कोरोनाची माहामारी कधी नष्ट होणार?  'या' ३ पद्धती ठरतील प्रभावी; जाणून घ्या तज्ज्ञांचे मत

By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2020 09:56 AM2020-06-14T09:56:30+5:302020-06-14T09:57:13+5:30

कोरोना व्हायरसचं संक्रमण  सतत वाढत राहिलं. तर लोकांना आपल्या रोगप्रतिकारकशक्तीच्या जोरावर व्हायरसवर मात करावी लागेल.

Coronavirus News : Research says complete lockdown or herd immunity may stop covid infection? | कोरोनाची माहामारी कधी नष्ट होणार?  'या' ३ पद्धती ठरतील प्रभावी; जाणून घ्या तज्ज्ञांचे मत

कोरोनाची माहामारी कधी नष्ट होणार?  'या' ३ पद्धती ठरतील प्रभावी; जाणून घ्या तज्ज्ञांचे मत

Next

कोरोना व्हायरसचं वाढतं संक्रमण संपूर्ण जगासाठी चिंतेचा विषय ठरलेलं आहे.  कोरोनाचं वाढतं सक्रमण रोखणं ही संपूर्ण जगासाठी आव्हानात्मक गोष्ट आहे. आतापर्यंत अनेक देशातील शास्त्रज्ञ कोरोनाच्या लसीच्या पहिल्या टप्प्यातील यशस्वी चाचणीनंतर पुढील टप्प्यातील संशोधन करत आहेत. कोरोनापासून बचावासाठी मास्क, सोशल डिस्टेंसिंग या गोष्टी महत्वाच्याा असून आता मॅसाचुसेट्स इंस्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी (MIT) ने कोरोनाशी जोडलेल्या ताज्या वृत्तानुसार कोरोनाला रोखण्यासाठी तीन उपाय सांगितले आहेत. 

कोरोना व्हायरसरपासून बचावासाठी आत्तापर्यंत सगळ्यात प्रभावी उपाय समोर आले आहेत. त्यातील पहिला उपाय म्हणजे सोशल डिस्टेंसिंगचं पालन करणं. तसंच संक्रमणाला रोखण्याासाठी कोरोना चाचण्या करणं सुद्धा आवश्यक आहे. त्यामुळे कोरोना व्हायरस पसरण्याचा वेग कमी होऊ शकतो. कोरोनापासून सुटका मिळवण्यासाठी लसीची आवश्यकता आहे. जगभरातील वैज्ञानिक लस शोधण्यााच्या प्रयत्नात आहेत. पण लस तयार होण्यासाठी वर्षभराचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. हर्ड इम्युनिटी लसीचा वापर कोरोनाा रोखण्यासाठी प्रभावी ठरू शकतो.

तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार कोरोना व्हायरसचं संक्रमण  सतत वाढत राहिलं. तर लोकांना आपल्या रोगप्रतिकारकशक्तीच्या जोरावर व्हायरसवर मात करावी लागेल. रोगप्रतिकारकशक्ती जास्त असलेल्या लोकांची संख्या जास्त असेल तर व्हायरसचं संक्रमण पसरू शकत नाही. 

कोरोना व्हायरसचं संक्रमण रोखता आलं नाही तर एका वर्षाच्या आत जगभरातील ६० टक्के लोकसंख्या संक्रमित होऊ शकते. अशा स्थितीत लोकांमध्ये हर्ड इम्युनिटीचा विकास व्हायला सुरूवात होईल. पण लसीशिवाय असलेली हर्ड इम्युनिटी लोकांच्या आरोग्यासाठी सुरक्षित मानली जात नाही. तोपर्यंत व्हायरसला हरवण्यासाठी मास्क, सोशल डिस्टेंसिंग, स्वच्छता आणि नियमांचे पालन या गोष्टींनी कोरोनापासून बचाव होऊ शकतो.

Coronavirus : नवा खुलासा! सर्दी-खोकल्याआधीही दिसू लागतात कोरोनाची 'ही' लक्षणे, वेळीच व्हा सावध!

Coronavirus : वैज्ञानिकांचा दावा; कोरोनासोबत लढण्यासाठी सद्या टीबीची लस सर्वात प्रभावी, पण का?

Web Title: Coronavirus News : Research says complete lockdown or herd immunity may stop covid infection?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.