भारताने शोधले कोरोनाचे उपचार; 'या' औषधांनी बरे होत आहेत रुग्ण, आईसीएमआरची परवानगी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2020 10:04 AM2020-06-10T10:04:56+5:302020-06-10T10:34:37+5:30
एलोपेथी आणि आयुर्वेदिक घटकांपासून तयार झालेल्या या औषधांनी गंभीर स्थितीत असलेल्या कोरोना रुग्णांवर उपचार केले जाऊ शकतात.
कोरोनाच्या माहामारीचा कहर दिवसेंदिवस जगभरात वाढत चालला आहे. आता आईसीएमआर ने कोरोना रुग्णांच्या उपचारांसाठी आयुर्वेदिक घटकांपासून औषधं तयार करण्याच्या प्रक्रियेला हिरवा कंदिल दाखवला आहे. एलोपेथी आणि आयुर्वेदिक घटकांपासून तयार झालेल्या या औषधांनी गंभीर स्थितीत असलेल्या कोरोना रुग्णांवर उपचार केले जाऊ शकतात.
आयुर्वेद तज्ज्ञ प्राध्यापक राजकुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार या औषधांच्या निर्मितीतील पहिल्या टप्प्यातील औषधं फक्त कोविड रुग्णालयातील रुग्णांसाठी पुरवण्यात येणार आहेत. काही दिवसांनंतर ही औषध बाजारात उपलब्ध होण्याची शक्यता आहे. ऋषिकेश येथिल आयुर्वेदाचार्य योगीराज निर्वाण देव यांच्या सहकार्याने ही औषधं तयार केली जात आहेत. १२ आयुर्वेदिक आणि १ एलोपेथी घटक मिळून पहिला काढा तयार करण्यात आला. याचे सकारात्मक परिणाम दिसून आले. त्यानंतर या काढ्यापासून औषध तयार करण्यात आलं आहे.
कोरोनाने संक्रमित असलेल्या ४० रुग्णांवर या औषधाचे परिक्षण करण्यात आले होते. त्यात ९ रुग्ण ६० वर्षावरील वयोगटातील होते. त्यांना दमा, डायबिटिस, कॅन्सर आणि हृदयाचे आजार होते. हे औषध दिल्यानंतर २६ रुग्णांचा रिपोर्ट पाचव्या दिवशी निगेटिव्ह आला. चार रुग्ण १० व्या दिवशी बरे झाले. आता १० रुग्णांवर अजुनही उपचार सुरू आहेत. हा रिपोर्ट आयसीएमआरकडे पाठवल्यानंतर हे औषध तयार करण्यासाठी परवागनी देण्यात आली आहे.
या औषधाबाबत मुख्यमंत्री आदित्यनाथ आणि आरोग्यमंत्र्यांना माहिती देण्यात आली आहे. त्यांनी हे औषध कोविड रुग्णालयासाठी तयार करण्याचे सांगितले आहे. संक्रमणाची तीव्रता कमी करण्यासाठी तसंच रुग्णांची संख्या कमी करण्यासाठी या औषधांसाठी आवश्यक असलेल्या घटकांची उपलब्धता पाहून बाजारात उपलब्ध करण्यात येणार आहे.
Coronavirus: गुड न्यूज! भारतात ‘या’ ८ औषधांच्या उपचाराने १ लाखाहून अधिक रुग्ण कोरोनामुक्त
रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यासाठी घरच्याघरी रोज प्या 'असा' काढा; संसर्गापासून रहाल दूर