CoronaVirus News : चिंताजनक! ट्रिपल म्यूटेंट कोरोना स्ट्रेनचा महाराष्ट्रात शिरकाव; कितीपत जीवघेणा ठरणार? जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2021 07:40 PM2021-04-21T19:40:35+5:302021-04-21T19:50:06+5:30

CoronaVirus News : महाराष्ट्रात समोर आलेल्या कोरोना रुग्णांपैकी ६० टक्के रुग्ण या नवीन स्ट्रेननं संक्रमित आहेत. या नवीन स्ट्रेनं नाव B.1.618 वैरिएंट नाव देण्यात आलं आहे.

CoronaVirus News : Triple mutant coronavirus b1618 reported in india | CoronaVirus News : चिंताजनक! ट्रिपल म्यूटेंट कोरोना स्ट्रेनचा महाराष्ट्रात शिरकाव; कितीपत जीवघेणा ठरणार? जाणून घ्या

CoronaVirus News : चिंताजनक! ट्रिपल म्यूटेंट कोरोना स्ट्रेनचा महाराष्ट्रात शिरकाव; कितीपत जीवघेणा ठरणार? जाणून घ्या

Next

भारतात कोरोना व्हायरसच्या नवीन स्ट्रेननं शिरकाव केला आहे. विशेष म्हणजे हा ट्रिपल म्यूटेंट स्ट्रेन असल्याचं सांगितलं जात आहे. महाराष्ट्रात समोर आलेल्या कोरोना रुग्णांपैकी ६० टक्के रुग्ण या नवीन स्ट्रेननं संक्रमित आहेत. या नवीन स्ट्रेनं नाव B.1.618 नाव देण्यात आलं आहे. याआधीच्या डबल म्यूटेंट स्ट्रेनला B.1.61७ असं नाव देण्यात आलं होतं. डॉ. विनोग स्कारिया यांनी ट्विट करत यााबाबत अधिक माहिती दिली आहे. 

डबल म्युटंट व्हेरिएंटमध्ये आणखी एक म्युटेशन झाल्यानं त्याचं रुपांतर ट्रिपल म्युटंटमध्ये झाल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाला देण्यात आली होती. डबल म्युटंट व्हेरिएंटच्या स्पाईक प्रोटिनमध्ये तिसरं म्युटेशन झालं आहे. महाराष्ट्र, दिल्ली, पश्चिम बंगाल, छत्तीसगडमधून घेण्यात आलेल्या नमुन्यांमध्ये नवं म्युटेशन दिसून आलं आहे. सध्या या राज्यांमध्ये कोरोनाची दुसरी लाट आली असून कोरोना रुग्णांची संख्या झपाट्यानं वाढत आहे.

डबल म्युटेंट व्हेरिएंट आधीपेक्षा जास्त धोकादायक

नॅशनल सेंटर फॉर डिजीज कंट्रोलनं (NCDC) काही महिन्यांपूर्वीच डबल म्युटंट व्हेरिएंटची माहिती दिली होती. या व्हेरिएंटला शास्त्रज्ञांनी B.1.167 नाव दिलं होतं. यामध्ये दोन प्रकारचे (E484Q आणि L452R) म्युटेशन्स आहेत. हा कोरोनाचा असा विषाणू आहे, ज्यामध्ये दोनवेळा बदल झाला आहे. विषाणू स्वत:ला दीर्घकाळ प्रभावी ठेवण्यासाठी सातत्यानं स्वत:च्या रचनेत बदल करतो. स्वत:चा बचाव करण्यासाठी विषाणू परिस्थितीनुसार स्वत:मध्ये बदल घडवून आणतो. त्यालाच म्युटेशन असं म्हटलं जातं. कोरोना विषाणूचा दुसरा म्युटंट व्हेरिएंट धोकादायक मानला जात होता. त्यात आता ट्रिपल म्युटंट आढळून आल्याच्या शक्यतेनं चिंतेत भर पडली आहे. पहिल्या टप्प्यात 15 दिवसांचा 'कडक' लॉकडाऊन गरजेचा, कॅबिनेटमध्ये चर्चा

अशी घ्या खबरदारी 

मास्क लावा, वारंवार हात धुवा अथवा सॅनिटायझरचा वापर करा, कुणी खोकत अथवा शिंकत असेल तर त्याच्या पासून योग्य अंतर ठेवा, योग्य शारीरिक अंतर ठेवा, गर्दीच्या ठिकाणी जाण्याचे टाळा, आपल्याला अस्वस्थ वाटत असेल तर घरीच थांबा, आरोग्यासंदर्भात कसल्याही प्रकारची समस्या जाणवत असेल तर तत्काल डॉक्टरांचा सल्ला घ्या. कोरोना लसींची आयात अधिक सुलभ होणार, मोदी सरकार अजून एक मोठा निर्णय घेणार

Web Title: CoronaVirus News : Triple mutant coronavirus b1618 reported in india

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.