लढ्याला यश! अमेरिकेची कोरोना लस प्रभावी; इम्युनिटीत ५ टक्क्यांनी वाढ, तज्ज्ञांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2020 03:18 PM2020-08-21T15:18:03+5:302020-08-21T15:22:36+5:30

CoronaVirus News & Latest Updates : अमेरिकेतील कंपनी फायजर आणि जर्मनीची कंपनी बायएनटेककडून तयार करण्यात आलेल्या कोरोनाच्या लसीचे सकारात्मक परिणाम दिसून आले आहेत.

CoronaVirus News : Pfizer biontech coronavirus vaccine fewer side effects than their first | लढ्याला यश! अमेरिकेची कोरोना लस प्रभावी; इम्युनिटीत ५ टक्क्यांनी वाढ, तज्ज्ञांचा दावा

लढ्याला यश! अमेरिकेची कोरोना लस प्रभावी; इम्युनिटीत ५ टक्क्यांनी वाढ, तज्ज्ञांचा दावा

Next

कोरोना व्हायरसनं संपूर्ण जगभरात हाहाकार पसरवला आहे. जगभरातील शास्त्रज्ञ कोरोनाची लस आणि औषध शोधण्यासाठी प्रयत्न करत आहेत. तसंच जागतिक आरोग्य संघटना आणि इतर संस्थांकडून कोरोनापासून बचावासाठी गाईडलाईन्स दिल्या जात आहेत. अमेरिकेतील कंपनी फायजर आणि जर्मनीची कंपनी बायएनटेककडून तयार करण्यात आलेल्या कोरोनाच्या लसीचे सकारात्मक परिणाम दिसून आले आहेत.

याआधीही फायजर कंपनीनं कोरोना लसीबाबत एक माहिती प्रकाशित केली होती. त्यानुसार ट्रायलदरम्यान दिसून आलं की, पहिल्या लसीच्या ट्रायलमध्ये सहभागी असलेल्या लोकांपेक्षा दुसऱ्या लसीच्या चाचणीत सहभागी असलेल्या ५० टक्के स्वयंसेवकांवर लसीचे कोणतेही साईड इफेक्ट्स दिसून आलेले नाहीत. 

डेलीमेलच्या रिपोर्टनुसार कोरोनाची लस तयार करणाऱ्या कंपन्यांनी सांगितले की दुसऱ्या लसीचे सकारात्मक परिणाम दिसून आले आहेत. कारण दुसरी लस रोगप्रतिकारकशक्ती चांगली बनवण्यासाठी प्रभावी ठरली आहे.  यामुळे स्वयंसेवकांवर कोणतेही साईड इफेक्टस दिसून आलेले नाहीत.  medRxiv.org वर प्रकाशित करण्यात आलेल्या माहतीनुसार कोरोनातून बऱ्या झालेल्या रुग्णांच्या तुलनेत लस दिलेल्या स्वयंसेवकांमध्ये एंटीबॉडीजचं प्रमाण ५ टक्क्यांनी वाढलं होतं.

फायजर लस विकसीत करणारे सिनियक वा प्रसिडेंट विलियम ग्रुबर यांनी दिलेल्या माहितीनुसार शरीराला लस जितक्या प्रमाणात सुट होईल त्या प्रमाणात कार्यक्षमता वाढेल. विलियम ग्रुबर यांनी BNT162b1 (B1) आणि BNT162b2 (B2) या दोन्ही लसी प्रभावी असल्याचं म्हटलं आहे. तसंच त्यांनी सांगितलं की,  त्यामुळे रोगप्रतिकारकशक्ती  वाढण्यास मदत होते. 

चाचणीदरम्यान B1 लस १८ ते ५५ वयोगटातील लोकांना देण्यात आली. त्यानंतर स्वयंसेवकांमध्ये ५० टक्के  सौम्य साईड इफेक्ट्स दिसून आले आहेत. ६५ ते ८५ वर्षांच्या लोकांमध्ये काही प्रमाणात साईड इफेक्ट्स दिसून आले आहेत. दुसरी लस दिल्यानंतर १८ ते ५५ वयोगटातील लोकांमध्ये १६.७  टक्के साईड इफेक्ट्स दिसून आले. ६५ ते ८५ वयोगटातील लोकांवर कोणतेही साईड इफेक्ट्स दिसून आले नाहीत. 

दरम्यान कोरोनाच्या औषधांबाबत भारतातही सकारात्मक माहिती समोर येत आहे. कोरोनाशी लढण्यासाठी प्रभावी ठरत असलेल्या फेव्हिपिराव्हिर (Favipiravir ) औषधाचे उत्पादन आता भारतातही सुरू झाले आहे. देशात अनेक कंपन्यांनी या औषधांच्या उत्पादनाची घोषणा केल्यानंतर आता देशातील सर्वात मोठी फार्मा कंपनी डॉ रेड्डीज यांनीही याचे जेनेरिक व्हर्जन लाँच केले आहे. फेव्हिपिराव्हिरचे जेनेरिक व्हर्जन Avigan भारतात लाँच करण्यात आले  आहे. एव्हिगन कंपनीकडून  १२२ गोळ्यांच्या थेरेपीचं हे पाकिट असणार आहे. २ वर्षांपर्यंत हे औषध टिकू शकेल.

या कंपनीने Favipiravir च्या उत्पादनासाठी FUJIFILM Toyama Chemical सोबत करार केला आहे. कोरोनाचा सामना करण्यासाठी  हे औषध याआधी भारतात MSN ग्रुप, सिप्ला, हेटेरो, ग्लेनमार्क, सन फार्मा, जेनवर्क्ट फार्मा यांनीही जेनेरिक औषध लाँच केले आहे. भारतात फेव्हिपिराव्हिर   हे औषध ३३ रुपयांपासून ७५ रुपये प्रति टॅबलेट किमतीला मिळत आहे. गेल्या आठवड्यात MSN ग्रुपने 'फेव्हिलो' नावाने या औषधाचे सर्वात स्वस्त व्हर्जन लाँच केले होते. सन फार्मा कंपनीने अशी घोषणा केली होती, की भारतात हे औषध ३५ रुपये प्रति टॅबलेटच्या किंमतीने मिळेल. या औषधाची डिलिव्हरी देशातील वेगवेगळ्या ४२ शहरांमध्ये होणार आहे. 

हे पण वाचा-

अरे व्वा! लोकांनी टाकून दिलेल्या मास्कपासून लाखो रुपयांच्या वीटा तयार करतो 'हा' अवलिया

बबड्या चांगला का वाईट ठाऊक नाही, पण...; महाराष्ट्र पोलिसांकडून 'कहानी में ट्विस्ट'

Web Title: CoronaVirus News : Pfizer biontech coronavirus vaccine fewer side effects than their first

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.