दिलासादायक! आता कोरोना विषाणूंच्या 'या' चाचणीने रुग्णांचे जीव वाचवता येणार; तज्ज्ञांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2020 03:12 PM2020-08-03T15:12:08+5:302020-08-03T15:16:57+5:30

CoronaVirus News & latest Updates : ब्रिटननं दिलेल्या माहितीनुसार पुढील आठवड्यापासून लाखो लोकांची नवीन चाचण्या केल्या जाणार आहे.

CoronaVirus News Marathi : Coronavirus new lifesaving tests 90 minute checks | दिलासादायक! आता कोरोना विषाणूंच्या 'या' चाचणीने रुग्णांचे जीव वाचवता येणार; तज्ज्ञांचा दावा

दिलासादायक! आता कोरोना विषाणूंच्या 'या' चाचणीने रुग्णांचे जीव वाचवता येणार; तज्ज्ञांचा दावा

Next

 कोरोना व्हायरसविरुद्धच्या लढाईत ब्रिटेनमध्ये वेगवेगळे बदल होतान दिसून येत आहेत. पुढच्या आठवड्यापासून ब्रिटन सरकारकडून दोन नवीन रॅपिड टेस्ट लॉन्च केल्या जाणार आहेत. कोरोनाच्या या दोन नवीन चाचण्या एडवांस आणि  गेम चेंजर ठरणार असल्याचे सांगितले जात आहे. कारण या चाचणीमुळे जीव वाचवता येऊ शकतो. ब्रिटननं दिलेल्या माहितीनुसार पुढील आठवड्यापासून लाखो लोकांची नवीन चाचण्या केल्या जाणार आहे.

फक्त ९० मिनिटात या चाचणीचे रिजल्ट मिळू शकतील. विशेष म्हणजे या चाचणीची प्रक्रिया सोपी असल्यामुळे विमानतळं, ऑफिसेस, रेस्टॉरंटमध्ये तपासणी करता येऊ शकते. डेलीमेलने  दिलेल्या माहितीनुसार रविवारी आरोग्यमंत्री मॅट हॅन्कॉक यांनी ही चाचणी  रुग्णांचा जीव वाचवणारी ठरेल असं सांगितले आहे. ब्रिटन कोरोनाच्या दुसऱ्या लाटेपासून बचाव करण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न करत आहे. कारण परत एकदा लॉकडाऊन करावं लागल्यास देशाच्या अर्थव्यवस्थेचं नुकसान होऊ शकतं.

अर्थव्यवस्थेचं नुकसान होण्यापासून वाचवण्यासाठी उपाययोजना केल्या जात आहेत. रिपोर्टनुसार सुरूवातीला ही चाचणी ब्रिटन नॅशनल हेल्थ सर्विसशी निगडीत असलेल्या संस्थांमध्ये करण्यात येणार आहे. काही महिन्यांनंतर मोठ्या प्रमाणावर आणि वेगवेगळ्या ठिकाणी लस उपलब्ध होणार आहे. सध्या ब्रिटनकडे  जे चाचण्यांचे  किट आहेत. याद्वारे फक्त संक्रमित लोकांची चाचणी केली जात आहे. पण या नवीन टेस्ट किटने  लक्षणं नसलेल्या लोकांचीही रुटीन चेकअपप्रमाणे चाचणी करणं शक्य होणार आहे.  

रुग्णाला कोरोनाचं संक्रमण झालं नसल्यास सामन्य फ्लू आहे का याची माहितीसुद्धा या चाचणीच्या माध्यमातून मिळू शकते.  या नवीन चाचणीत Lampore Test चा समावेश आहे. लाळेच्या थेंबाद्वारे ही चाचणी करण्यात येते. दुसऱ्या टेस्टचं नाव DNANudge आहे. या दरम्यान नाकातून घेतलेल्या स्बॅबद्वारे डीएनए विश्लेषण केलं जातं. या चाचणीच्या रिपोर्टला लॅबमध्ये पाठवण्याची आवश्यकता नसते. 

चिंताजनक! आता कोरोना विषाणू दीर्घकाळ पाठ सोडणार नाही; WHO ची धोक्याची सुचना

पावसाळ्यात चुकूनही करू नका 'या' पदार्थांचे सेवन; रोगप्रतिकारकशक्ती होईल कमी, वेळीच सावध व्हा

Web Title: CoronaVirus News Marathi : Coronavirus new lifesaving tests 90 minute checks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.