त्वचेवरचे 'ते' डाग असू शकतात कोविड 19 चे लक्षणं; कोरोना संसर्ग झाल्यास जाणवतो असा त्रास

By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2020 03:51 PM2020-07-15T15:51:16+5:302020-07-15T16:56:33+5:30

नॅशनल हेल्थ सर्विसने कोविड 19 च्या लक्षणांमध्ये या नवीन लक्षणाचा समावेश करावा असे निवेदन देण्यात आले आहे.

CoronaVirus News : New symptoms of Covid 19; Know in time to prevent infection | त्वचेवरचे 'ते' डाग असू शकतात कोविड 19 चे लक्षणं; कोरोना संसर्ग झाल्यास जाणवतो असा त्रास

त्वचेवरचे 'ते' डाग असू शकतात कोविड 19 चे लक्षणं; कोरोना संसर्ग झाल्यास जाणवतो असा त्रास

Next

(Image credit- medical News Today)

कोरोना विषाणूने जगभरात कहर केला आहे.  सर्वाधिक कोरोना रुग्ण असलेल्या देशांच्या यादीत आता भारत तिसऱ्या क्रमांकावर असून अमेरिका, ब्राझिल आणि रशियामध्ये कोरोना विषाणूंचे संक्रमण झपाट्याने पसरत आहे.  ब्रिटेनच्या वैद्यकिय तज्ज्ञांनी कोरोना व्हायरसच्या नवीन लक्षणाबाबत महत्वपूर्ण माहिती दिली आहे. तसंच नॅशनल हेल्थ सर्विसने कोविड 19 च्या लक्षणांमध्ये या नवीन लक्षणाचा समावेश करावा असे निवेदन देण्यात आले आहे.

तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार त्वचेवर येणारे चट्टे (Skin Rashes)  हे कोरोना विषाणूंच्या संक्रमणाचं लक्षण असू शकते. सगळ्यात आधी तज्ज्ञांनी कोरोना विषाणूंच्या लक्षणांवर अभ्यास केला. त्यातून असं दिसून आलं की ११ पैकी एका रुग्णाच्या त्वचेवर लाल चट्टे येण्याची समस्या उद्भवत होती. या अभ्यासातील प्रमुख संशोधक डॉ. मारियो फाल्ची यांनी दिलेल्या माहितीनुसार कोरोना रुग्णांना अनेक आठवड्यापर्यंत या समस्यांचा सामना करावा लागतो. 

किंग्स कॉलेज लंडनच्या २० हजार लोकांवर हे संशोधन करण्यात आले होत. त्यात समाविष्ट असलेल्या लोकांना कोरोनाचे संक्रमण झाले होते. यात असं दिसून आलं की कोरोनाचं संक्रमण झालेल्या ९ टक्के लोकांना त्वचेवर चट्टे येण्याच्या समस्येचा सामना करावा लागला होता.  ८ टक्के लोकांमध्ये कोरोनाच्या इतर लक्षणांसोबत लाल चट्टे येण्याची समस्या दिसून आली होती. 

सध्या ब्रिटेनच्या नॅशनल हेल्थ सर्विसच्या सुचीत कोरोना विषाणूंची ताप, कफ, वास न समजणं या लक्षणांचा समावेश आहे.  भारताच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या वेबसाईडवर कोविड19 च्या लक्षणांबाबत माहिती दिली आहे. त्यात श्वास घ्यायला त्रास होणं, सर्दी, नाक गळणं, घसा दुखणं, अतिसार या लक्षणांचा समावेश आहे. 

डब्ल्यूएचओने दिलेल्या गाईडलाईन्सनुसार रुग्ण जर घरी एकटा राहत असेल आणि  छातीत दुखणं, ताप, सर्दी , खोकला असेल तर लवकरात लवकर आयसोलेट करायला हवं. कारण जर रुग्णांची रोगप्रतिकारकशक्ती चांगली असेल तर हळूहळू लक्षणांची तीव्रता कमी झालेली दिसून येईल. या दरम्यान संतुलित आहार घ्या. पौष्टीक पदार्थांचे सेवन करा.  दिवसातून ३० मिनिट वेळ काढून व्यायाम करा.

कोरोना विषाणूंचा रहस्यमय हल्ला; वेगवेगळं राहत असूनही ३५ दिवसात ५७ लोकांना कोरोनाची लागण

खास बनावटीच्या सोन्याच्या मास्कला मागणी वाढली; पुण्याच्या नेकलेस मास्कची खासियत न्यारी

Web Title: CoronaVirus News : New symptoms of Covid 19; Know in time to prevent infection

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.