CoronaVirus : आजारी असूनही लक्षणं नसलेल्या रुग्णांवर कोरोनाचा 'असा' होतोय परिणाम, वेळीच सावध व्हा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2020 02:14 PM2020-08-09T14:14:37+5:302020-08-09T14:17:43+5:30
कोरोनाची लक्षणं नसलेल्या रुग्णांमुळेही संक्रमण पसरण्याचा धोका जास्त असतो.
कोरोना माहामारीच्या संकटात संपूर्ण देश आहे. कोरोनाच्या संक्रमणाचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. सकारात्मक बाब म्हणजे मोठ्या संख्येनं लोक कोरोनाच्या संक्रमणातून बाहेर येत आहेत. तरी मृतांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. अशात कोरोना विषाणूंच्या संक्रमणाबाबत धक्कादायक माहिती समोर येत आहे. कोरोनाची लक्षणं नसलेल्या रुग्णांमुळेही संक्रमण पसरण्याचा धोका जास्त असतो. दक्षिण कोरियामध्ये करण्यात आलेल्या अभ्यासात दिसून आलं की लक्षणं नसलेल्या कोरोना रुग्णांच्या घश्यात, नाकात आणि फुफ्फुसांमध्ये कोरोनाचं संक्रमण झालेलं असतं.
दक्षिण कोरियात लक्षणं नसलेल्या रुग्णांवर करण्यात आलेला हा अभ्यास JAMA Internal Medicine मध्ये प्रकाशित करण्यात आला आहे. आजारी लोकांच्या शरीरात व्हायरस जितकावेळ जीवंत असतो. तेव्हढाच वेळ लक्षणं नसलेल्या रुग्णांच्या शरीरातही अस्तित्वात असतो. न्यूयॉर्क टाईम्सच्या रिपोर्टनुसार हाँगकाँग विद्यापिठातील माहामारी विशेषज्ञ बेंजामिन कॉलिंग यांनी दिलेल्या माहितीनुसार निश्चितपणे हा अभ्यास महत्वपूर्ण आहे. अमेरिकेतील Tufts University तील वायरोलॉजिस्ट मार्टा गागलिया यांनी सांगितले की, लक्षणं दिसत नसलेले लोक लक्षणं असलेल्या लोकांच्या तुलनेत किती प्रमाणत इतरांना संक्रमित करू शकतील याबाबत कोणतेही माहिती मिळालेली नाही.
तज्ज्ञ सांगतात लक्षणं नसलेले लोक कमी प्रमाणात शिंकतात किंवा खोकतात. त्यामुळे व्हायरस पसरण्याची शक्यता कमी असते. गागलिया यांनी दिलेल्या माहितीनुसार लक्षणं दिसत असलेले लोक आपल्या घरी किंवा रुग्णालयात आयसोलेट होतात. पण लक्षणं नसलेल्या रुग्णांचे फिरणं सुरू असते. ऑफिस किंवा इतर ठिकाणी जाताना संक्रमणाचा धोका जास्त असतो. त्यामुळे इतर लोक आजारी पडण्याची शक्यता जास्त असते.
या संशोधनादरम्यान दक्षिण कोरियात ६ मार्च ते २६ मार्च दरम्यान १९३ लक्षणं असलेल्या आणि ११० लक्षणं नसलेल्या रुग्णांचे नमुने तपासण्यात आले होते. ११० लक्षणं नसलेल्या रुग्णांपैकी ८९ लोकांमध्ये नंतरही लक्षणं दिसून आली नव्हती. उर्वरित २१ लोकांमध्ये काही कालावधीनंतर लक्षणं दिसून आली. या संशोधनासाठी तरूणांना सहभाग अधिक प्रमाणात होता.
हे पण वाचा-
पावसाळ्यात वाढताहेत सर्दी, खोकल्याच्या समस्या; बचावासाठी आयुष मंत्रालयानं सांगितले 'हे' उपाय
लढ्याला यश! कोरोनाला नष्ट करण्यासाठी 'चमत्कारीक लस' तयार; 'या' देशातील तज्ज्ञांचा दावा
युद्ध जिंकणार! कोरोनाचं नवीन औषध 'एविप्टाडील' आलं; फक्त ४ दिवसात प्रभावी ठरणार, तज्ज्ञांचा दावा
CoronaVaccine : सीरम इन्स्टिट्यूटसोबत बिल गेट्स यांचा मोठा करार; 10 कोटी डोस गरिबांना देणार