CoronaVirus News: 'या' व्यक्तींना कोरोनाचा कमी धोका; वाचून तुम्हालाही बसेल आश्चर्याचा धक्का
By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2021 02:59 PM2021-04-26T14:59:35+5:302021-04-26T15:03:03+5:30
CoronaVirus News: सीएसआयआरचं देशभरात सीरो सर्वेक्षण; कोरोनाच्या प्रादुर्भावाबद्दलची महत्त्वाची माहिती समोर
देशातील कोरोना रुग्णांचा दिवसागणिक वाढ होत आहे. गेल्या ५ दिवसांपासून देशात दररोज ३ लाखांहून अधिक नव्या रुग्णांची नोंद होत आहे. कोरोनामुळे दर दिवशी २ हजारांपेक्षा अधिक जण मृत्यूमुखी पडत आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासकीय पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. मात्र कोरोना वेगानं हातपाय पसरत असल्यानं यंत्रणा कमी पडू लागली आहे. कोरोनापासून बचाव करण्यासाठी काय करायचं, कोरोनाचा सर्वात कमी धोका कोणाला, असे प्रश्न अनेकांना पडला आहे. या प्रश्नाचं उत्तर एका सर्वेक्षणातून मिळालं आहे.
कडक सॅल्यूट! कोरोनामुळे एकुलता एक मुलगा गमावला; 15 लाखांची FD मोडून दाम्पत्य करतंय रुग्णांची सेवा
वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेनं (सीएसआयआर) संपूर्ण देशात सीरो सर्वेक्षण केलं. देशातील किती व्यक्तींच्या शरीरात अँटीबॉडीज आहेत याची चाचपणी करण्यासाठी हे सर्वेक्षण करण्यात आलं. कोरोनापासून बचाव करण्याची क्षमता किती लोकसंख्येमध्ये आहे याची पडताळणी, हा सर्वेक्षणमागचा प्रमुख उद्देश होता. या सर्वेक्षणानुसार, धूम्रपान करणाऱ्या, शाकाहारी पदार्थ खाणाऱ्यांमधील सीरो पॉझिटिव्हिटी कमी आढळून आली. याशिवाय ओ रक्तगट असलेल्या व्यक्तींना कोरोनाचा होण्याचा धोका कमी असल्याचं दिसून आलं.
"तीन प्रकारात विभागला 'डबल म्यूटेंट' व्हायरस", जाणून घ्या संपूर्ण माहिती...
वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेनं केलेल्या सर्वेक्षणात शहरी आणि निमशहरी भागांचा समावेश आहे. सीएसआयआरच्या देशभरातील ४० हून अधिक केंद्रांमध्ये करण्यात आलेल्या सर्वेक्षणात १० हजार ४२७ व्यक्ती आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांचा तपशील घेण्यात आला. या व्यक्तींनी स्वेच्छेनं सर्वेक्षणात सहभाग घेतला. सीएसआयआरचे १४० शास्त्रज्ञ आणि चिकित्सक सर्वेक्षण प्रक्रियेचा भाग होते.
धूम्रपान करणाऱ्या व्यक्तींना कोरोनाचा धोका कमी असल्याची आश्चर्यजनक माहिती सीरो सर्वेक्षणातून समोर आली. पण धूम्रपान आणि निकोटिनचा प्रभाव समजून घेण्यासाठी अधिक संशोधनाची आवश्यकता असल्याची सावध भूमिका सीएसआयआरनं घेतली. शाकाहारी जेवणावर अधिक भर देणाऱ्या व्यक्तींची रोगप्रतिकारशक्ती जास्त असते. त्यामुळे कोरोनापासून बचाव होतो. ओ रक्तगटाच्या व्यक्तींना कोरोनाचा धोका कमी असतो. तर बी आणि एबी रक्तगटाच्या व्यक्तींना कोरोनाचा जास्त धोका असतो, अशी माहिती सर्वेक्षणातून समोर आली आहे.