CoronaVirus News: ...तर घरात राहूनही तुम्हाला कोरोनाचा धोका; तज्ज्ञांनी दिला मोलाचा सल्ला
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2021 08:19 IST2021-06-10T08:15:59+5:302021-06-10T08:19:05+5:30
CoronaVirus News: संशोधनातून महत्त्वाची माहिती समोर; धोका टाळण्यासाठी तज्ज्ञांनी दिला मोलाचा सल्ला

CoronaVirus News: ...तर घरात राहूनही तुम्हाला कोरोनाचा धोका; तज्ज्ञांनी दिला मोलाचा सल्ला
वॉशिंग्टन: देशात आलेली कोरोनाची दुसरी लाट ओसरली आहे. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात देशात दररोज ४ लाखांहून अधिक कोरोना रुग्णांची नोंद व्हायची. आता हाच आकडा १ लाखाच्या खाली आला आहे. त्यामुळे काहीसा दिलासा मिळाला आहे. मात्र कोरोनाची तिसरी लाट येऊ नये यासाठी काळजी घेणं गरजेचं आहे. कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्यानं निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. त्यामुळे अनेक जण घराबाहेर पडत आहेत. काही जण अजूनही खबरदारीचा उपाय म्हणून बाहेर पडणं टाळतात. मात्र घरात असतानाही काळजी घेणं गरजेचं आहे.
चिंताजनक! डेल्टा व्हेरिअंटचे लस घेतलेल्यांनाही संक्रमण; AIIMS च्या अभ्यासात गंभीर बाब समोर
घरांमध्ये किंवा बंद खोल्यांमध्ये मास्क लावल्याशिवाय बोलल्यानं, संवाद साधल्यानं कोरोना विषाणूचा फैलाव होण्याची शक्यता सर्वाधिक आहे. एका संशोधनातून ही बाब समोर आली आहे. बोलताना तोंडातून विविध आकाराचे थेंब बाहेर पडतात. यामुळे विविध प्रमाणात विषाणू पसरू शकतो. 'कित्येक मिनिटं हवेत राहू शकणारे मध्यम आकाराचे थेंब सर्वाधिक चिंताजनक आहेत. हवेच्या प्रवाहामुळे हे थेंब बऱ्यापैकी दूरवर पोहोचतात,' अशी माहिती संशोधकांनी दिली.
जॉगिंग करताना मास्क वापरणं योग्य की अयोग्य? पाहा तज्ज्ञ काय सांगतायत
जेव्हा लोक बोलतात, तेव्हा त्यांच्या तोंडातून थुंकीचे असंख्य थेंब बाहेर पडतात याची कल्पना आपल्या सर्वांना आहे. हे थेंब आपल्याला सर्वसामान्यपणे दिसत नाहीत, असं अमेरिकेच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डायबीटिज अँड डायजेस्टिव्ह अँड किडनी डिजीजेसच्या ऍड्रियन बेक्स यांनी सांगितलं. 'बोलताना तोंडातून निघत असलेल्या विषाणूयुक्त थेंबांतून जेव्हा पाणी वाफ होऊन निघतं, तेव्हा ते धुराप्रमाणे कित्येक मिनिटं हवेत तरंगू शकतं. त्यामुळे इतरांना असलेला धोका वाढतो,' असं बेक्स यांनी सांगितलं.
घरात, बंद खोल्यांमध्ये होणारा कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी मास्क वापरण्याचा सल्ला संशोधकांनी दिला आहे. 'आपण घरांमध्ये जेवतो. त्यावेळी आपण एकमेकांशी संवाद साधतो. यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्यास मदत होते. याच कारणामुळे रेस्टॉरंट, हॉटेल, कॅफे यासारखी ठिकाणं कोरोना प्रसाराचं केंद्र ठरली होती,' अशी माहिती संशोधन अहवालाच्या लेखकांनी दिली. हा संशोधन अहवाल मंगळवारी 'इंटर्नल मेडिसिन'मध्ये प्रकाशित झाला.