं बदलतं स्वरुप

Next

जगभरात कोरोना व्हायरसची लस तयार करण्यासाठी विविध देशातील शास्त्रज्ञ प्रयत्न करत आहेत. कोरोना व्हायरसचं थैमान जसजसं वाढत चाललं आहे. तसतसं कोरोना व्हायरसच्या संक्रमणाबाबत नवनवीन माहिती समोर येत आहे. दरम्यान सगळ्यात चिंताजनक बाब म्हणजे कोरोनाव्हायरस आपलं स्वरुप बदलत आहे. कोरोना व्हायरसमध्ये कोणत्या प्रकारचे अनुवांशिक बदल होत आहेत. याबाबत शास्त्रज्ञ शोध घेत आहेत. दरम्यान व्हायरसबाबत एक माहिती समोर येत आहे.  

npr.org मध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या माहितीनुसार तज्ज्ञांनी कोरोना व्हायरसचे बदलते स्वरूप पाहिले आहे. हा बदल जास्त प्रमाणात झालेला नाही की त्यामुळे लस निष्क्रिय ठरू शकते की नाही याबाबत साशंकता आहे. स्विट्जरलँडच्या बसेल युनिव्हरर्सिटीमधील एम्मा हॉडक्रॉफ्ट यांनी दिलेल्या माहितीनुसार कोरोना व्हायरसमध्ये ज्या प्रकारचे म्यूटेशन होत आहे. ते पाहता घाबरण्यासारखं काहीही नाही. 

जॉन्स हॉपकिन्स अप्लाइड फिजिक्स लॅबचे पीटर थीलेन यांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या कोरोना व्हायरसमुळे होणारे म्यूटेशन कमी प्रमाणात आहे. व्हायरसचे ४७ हजार जिनोम्स इंटरनॅशनल डेटाबेसमध्ये स्टोर करण्यात आले आहेत. जिनोम्सच्या अभ्यासावरून व्हायरसमध्ये कशाप्रकारे संख्येत वाढ होते. याचा अंदाज येतो.  कोरोना व्हायरसची लस तयार करण्यासाठी सर्वच देशातील शास्त्रज्ञ प्रयत्न करत आहेत. 

क्या रूप बदल रहा कोरोना वायरस जिससे बेकार हो जाएगी वैक्सीन?

एम्मा हॉडक्रॉफ्ट सांगतात की, सध्या कोरोना व्हायरसवर कोणतीही लस मिळालेली नाही. लस एकदा तयार केल्यानंतर काही वर्षानंतर पुन्हा अपडेट करावी लागेल. म्हणजेच मुळ लसीच्या स्वरुपात बदल करावे लागतील. तरीसुद्धा याबाबत तज्ज्ञांनी निश्चित मत दिलेले नाही.

दरम्यान  जगात कोरोना रुग्णांची संख्या १ कोटी ८२ हजार ६१३ इतकी आहे. आतापर्यंत ५ लाख १ हजार ३०८ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. कोरोनातून बऱ्या झालेल्यांची संख्या ५४ लाख ५८ हजार ५२३ इतकी आहे. तर ४१ लाख २२ हजार ७८२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

अमेरिकेनंतर सर्वाधिक कोरोना रुग्ण ब्राझीलमध्ये आहे. ब्राझीलमध्ये कोरोनाचे १३ लाख रुग्ण आहेत. ब्राझीलमध्ये ५७ हजारांहून अधिक जण कोरोनामुळे मृत्यूमुखी पडले आहेत. रशियामध्ये कोरोनाचे ६ लाखांपेक्षा जास्त रुग्ण आहेत. तर मृतांचा आकडा ९ हजारांच्या जवळ पोहोचला आहे. भारतातील कोरोनाबाधितांच्या संख्येनं ५ लाखांचा टप्पा ओलांडला आहे. देशात आतापर्यंत कोरोनामुळे १६ हजारहून अधिक जणांचा बळी गेला आहे.

कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यास, स्वतःला सुरक्षित ठेवण्यासाठी नक्की करा 'ही' १० कामं

Coronavirus: आता कोरोनाच्या मुकाबल्यासाठी दोन नव्या आरोग्य विमा पॉलिसी; १० जुलैपर्यंत उपलब्ध

Web Title: CoronaVirus News Marathi : Coronavirus mutating genetic changes vaccine

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.