CoronaVirus: चिंताजनक! भारतात आढळला दक्षिण आफ्रिकेतील कोरोनाचा स्ट्रेन; दिल्लीत समोर आला पहिला रुग्ण

By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2021 12:31 PM2021-03-17T12:31:26+5:302021-03-17T12:44:50+5:30

CoronaVirus News & Latest Updates : एलएनजेपी रुग्णालयात दाखल केलेल्या 33 वर्षीय संक्रमित व्यक्तीमध्ये 'दक्षिण आफ्रिकेचा स्ट्रेन' सापडला आहे.

CoronaVirus News: South african strain of coronavirus revealed in india | CoronaVirus: चिंताजनक! भारतात आढळला दक्षिण आफ्रिकेतील कोरोनाचा स्ट्रेन; दिल्लीत समोर आला पहिला रुग्ण

CoronaVirus: चिंताजनक! भारतात आढळला दक्षिण आफ्रिकेतील कोरोनाचा स्ट्रेन; दिल्लीत समोर आला पहिला रुग्ण

googlenewsNext

भारतात कोरोना संक्रमितांचा आकडा 1 कोटी 14 लाख 38 हजार 646 वर पोहोचला असून नुकत्याच समोर आलेल्या माहितीनुसार राजधानी दिल्लीत दक्षिण आफ्रिकेतील कोरोनाच्या स्ट्रेनच्या  संक्रमित रुग्णांची संख्या  वाढत आहे. देशभरात कोरोना संसर्गाची प्रकरणे मोठ्या प्रमाणात दिसून येत आहेत. दरम्यान, राजधानी दिल्लीत कोरोना विषाणूचे नवीन स्ट्रेन पसरल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. राजधानी दिल्लीत 'दक्षिण आफ्रिकेच्या स्ट्रेनच्या संसर्गाच्या पहिल्या प्रकरणाची पुष्टी झाली आहे. मंगळवारी  समोर आले री, एलएनजेपी रुग्णालयात दाखल केलेल्या 33 वर्षीय संक्रमित व्यक्तीमध्ये 'दक्षिण आफ्रिकेचा स्ट्रेन' सापडला आहे.

असे सांगितले जात आहे की कोरोना संसर्गाच्या या नवीन स्ट्रेनने संक्रमित झालेल्या व्यक्तीला आठवड्यापूर्वी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, तेथे त्याला स्वतंत्रपणे ठेवले गेले. तपासणीत त्या व्यक्तीला कोरोना व्हायरसच्या 'दक्षिण आफ्रिकन स्ट्रेन संक्रमित असल्याचे आढळले. यापूर्वी या संक्रमित व्यक्तीमध्ये कोणत्याही प्रकारची लक्षणे दिसली नव्हती, परंतु आता त्याची प्रकृती खूप गंभीर असल्याचे सांगितले जात आहे.

जगभरात 12 कोटी 11 लाख 64 हजाराहून अधिक लोकांना कोरोना संसर्ग झाला आहे. त्याचवेळी कोरोनाच्या संसर्गामुळे 26 लाख 79 हजार 841 लोकांचा मृत्यू झाला आहे. सद्यस्थितीत 20 दशलक्ष 22 हजारांहून अधिक लोकांना कोरोना संसर्गाची लागण झाली आहे, ज्यांचा उपचार केला जात आहे. त्याचवेळी 9 कोटी 76 लाख 61 हजार 975 लोक कोरोना संसर्गाने बरे झाले आहेत.

 दिवसाला फक्त १ केळी खाल्यानं वजन कमी होण्यासह मिळतात हे फायदे; या प्रकारचं केळं सगळ्यात जास्त गुणकारी

त्याचबरोबर भारतात कोरोना संक्रमणाने संक्रमित झालेल्यांची संख्या 1 कोटी 14 लाख 38 हजार 464 च्या वर गेली आहे.  देशभरात कोरोना संसर्गामुळे 1 लाख 59 हजार 79 लोकांचा मृत्यू झाला आहे. सध्या देशभरात 2 लाख 36 हजारांहून अधिक कोरोना बाधित लोकांवर उपचार सुरू आहेत. त्याच वेळी, 10 कोटी 43 हजार 377 पेक्षा जास्त लोक कोरोना संसर्गामुळे बरे झाले आहेत. 

फ्रान्समध्ये आढळला कोरोनाचा नवा स्ट्रेन

फ्रांसमध्ये कोरोनाचा नवा स्ट्रेन समोर आला अूसन त्या ठिकाणच्या आरोग्य मंत्र्यांनी सोमवारी कोरोनाचा नवा स्ट्रेन पसरल्याची माहिती दिली. सुरूवातीच्या विश्लेषणातून दिसून आलं की, कोरोनाचा नवा स्ट्रेन आधीच्या स्ट्रेनच्या तुलनेत जास्त संक्रामक असून गंभीर स्वरूपाचं संक्रमण या व्हायरसच्या माध्यमातून पसरू शकतं. लानियन रुग्णालयात कोरोनाचा हा नवा स्ट्रेन आढळला आहे.  फ्रासच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी सोमवारी सांगितले की, ''कोरोना व्हायरसने बाधित असलेल्या रुग्णांची संख्या मागच्या २४ तासात कमालीची वाढली असून एका दिवसात  ४ हजारांपेक्षा जास्त रुग्ण सापडले आहेत. २०२० मधील एकाच दिवशी सगळ्यात जास्त रुग्णांची संख्या समोर आली आहे.''

Web Title: CoronaVirus News: South african strain of coronavirus revealed in india

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.