CoronaVirus News: धूम्रपान करणाऱ्यांना कोरोनामुळे मृत्यूचा किती धोका?; WHOनं दिली महत्त्वाची माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2021 10:04 AM2021-05-30T10:04:51+5:302021-05-30T10:05:36+5:30
CoronaVirus News: ‘डब्ल्यूएचओ’च्या महासंचालकांची माहिती, तंबाखूमुक्त वातावरणासाठी मोहीम
नवी दिल्ली : तुम्ही धूम्रपान करीत असाल तर ही बातमी तुम्हाला निराश करू शकते. धूम्रपान करणाऱ्यांना कोरोनामुळे गंभीर आजार आणि मृत्यू होण्याचा ५० टक्के अधिक धोका असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) म्हटले आहे. अशा व्यक्तींना कर्करोगासह हृदयरोगाचाही जास्त धोका असल्याने धूम्रपान सोडणे हाच उपाय असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक डॉ. टेड्रोस घेब्रेयसूस यांनी सांगितले. ‘डब्ल्यूएचओ’ने धूम्रपान सोडण्यासाठी मोहीम सुरू केली आहे. त्यासाठी एक किट तयार केली असून, केवळ पाच महिन्यांमध्येच सुमारे १ अब्ज लोकांना ती उपलब्ध करण्यात आली आहे. ही एक पंचवार्षिक मोहीम आहे. या मोहिमेबाबत डॉ. घेब्रेयसूस यांनी म्हटले आहे, की तंबाखुमुक्त वातावरणाची निर्मिती करण्यासाठी मोहिमेत सर्व देशांनी सहभागी होण्याचे आवाहन आम्ही करत आहोत.
जगभरात सुमारे ३९ टक्के पुरुष आणि ९ टक्के महिला धूम्रपान करतात
युरोपमध्ये सर्वाधिक २६ टक्के नागरिकांमध्ये धूम्रपानाचे प्रमाण