CoronaVirus: मास्क आणि सोशल डिस्टेंसिंगचा काही उपयोग नाही; जर रोज करत असाल 'या' चुका
By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2020 12:22 PM2020-06-14T12:22:34+5:302020-06-14T12:24:10+5:30
या चुकांमुळे सोशल डिस्टेंसिंग आणि मास्क लावून काहीही उपयोग होणार नाही. कारण वेगवेगळ्या मार्गातून संक्रमणाचा धोका वाढत आहे.
कोरोनाच्या माहामारीमुळे सर्वत्र नैराश्याचे वातावरण पसरले आहे. कोरोना व्हायरसच्या वेगाने होत असलेल्या संक्रमणामुळे लोकांचे आयुष्य खूपच बदलून गेले आहे. लोक या जीवघेण्या व्हायरसपासून बचावासाठी सावधगिरी बाळगत आहेत. तसंच काही लोक चुकाही करत आहेत. या चुकांमुळे सोशल डिस्टेंसिंग आणि मास्क लावून काहीही उपयोग होणार नाही. कारण वेगवेगळ्या मार्गातून संक्रमणाचा धोका वाढत आहे.
मास्क नाकाच्या खाली लावणं
या जीवघेण्या व्हायरसपासून बचावासाठी मास्कचा वापर करणं गरजेचं आहे. फक्त मास्कचा वापर नाही तर मास्क योग्य पद्धतीने लावणंही तितकंच गरजेच आहे. काही लोक नाकाच्या खाली मास्क लावतात. त्यामुळे नाकाद्वारे संक्रमण पसरण्याचा धोका असतो. म्हणून तोंड ,नाक झाकलं जाईल अशा पद्धतीने मास्क लावा.
सॅनिटायजरचा जास्त वापर
काही लोक गरजेपेक्षा जास्त सॅनिटायजरचा वापर करतात. जेव्हा तुमच्याकडे पाणी आणि साबणाची उपलब्धता असते. तेव्हा सॅनिटायझरचा वापर करण्याची काहीही आवश्यकता नाही. ऑफिसमध्ये किंवा घरात पाण्याची उपलब्धता असल्यास सॅनिटायजरचा वापर करू नका.
मास्क सतत हात लावणं
तुम्ही पाहिलं असेल अनेक लोक मास्क घातल्यानंतर अनेकदा मास्कला स्पर्श करतात. त्यामुळे नुकसान होऊ शकतं. आपला मास्क कोणालाही वापरण्यास देऊ नका. संक्रमण टाळण्यासाठी एकदा मास्क लावल्यानंतर पुन्हा हात लावू नका.
बाहेरून आणलेलं सामान लगेचंच वापरणं
नेहमी बाहेरून कोणतंही सामान आणल्यानंतर डिइंफेक्टंट स्पेच्या मदतीने शिंपडा. त्यानंतर सामानाचा वापर करा. भाज्या आणि फळांना डिइंफेक्टंट वापरण्यापेक्षा गरम पाण्याने स्वच्छ धुवून मगच वापर करा. जेणेकरून वस्तूंमार्फत संक्रमण पसरणार नाही.
कोरोनाची माहामारी कधी नष्ट होणार? 'या' ३ पद्धती ठरतील प्रभावी; जाणून घ्या तज्ज्ञांचे मत
Coronavirus : नवा खुलासा! सर्दी-खोकल्याआधीही दिसू लागतात कोरोनाची 'ही' लक्षणे, वेळीच व्हा सावध!