कोरोनाचं अजून एक भयानक रूप माणसांमध्ये फैलावण्याचा धोका, चिंता वाढवणारी माहिती समोर
By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2020 07:06 PM2020-10-15T19:06:30+5:302020-10-15T19:12:12+5:30
CoronaVirus News & Latest Updates : डेली मेलच्या एका रिपोर्टनुसार कोरोना व्हायरसच्या या स्ट्रेनमुळे चीनमधील डुकरांना उलट्या आणि जुलाब यांसारख्या समस्यांचा सामना करावा लागत होता.
जीवघेण्या कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातलं आहे. कोरोना व्हायरसपासून बचावासाठी जगभरातील शास्त्रज्ञांचे प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान कोरोनाच्या प्रसाराबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. कोरोना व्हायरसचे आणखी एक रुप (स्ट्रेन) डुकरांना संक्रमित करत होते. आता याचा धोका माणसांनाही असू शकतो. एका अभ्यासातून समोर आलेल्या माहितीनुसार कोरोना व्हायरसच्या या रुपामुळे माणसांमध्ये संक्रमण पसरू शकतो. कोरोना व्हायरसच्या या रुपानं २०१६ मध्य डुकरांमध्ये आजार पसरवला होता.
डेली मेलच्या एका रिपोर्टनुसार कोरोना व्हायरसच्या या स्ट्रेनमुळे चीनमधील डुकरांना उलट्या आणि जुलाब यांसारख्या समस्यांचा सामना करावा लागत होता. सुरूवातीला वटवाघळांमधून हा स्ट्रेन डुकरांमध्ये पोहोचला असावा अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. अमेरिकेच्या वैज्ञानिकांनी केलेल्या अभ्यासातून समोर आलं की, कोरोना व्हायरसच्या या स्ट्रेनमुळे माणसांच्या श्वसनतंत्र, यकृत आणि आतड्यांमध्येही व्हायरसचा प्रसार होऊ शकतो. असं दिसून आलं की, रेमिडसिविर या औषधाचा वापर कोरोनाच्या या स्ट्रेनसाठी परिणामकारक ठरतो.
कोरोनाच्या या स्ट्रेनचे नाव Swine Acute Diarrhoea Syndrome Coronavirus आहे. डुकरांच्या पिल्लांसाठी हा व्हायरस जीवघेणा ठरू शकतो. तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार हा व्हायरस कोरोना व्हायरसच्या प्रजातींपैंकीच एक आहे. फक्त याचे जीन्स वेगवेगळे आहेत. आतापर्यंत जवळपास ३ कोटींपेक्षा जास्त लोक कोरोना संक्रमित झाले असून १० लाखांपेक्षा जास्त लोकांचा कोरोनामुळे मृत्यूचा सामना करावा लागला आहे.
हिवाळ्याच्या दिवसांत कोरोना आणखी वेगाने पसरणार का?
श्वसन क्रीयेद्वारे बाहेर पडणाऱ्या थेंबांच्या माध्यमाने (Respiratory droplets) थंडीच्या दिवसांत तो पसरण्याचा वेग अधिक वाढेल. या थेंबांच्या संपर्कात आल्याने कोरोना व्हायरसचा धोका वाढण्याची शक्यता एका ताज्या संशोधनात व्यक्त करण्यात आली आहे. हे संशोधन Nano Letters जर्नलने प्रसिद्ध केले आहे. खुशखबर! एप्रिल २०२१ पर्यंत कोरोनाची सुरक्षित अन् प्रभावी लस मिळणार, अमेरिकन तज्ज्ञांचा दावा
या अहवालांत सांगण्यात आले आहे, की सोशल डिस्टंसिंगसाठी ज्या नियमांचे पालन केले जात आहे, ते पुरेसे नाही. या संशोधनातील एक संशोधक यानयिंग झू यांनी सांगितले, की हे थेंब सहा फुटांपेक्षाही अधिक दूर जातात हे त्यांच्या संशोधनातील अधिकांश प्रकरणांत दिसून आले आहे. एवढे अंतर अमेरिकेच्या CDCने (सेंटर फॉर डिसीज कंट्रोल) सुरक्षित असल्याचे म्हटले आहे. काळजी वाढली! निरोगी, तरूणांना २०२२ पर्यंत कोरोना लस मिळणं अशक्य; WHO तज्ज्ञांचा दावा
थंड ठिकाणी धोका अधिक -
घर आणि इमारतीत वॉक-इन फ्रिज आणि कूलर अथवा जेथे तापमान कमी आणि आर्द्रता अधिक असते, अशा ठिकाणी हे थेंब 6 मीटरपर्यंत (19.7 फूट) जाऊ शकतात. यानंतर ते जमिनीवर पडतात. अशात, हा व्हायरस काही मिनिटांपासून ते एक दिवसापर्यंत संक्रमक होऊ शकतो, असे झू म्हणाले.
काळजी घेणे आवश्यक -
गरमीच्या दिवसांत एअरोसॉल ट्रान्समिशन अधिक धोकादायक असते, तर थंडीच्या दिवसांत थेंब. सर्वात महत्वाचे म्हणजे, आपण जेथे राहतो, तेथील तापमान आणि हवामानाप्रमाणे आपल्याला आपला बचाव करावा लागेल. जेणे करून व्हायरसच्या पसरण्याला आळा घालता येईल. थंड आणि गरम खोलीत सोशल डिस्टंसिंग अधिक असायला हवे, असे संशोधकांनी म्हटले आहे.