CoronaVirus News : कोरोना संक्रमणाविरूध्द लढणाऱ्या सायकोटीनपासून शरीराला असू शकतो धोका
By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2020 10:13 AM2020-05-02T10:13:06+5:302020-05-02T10:15:00+5:30
CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोना व्हायरसच्या संक्रमणाविरुध्द लढत असलेले सायटोकाईन प्रोटीन शरीरातील रोगप्रतिकारकशक्तीसाठी नुकसानकारक ठरू शकतं.
कोरोनाचा प्रसार जगभरात वाढत चालला आहे. कोरोना व्हायरसची लागण होऊन जगभरातून २ लाखांपेक्षा जास्त लोकांचा बळी गेला आहे. कोरोनावर लस किंवा औषधं शोधण्यासाठी वेगवेगळ्या देशातील शास्त्रज्ञांचे प्रयत्न सुरू आहेत. संशोधनादरम्यान कोरोनाबाबत वेगवेगळ्या गोष्टी समोर येत आहेत. अलिकडे करण्यात आलेल्या संशोधनात असं दिसून आलं की, कोरोना व्हायरसच्या संक्रमणाविरुध्द लढत असलेले सायटोकाईन प्रोटीन शरीरातील रोगप्रतिकारकशक्तीसाठी नुकसानकारक ठरू शकतं.
चीनमधील आर्मी मेडिकल युनिव्हरसिटीच्या शास्त्रज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार कोरोना रुग्णांच्या शरीरातील इम्यून सिस्टीम डॅमेज झाल्यास रोगप्रतिकारकशक्ती कमी होऊन रुग्णांची स्थिती अधिक गंभीर होऊ शकते. जर्नल फ्रंटीअर इन इम्युनोलॉजी यात नमुद केलेल्या माहितीनुसार शरीरात टी सेल्स पांढऱ्या पेशींप्रमाणे असतात. टी सेल्सच्या कमतरतेमुळे रोगप्रतिकारकशक्तीवर परिणाम होतो.
एका रिसर्चमध्ये असं दिसून आलं की, सायकोटीन प्रोटीन इन्फेक्शनला रोखण्यासाठी काम करत असतं. पण हे प्रोटीन जास्त प्रमाणात वाढल्यानंतर शरीरातील पेशींसाठी नुकसानकारक ठरू शकतं. याला सायंटिफीक भाषेत ‘साइटोकॉइन स्टॉर्म’ म्हणतात. कोरोना टी सेल्सवर आक्रमण न करता सायकोटाइनच्या उत्सर्जनावर जास्त भर देत असल्यामुळे टी सेल्सवर परिणाम होऊन टी सेल्स आपोआप नष्ट होऊ लागतात. त्यामुळे रोगप्रतिकारकशक्ती कमजोर होते.
यासाठी उपचारादररम्यान टी सेल्सकडे लक्ष देणं गरजेंच आहे. असा दावा संशोधकांनी केला आहे. आत्तापर्यंत केल्या गेलेल्या उपचारपद्धतीत श्वसनप्रणालीवर अधिक जोर दिला जात होता. योंनवेन चेन या संशोधकाने दिलेल्या माहितीनुसार ज्या रुग्णांच्या शरीरात टि सेल्सची कमतरता आहे. अशा रुग्णांवर अधिक लक्ष देणं गरजेंच आहे. कारण टी सेल्स सुरूवातीपासून संक्रमणाविरूध्द लढतात. विशेष म्हणजे या सेल्यच्या एंटीबॉडीज सुद्धा तयार झालेल्या नसतात. (हे पण वाचा-छातीत दुखणं ठरू शकतं जीवघेणं, एंजायनामुळे येणारा हार्ट अटॅक टाळण्याासाठी वापरा 'हे' उपाय)
शास्रज्ञांनी ५२२ रुग्णांवर केलेल्या संशोधनातून असा दावा केला आहे की, टी सेल्सचा वापर करून इन्फेक्शन आणि आजाराबाबात अधिक माहिती मिळू शकते. यातून नवीन औषधांची निर्मीती केली जाऊ शकते. जेणेकरून टी सेल्सची संख्या वाढून कार्यक्षमता वाढवली जाऊ शकते. (हे पण वाचा-कोरोनाच नाही इतरही आजारांना निमंत्रण देऊ शकतो उन्हाळा; 'या' उपायांनी तब्येत सांभाळा)