CoronaVirus News : कोरोनापासून बचावाासाठी 'ही' योगासनं करून फुप्फुसांना ठेवा निरोगी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2020 12:26 PM2020-05-04T12:26:48+5:302020-05-04T12:30:49+5:30

घरच्याघरी ही योगासन करून तुम्ही फुप्फुसं चांगली ठेवू शकता. 

CoronaVirus News Marathi : Keep the lungs healthy by doing yogasana pose to prevent corona myb | CoronaVirus News : कोरोनापासून बचावाासाठी 'ही' योगासनं करून फुप्फुसांना ठेवा निरोगी

CoronaVirus News : कोरोनापासून बचावाासाठी 'ही' योगासनं करून फुप्फुसांना ठेवा निरोगी

Next

जगभरात कोरोना व्हायरसचा प्रसार वेगाने होत आहे. भारतातसुद्धा कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. कोरोनाला रोखण्यासाठी रोगप्रतिकारकशक्ती चांगली असणं आवश्यक आहे. कोरोना व्हायरसचा परिणाम शरीरातील अवयावंवर होतो. त्यामुळे फुप्फुसांचे, मेंदूचे, हृदयाचे कार्य सुरळीत होत नाही. सतत रक्तवाहिन्यांमध्ये सुद्धा व्हायरसचा प्रसार झाल्यामुळे रक्तपुरवठा व्यवस्थित होत नाही. आज आम्ही तुम्हाला काही योगासन सांगणार आहोत. घरच्याघरी ही योगासन करून तुम्ही फुप्फुसं चांगली ठेवू शकता. 

उष्ट्रासन

उष्ट्रासन करण्यासाठी पायांना लांब करून बसा आणि डाव्या पायाच्या गुडघ्याला वाकवा. तुमच्या टाचा  मागच्या भागाला टच होईल असे ठेवा.  हे करत असताना  श्वास सोडत असताना कमरेच्या मागच्या भागाला  मागे ढकला मग उजव्या हाताने डाव्या पायाला आणि डाव्या हाताने उजव्या पायाची टाच पकडण्याचा प्रयत्न करा.किंवा समान पकडलं तरी चालेल. या गोष्टीकडे लक्ष असू द्या की खाली वाकत असताना मानेला त्रास होईल अशी हालचाल असू नये हे आसन ३ ते ४ वेळा दररोज करा. 

धनुरास

 धनुरसन रिकाम्या पोटावर केले पाहिजे आणि सकाळी धनुरसन करताना शरीरावर “धनुष्य” आकार दिसतो, म्हणून या आसनला धनुरसन म्हणतात. धनुरसन सुरू करण्यासाठी सर्व प्रथम चटई वर पडून रहा. मग आपली हनुवटी जमिनीवर लावा. आपले दोन्ही पाय पायांच्या दिशेने ठेवा आणि त्यांना कमर जवळ जमिनीवर ठेवा. आपल्या दोन हाताचे तळवे आकाशाकडे वाकले पाहिजे. आता पुढे, दोन्ही गुडघे टेकून दोन्ही पाय वर करा. जेव्हा आपल्या दोन्ही पायांचा मागचा भाग वर येईल तेव्हा आपले दोन्ही पाय दोन्ही पायांवर धरून ठेवा. आता हळूहळू शरीराच्या आत एक दीर्घ श्वास घ्या आणि आपले दोन्ही पाय मागे खेचा. आणि त्याच वेळी जमिनीवर दोन्ही मांडी वाढवण्याचा प्रयत्न करा. (हे पण वाचा-लॉकडाऊनमुळे वॅक्सिंगऐवजी रेजर?; मग खाज टाळण्यासाठी 'या' उपायांचा करा वापर)

भुजंगासन

पोटावर झोपावे हात कंबरेजवळून जमिनीवर टेकवावेत. हातांच्या आधारे शरीर जमिनीपासून वर उचलून घ्यावे. थोडावेळ याच पोझिशनमध्ये राहा.  दररोज ८ ते १० मिनिट हे आसन केल्यास विविध प्रकारच्या आरोग्य समस्या नियंत्रित केल्या जाऊ शकतात. या आसनांमुळे तुमचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होईल परिणामी  कोरोनापासून स्वतःला वाचवू शकता. (हे पण वाचा-CoronaVirus News : अस्थमा रुग्णांना कोरोनाच्या संक्रमणाचा सर्वाधिक धोका, 'असा' करा बचाव)

Web Title: CoronaVirus News Marathi : Keep the lungs healthy by doing yogasana pose to prevent corona myb

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.