काळजी वाढली! कोरोना विषाणूपासून वाचलेल्या लोकांना 'या' गंभीर आजाराचा धोका, तज्ज्ञांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2020 12:40 PM2020-06-15T12:40:51+5:302020-06-15T12:42:34+5:30

तज्ज्ञांनी केलेल्या दाव्याप्रमाणे कोरोना व्हायरसपासून बचाव झाल्यानंतरही तुम्हाला वेगवेगळ्या सामना करावा लागू शकतो. 

CoronaVirus News : Now coronavirus may get you diabetes for lifetime | काळजी वाढली! कोरोना विषाणूपासून वाचलेल्या लोकांना 'या' गंभीर आजाराचा धोका, तज्ज्ञांचा दावा

काळजी वाढली! कोरोना विषाणूपासून वाचलेल्या लोकांना 'या' गंभीर आजाराचा धोका, तज्ज्ञांचा दावा

Next

कोरोना व्हायरसची लस किंवा औषध आत्तापर्यंत तयार झालेली नाही. पण सध्या कोरोना व्हायरसच्या संक्रमणाबाबत एक नवीन माहिती समोर येत आहे. त्यानुसार कोरोना व्हायरसच्या जाळ्यातून बाहेर आल्यानंतरही तुम्हाला आजारांचा सामना करावा लागू शकतो. तज्ज्ञांनी केलेल्या दाव्याप्रमाणे कोरोना व्हायरसपासून बचाव झाल्यानंतरही तुम्हाला वेगवेगळ्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो. 

डायबिटीसच्या आजाराचा धोका 

ब्रिटेनच्या किंग्स कॉलेज लंडनच्या स्टेफनी ए. एमिल यांचे म्हणणे आहे की, आत्तापर्यंत करण्यात आलेल्या संशोधनानुसार कोविड 19 आणि डायबिटीस यांमध्ये द्विपक्षीय संबंध आहे. न्यू इंग्लँड जर्नल ऑफ मेडिसिनमध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या शोधानुसार कोरोना व्हायरसने संक्रमित असलेल्या व्यक्तीला डायबिटीसचा धोका असू शकतो. तसंच पचनक्रियेत बिघाड झाल्यामुळे गंभीर आजारांचा सामना कराव लागू शकतो. कोरोना व्हायरसचा डायबिटिसवर कसा परिणाम करतो. याबाबत माहिती स्पष्ट करण्यात आलेली नाही.

तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार डायबिटीस असलेल्या रुग्णांना कोरोनाचं संक्रमण झाल्यास मृत्यूचा धोका अधिक असतो. कोविड19 मृत्यू झालेल्या २० ते ३० टक्के रुग्ण डायबिटीसने ग्रासलेले आहेत. कोरोना व्हायरसशी जोडलेले आणि मानवी शरीरात शिरकाव करण्याासाठी अनुकूल ठरणारे एसीई-2 प्रोटीन फक्त फुफ्फुसांमध्येच नाही तर लहान आतडे, किडनी अशा  शरीरातील इतर अवयांमध्ये सुद्धा असतात. 

तज्ज्ञांनी सांगितले की, यामुळे व्हायरसमुळे  ग्लुकोजच्या पचनशक्तीत बिघाड होऊ शकतो. परिणामी डायबिटीसने ग्रासलेल्या लोकांच्या समस्येत वाढ होण्याची शक्यता आहे किंवा इतर आजारही त्या माध्यामातून उत्पन्न होऊ शकतात. किंग्स कॉलेज लंडनमधील मेटाबॉलिक सर्जरीचे प्रोफेसर फ्रांसेस्को रुबिनो यांनी सांगितले की, सध्याच्या जीवनशैलीत लोकांना सर्वाधिक डायबिटीसचा धोका असतो. त्यात आता कोरोनाच्या माहामारीचा शिरकाव झाल्याने चिंतेत वाढ झाली आहे.

दिलासादायक! भारतात 'या' ३ औषधांनी होणार कोरोना रुग्णांचे उपचार; शासनाची मंजूरी

खुशखबर! 'या' आजाराच्या लसीने कोरोना विषाणूंचा होणार खात्मा; टळू शकतो मृत्यूचा धोका

Web Title: CoronaVirus News : Now coronavirus may get you diabetes for lifetime

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.