सॅनिटायजरमधील 'या' घातक पदार्थांमुळे आरोग्याचं होऊ शकतं मोठं नुकसान; वेळीच सावध व्हा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2020 04:28 PM2020-06-30T16:28:59+5:302020-06-30T16:36:38+5:30

CoronaVirus News : म्हणून गरज असेल तेव्हाच सॅनिटायजरचा वापर करा.

CoronaVirus News : Poisoning from hand sanitizer can causes danger to your health | सॅनिटायजरमधील 'या' घातक पदार्थांमुळे आरोग्याचं होऊ शकतं मोठं नुकसान; वेळीच सावध व्हा

सॅनिटायजरमधील 'या' घातक पदार्थांमुळे आरोग्याचं होऊ शकतं मोठं नुकसान; वेळीच सावध व्हा

Next

चीनच्या वुहान शहरातून पसरलेल्या कोरोना विषाणूमुळे संपूर्ण जगाला जीवघेण्या माहामारीचा सामना करावा लागत आहे. सध्या संपूर्ण जगभरातील तज्ज्ञ कोरोनावर लस किंवा औषध शोधण्यासाठी प्रयत्न करत आहेत. गेल्या ६ महिन्यांपासून जगभरातील लोकांमध्ये भीतीचं वातावरण पसलेलं आहे. जोपर्यंत लस उपलब्ध होत नाही. तोपर्यंत कोरोनापासून बचावासाठी मास्क किंवा सॅनिटायजरचा वापर करण्याचे सर्वच स्तरातून आवाहन केले जात आहे. 

एका रिपोर्टनुसार अमेरिकेतील न्यू मॅक्सिकोमध्ये सॅनिटायजर प्यायल्यामुळे अनेकांना मृत्यूचा सामना करावा लागला आहे. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार सॅनिटायजरमधील मिथेनॉलमुळे तीन लोकांचा मृत्यू झाला आहे तर तीनजण मृत्यूशी झुंज देत आहेत.  या सहा लोकांनी मिथेनॉलयुक्त हँड सॅनिटाजर प्यायले होते किंवा त्यांनी हातांवर या सॅनिटायजरचा अतिप्रमाणात वापर केला असावा. 

मिथेनॉल बेस्ड हँड सॅनिटायजरचे अनेक दुष्परिणाम आहेत. एफडीए (फूड एंड ड्रग एडमिनिस्ट्रेशन) नुसार लोकांना मॅक्सिकोमधील कंपनी एस्किबोचेम एसएने निर्माण केलेल्या ९ प्रकारच्या सॅनिटायजरपासून लांब राहण्याची आवश्यकता आहे. सॅनिटायजरमधील विषारी पदार्थ मेथनॉल असतो. त्यामुळे  उलटी येणं, चक्कर येणं, धुसर दिसणं अशा शारीरिक दुष्परिणामांचा सामना करावा लागू शकतो.

हाताला सॅनिटायजर लावल्यानंतर विषारी पदार्थ त्वचेमार्फत शरीरात गेल्यास समस्या उद्भवू शकतात. त्यासाठी सॅनिटायजरच्या बॉटलवरचे डिस्क्रीप्शन वाचणं गरजेचं आहे. शक्यतो साबण आणि पाणी उपलब्ध असल्यास सॅनिटायजरचा वापर करणं टाळा. २० सेकंदांपर्यंत हात धुवा.  तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार किटाणूंपासून वाचण्यााठी सगळ्यात चांगला उपाय म्हणजे २० सेकंदांपर्यंत हात साबणाने आणि पाण्याने स्वच्छ धुणं, कारण सॅनिटायजरच्या तुलनेत साबणाने हात धुतल्यास पाण्यासोबत जंतू वाहून जातात. 

तुमच्यापैकी अनेकजण सतत सॅनिटायजरचा वापर करत असतील. एका रिसर्चनुसार सतत सॅनिटायजरचा वापर केल्यामुळे किटाणू अल्कोहोलने सहनशील होऊ शकतात. म्हणून गरज असेल तेव्हाच सॅनिटायजरचा वापर करा. तसंच  तुम्ही काहीवेळा पूर्वीच हात धुतले असतील तर सॅनिटायजर लावू नका. 

एकत्र बसून खाणंपिणं पडलं महागात; ९५ लोकांना कोरोनाची लागण!

कोरोना काळातही ऑफिसला जावंच लागत असेल; तर कोरोना संसर्गापासून 'असा' करा बचाव

Web Title: CoronaVirus News : Poisoning from hand sanitizer can causes danger to your health

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.