कोरोनाची लस मिळाल्यानंतरही मास्कचा वापर करावा लागणार? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत

By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2020 04:41 PM2020-07-31T16:41:45+5:302020-07-31T16:49:27+5:30

CoronaVirus News & Latest Updates : २१ पेक्षा जास्त लसी या क्लिनिकल ट्रायलच्या शेवटच्या टप्प्यात आहेत.  लस लवकरत लवकर तयार होईल अशी आशा व्यक्त केली जात आहे. 

CoronaVirus News Marathi : People should use face mask after covid vaccine | कोरोनाची लस मिळाल्यानंतरही मास्कचा वापर करावा लागणार? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत

कोरोनाची लस मिळाल्यानंतरही मास्कचा वापर करावा लागणार? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत

googlenewsNext

जगभरात कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे.  जगभरातील लोकांना कोरोनाची लस कधी मिळणार याची प्रतिक्षा आहे.  जगभरात सध्या १०० पेक्षा जास्त कोरोनाच्या लसींवर परिक्षण केले जात आहे. तज्ज्ञ, संशोधक कोरोनाची लस लवकरात लवकर तयार करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. २१ पेक्षा जास्त लसी या क्लिनिकल ट्रायलच्या शेवटच्या टप्प्यात आहेत.  लस लवकरत लवकर तयार होईल अशी आशा व्यक्त केली जात आहे. 

कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी ५ संभाव्य लसी या शेवटच्या टप्प्यात पोहोचल्या आहेत. अंतिम टप्यात वेगवेगळ्या वयोगटातील लोकांना लस दिली जाणार आहे. भारतात आयसीएमआर आणि भारत बायोटेकद्वार कोवॅक्सिन  या लसीची चाचणी केली जात आहे. कोवॅक्सिन व्यतिरिक्त जायडस कॅडिला ही लस अंतिम टप्यात पोहोचली आहे.  पण लस आल्यानंतर कोरोना विषाणूंपासून बचाव होईल का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. 

साइंस इनसाइडरमध्ये छापण्यात आलेल्या एका रिपोर्टनुसार लस आल्यानंतर कोरोनाचा धोका पूर्णपणे टळेल असं म्हणणं योग्य ठरणार नाही. कोणत्याही आजाराची लस  तयार करण्यासाठी अनेक वर्षाचा कालावधी लागतो.  पण कोरोनाचा वेगाने होणारा पसार पाहता आपातकालीन स्थितीत कोरोना विषाणूंचे संक्रमण नियंत्रणात घेण्यासाठी सर्वच ठिकाणी जलद गतीने लस तयार करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.

तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार प्रत्येक भौगोलिक स्थिती आणि वातावरणामुळे सगळ्या वयातील लोकांमध्ये कोरोनाशी लढण्यासाठी रोगप्रतिकारकशक्ती मजबूत व्हायला हवी. लसीमुळे कोरोनाचं संक्रमण पुन्हा होण्याची शक्यता कमी असते. लसीकरणामुळे लक्षणंही तीव्रतेने उद्भवत नाहीत. पण लस आल्यानंतर पूर्णपण सुरक्षित राहता येईल का हे सांगण  कठीण आहे.  जागतिक आरोग्य संघटनेनं दिलेल्या माहितीनुसार लसी आता १० टक्क्यांपर्यंत यशस्वी झाल्या आहेत. लसीकरणाचे परिणाम आणि दुष्परिणाम सध्या समजून घेतले जात आहेत. कोरोना संक्रमणाला रोखण्यासाठी ६० ते ७० टक्के  लस प्रभावी असणं गरजेचं आहे. 

बेयलर कॉलेज ऑफ मेडिसिनमधील तज्ज्ञ मारिया एलेना बोट्टाती यांनी दिलेल्या माहितीनुसार जर लस मिळाली तर मास्कचा वापर करू नये असं म्हणणं योग्य ठरणार नाही. एखाद्या जादूप्रमाणे लस आल्याने कोरोना विषाणू नष्ट होईल असा गैरसमज लोकांनी ठेवू नये. सध्या प्रभावी लस तयार करण्यावर भर दिला जात आहे. लस तयार करण्याची प्रक्रिया ही दीर्घकाळ चालणारी असू शकते. त्यामुळे कोरोनाशी सामना करण्यासाठी शारीरिक स्वच्छता, मास्कचा वापर, सोशल डिस्टेंसिंगच्या नियमांचे पालन करायलाच हवे.

कोरोना व्हायरसबाबत WHO चा पुन्हा इशारा, तरूणांना दिला 'हा' सल्ला!

रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यासाठी  FSSI दिल्या 'या' टिप्स; कोरोनाशी लढण्यासाठी ठरतील प्रभावी

Web Title: CoronaVirus News Marathi : People should use face mask after covid vaccine

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.