युद्ध जिंकणार! आता देशात तयार होणार कोरोनाचं सगळ्यात स्वस्त आणि प्रभावी औषध
By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2020 11:24 AM2020-07-24T11:24:14+5:302020-07-24T11:33:04+5:30
CoronaVirus News & Latest Updates : भारतात कोरोना व्हायरसशी लढत असलेल्या रुग्णाच्या उपचारांसाठी औषध लॉन्च केले जाणार आहे. हे खूप स्वस्त औषध आहे.
कोरोना व्हायरसच्या संक्रमणामुळे जगभरातील सर्वच देशातील लोकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. कारण कोरोना रुग्णांची संख्याही कमी होत नाही. तसंच दिवसेंदिवस कोरोनामुळे होत असलेल्या मृतांचा आकडा वाढत आहे. जगभरातील शास्त्रज्ञांचे कोरोनाची लस शोधण्यासाठी संशोधन सुरू आहे. दरम्यान या कोरोनाच्या माहामारीत दिलासादायक माहिती समोर येत आहे. भारतात कोरोना व्हायरसशी लढत असलेल्या रुग्णाच्या उपचारांसाठी औषध लॉन्च केले जाणार आहे. हे खूप स्वस्त औषध आहे.
माहामारीशी लढण्यासाठी प्रभावी ठरत आहे. वैज्ञानिक आणि औद्योगिक अनुसंधान परिषद (CSIR)ने कोरोना रुग्णांच्या उपचारांसाठी तयार केलेले फेविपिराविर हे औषध लॉन्च करण्यासाठी सिप्ला कंपनी पूर्णपणे तयार आहे. तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार मुळाच्या जपानच्या फुजी फार्माद्वारे विकसित करण्यात आलेल्या फेविपिराविरच्या वैद्यकिय परिक्षणादरम्यान चांगले परिणाम दिसून आले आहेत. सौम्य लक्षणं असलेल्या रुग्णांना हे औषध देण्यात आलं होतं. CSIR ने स्थानिक पातळीवर उपलब्ध असलेल्या रसायनांच्या साहाय्याने स्वस्तात हे औषध तयार केले आहे.
सिप्लाने या औषधाच्या निर्मीतीला सुरूवात केली आहे. भारतातील औषध महानियंत्रक (DCGI)कडून औषध बाजारात उपलब्ध करून देण्यासाठी परवागनी मागितली आहे. या औषधाला आपातकालिन स्थितीत वापरण्यास परवागनी मिळाली आहे. सिप्ला कंपनी आता कोरोना व्हायरसच्या संक्रमणानेग्रस्त असलेल्या लोकांचे उपचार करण्यासाठी या औषधाची मदत घेणार आहे. या संदर्भात सीएसआयआर आयआयसीआरचे प्रमुख एस. चन्द्रशेखर यांनी माध्यामांना दिलेल्या माहितीनुसार हे औषध खूप स्वस्त आणि प्रभावी ठरणार आहे. सिप्ला कमी कालावधीत जास्त औषधांचे उत्पादन करण्याच्या प्रयत्नात आहे.
दरम्यान देशात कोरोनाचा कहर पाहायला मिळत असून रुग्णांची संख्या ही सातत्याने वाढतच आहे. देशातील परिस्थिती गंभीर झाली आहे. गेल्या 24 तासांत रुग्णसंख्येत विक्रमी वाढ झाली असून चिंता वाढवणारी आकडेवारी समोर आली आहे. रुग्णसंख्येने पुन्हा एकदा रेकॉर्ड मोडला आहे. देशातील रुग्णसंख्येने आतापर्यंतचा उच्चांक गाठला आहे. गेल्या 24 तासांत देशभरात कोरोनाचे तब्बल 49,310 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 740 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
भारतातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढला असून रुग्णांची एकूण संख्या तब्बल 12 लाखांवर पोहोचली आहे. आरोग्य मंत्रालयाने याबाबत माहिती दिली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने शुक्रवारी (24 जुलै) दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या 24 तासांत 49,310 नवीन कोरोनाग्रस्त आढळून आले आहेत. त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 12 लाख 87 हजारांवर पोहोचली असून कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा 30,601 वर पोहोचला आहे.
व्हिटामीन्समुळे कमी होत आहे 'या' देशातील कोरोना विषाणूंचे संक्रमण; तज्ज्ञांनी सांगितले मागचं कारण
भय इथले संपत नाही! देशात कोरोनापेक्षाही घातक आजाराचा शिरकाव; 'या' शहरात आढळला रुग्ण