व्यसनांमुळे नाही तर 'या' २ कारणांमुळे पुरूषांना कोरोना विषाणूंचा धोका जास्त

By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2020 12:20 PM2020-05-14T12:20:50+5:302020-05-14T12:28:48+5:30

पुरूषांना कोरोनाचे संक्रमण होण्यामागे असलेली नवीन कारणं समोर आली आहेत.

CoronaVirus News Marathi : Testicles may make men more vulnerable to coronavirus myb | व्यसनांमुळे नाही तर 'या' २ कारणांमुळे पुरूषांना कोरोना विषाणूंचा धोका जास्त

व्यसनांमुळे नाही तर 'या' २ कारणांमुळे पुरूषांना कोरोना विषाणूंचा धोका जास्त

Next

(image credit- Telegraph)

कोरोना व्हायरसचे संक्रमण झालेल्या लोकांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतं चालले आहे. कोरोना व्हायरसची लागण होऊन लाखो लोकांचा मृत्यू झाला आहे. अलिकडे करण्यात  आलेल्या संशोधनात असं दिसून आलं की, कोरोनाची लागण झालेल्यांमध्ये महिलांपेक्षा पुरुषांचे प्रमाण जास्त आहे. याचं कारणं पुरूषांना असलेली मद्यपान आणि धुम्रपानाची सवय हे सांगितलं जात होतं.  पुरूषांना कोरोनाचे संक्रमण होण्यामागे असलेली नवीन कारणं समोर आली आहेत. पुरूषांमध्ये ACE2  या प्रोटीनमुळे कोरोनाचा धोका जास्त असतो. 

अलिकडे करण्यात आलेल्या  संशोधनात ५ देशांच्या आकडेवारीची तुलना करण्यात आली होती. त्यात फ्रान्स, अमेरिका,  दक्षिण कोरिया या देशांचा समावेश होता. त्यात कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांमध्ये पुरुषांचे प्रमाण ५० टक्के जास्त होते. तसंच या संशोधनानुसार कोरोनाबाधित महिलांमध्ये व्हायरस नष्ट होण्यासाठी ४ दिवसांचा कालावधी लागतो. तर पुरूषांमध्ये ६ ते ८ दिवसांचा कालावधी लागतो. 

पुरूषांमध्ये ACE2 प्रोटीनचं प्रमाण जास्त असतं.   

कोरोना व्हायरसचा प्रसार होण्यासाठी ACE2 प्रोटीन अनुकूल ठरतं.  कारण व्हायरस सुद्धा आरएनए म्हणजे राइबोन्यूक्लिक एसिड पासून तयार झालेले असतात. जे एका प्रकारचं प्रोटीन आहे.  कोरोना व्हायरसचा शरीरात प्रवेश  झाल्यानंतर  ज्या पेशी ACE2 प्रोटीन   रिलीज करतात, अशा पेशींपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत असतो. हे प्रोटीन साधारणपणे फुफ्फुसं, हृदय आणि आतड्यांमध्ये दिसून येतं. ACE2 प्रोटीन टेस्टिसमध्ये असते.  तुलनेने महिलांच्या अंडाशयात हे प्रोटीन्स कमी प्रमाणात दिसून येतात. 

धुम्रपान जास्त करणं

न्यु इंग्लँड जर्नल ऑफ मेडिसिनमध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या रिसर्चनुसार कोरोना व्हायरसची लागण होऊन मृत्यू झालेल्या लोकांपैकी २६ टक्के लोक धुम्रपानाचे व्यसन करत होते.  महिलांच्या तुलनेत पुरूषांमध्ये धुम्रपानाचे प्रमाण अधिक आहे.  रिसर्चमधील माहितीनुसार धुम्रपान करत असताना सर्वाधिकवेळा हात तोंडाजवळ जातो. याशिवाय धुम्रपान करत असलेल्यांची फुफ्फुसं कमकुवत असल्यामुळे पुरुषांना संक्रमणाचा धोका जास्त असतो. 

हात धुण्याची सवय

कोरोना व्हायरसपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी साफ-सफाईकडे लक्ष  देणं गरजेंचं आहे.  स्वच्छतेच्या बाबतीत महिलांच्या तुलनेत पुरूष मागे आहेत. तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार स्वच्छतेकडे फारसं लक्ष नसल्यामुळे पुरूषांना कोरोनाच्या संक्रमणचा धोका जास्त असतो. 

(दातदुखीमुळे अस्वस्थ होण्यापेक्षा आधीच 'या' उपायांनी दात, हिरड्या ठेवा निरोगी)

(घरी जाताना सोबत येऊ शकतो कोरोना, संसर्ग टाळण्यासाठी प्रवासादरम्यान 'अशी' घ्या काळजी)

Web Title: CoronaVirus News Marathi : Testicles may make men more vulnerable to coronavirus myb

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.