CoronaVirus News : 'हे' नवीन औषध कोरोना रुग्णांच्या उपचारांसाठी ठरेल प्रभावी, तज्ज्ञांचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2020 11:05 AM2020-05-09T11:05:28+5:302020-05-09T11:09:57+5:30
CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोनाची लागण झालेले रुग्ण या औषधांमुळे बरे होऊ शकतात.
कोरोनाचा प्रसार दिवसेंदिवस जगभरातील सगळ्याच देशांमध्ये वाढत चालला आहे. कोरोना व्हायरसच्या महामारीमुळे लाखो लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. मोठ्या संख्येने जगभरातील लोकांना कोरोनाचं संक्रमण झालं आहे. कोरोना रुग्णांचे उपचार करण्यासाठी वेगवेगळ्या औषधांचा वापर करून प्रयत्न केले जात आहेत. अलिकडे संशोधकांनी कोरोनाच्या उपचारांसंबंधी दावा केला आहे. यानुसार आर्थरायटिस या आजारात वापरली जाणारी औषधं कोरोना रुग्णांसाठी उपयोगी ठरू शकतात.
हे लघु संशोधन इटलीत करण्यात आलं होतं. कोरोना रुग्णांना श्वास घेण्याासाठी होत असलेला त्रास कमी करण्यासाठी आर्थरायटिसच्या गोळ्या फायदेशीर ठरू शकतात. असा दावा इटलीतील शास्त्रज्ञांनी केला आहे. या औषधांमुळे फुफ्फुसांची सुज कमी होण्यास मदत होईल. कोरोनाची लागण झालेले रुग्ण या औषधांमुळे बरे होऊ शकतात. असा दावा केला आहे. परंतु अद्याप कोरोना रुग्णांना ही औषध दिल्यानंतर काय परिणाम घडून येतो, असा वेगळा प्रयोग अद्याप करणयात आलेला नाही. (हे पण वाचा-CoronaVirus News : काळजी वाढली! वाढत्या तापमानाचा कोरोना विषाणूंवर परिणाम होत नाही, तज्ञांचा खुलासा)
रिसर्चकर्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार ७० टक्क्यांपेक्षा जास्त रुग्णांना अनाकिनरा नावाच्या औषधामुळे श्वास घेण्याच्या समस्येवर आराम मिळाला आहे. यामुळे फुप्फुसांची सुज कमी झाली आहे. इटलीतील मिलाम शहरातील सॅन रफाले रुग्णालयातील इम्युनोलॉजी एलर्जी विभागाचे प्रमुख डॉ. डगना यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोनाच्या संक्रमणावर हे औषध परिणामकारक ठरत असलं तरी वैद्यकीय प्रभाव जाणून घेण्यासाठी नियंत्रित ट्रायल करणं गरजेचं आहे. जोपर्यंत कोरोनाची लस येत नाही तोपर्यंत कोरोनाच्या आजारांपासून वाचण्यासाठी उपाय शोधत असून लवकरच कोरोना व्हायरसवर लस किंवा औषधाचे संशोधन केले जाईल. असेही त्या म्हणाल्या.
(हे पण वाचा-घामोळ्यांनी हैराण असाल तर; 'या' घरगुती उपायांनी खाज, पुळ्यांसह जळजळ होईल दूर)