चिंताजनक! कोरोनाचा अंत इतक्यात होणार नाही; संयुक्त राष्ट्र प्रमुखांची धोक्याची सुचना
By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2020 07:29 PM2020-09-29T19:29:43+5:302020-09-29T19:34:01+5:30
कोरोनामळे जगभरात तब्बल १० लाख लोकांचा मृत्यू झाल्यानंतर संयुक्त राष्ट्रांनी ही धोक्याची सुचना दिली आहे.
कोरोनाचा प्रसार जगभरात दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोनाची दुसरी आणि तिसरी लाटही येऊ शकते अशी अंदाज तज्ज्ञांनी वर्तवला आहे. संयुक्त राष्ट्रांच्या प्रमुखांनी कोरोना व्हायरसच्या संक्रमणाबाबत गंभीर सुचना दिली आहे. संयुक्त राष्ट्राचे सेक्रेटरी जनरल एन्टोनियो गुटेरेस यांनी सांगितले की, कोरोना व्हायरसचा शेवट इतक्यात होणार नाही. कोरोनाच्या संक्रमणामुळे अनेक कुटुंबांमध्ये दुरावा निर्माण झाला आहे. चांगलं जीवन जगणं आणि शोक करणं या दोन्हीही गोष्टी अशक्य झाल्या आहेत.कोरोनामळे जगभरात तब्बल 10 लाख लोकांचा मृत्यू झाल्यानंतर संयुक्त राष्ट्रांनी ही धोक्याची सुचना दिली आहे.
कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 10 लाखांमध्ये पोहोचल्यानं अत्यंत गंभीर स्थिती असल्याचे संयुक्त राष्ट्र प्रमुखांनी सांगितले. की कोरोना संक्रमणामुळे जात असलेल्या नोकऱ्या आणि होणारं नुकसान याचा शेवट कुठेही दिसत नाही. जबाबदार नेतृत्व, विज्ञान यांच्या साहाय्याने माहामारीला नष्ट करता येऊ शकतं. कोरोनाची कोणतीही लस उपलब्ध झाल्यास ती लस सगळ्यांनाच परवडू शकेल अशी असायला हवी. असं मत यांनी यावेळी व्यक्त केले.
दरम्यान महाराष्ट्रातही कोरोनाचा धोका वाढला आहे. राज्यातील एकूण रुग्णांची संख्या ही 13 लाखांवर गेली असून आतापर्यंत 35 हजारांहून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. राज्यात सोमवारी (28 सप्टेंबर) कोरोनाचे 11,921 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 180 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे कोरोनाग्रस्त रुग्णांची एकूण संख्या 13,51,153 वर पोहोचली आहे.
कोरोना लस यशस्वी ठरण्याची गॅरेंटी नाही' WHO च्या प्रमुखांचा इशारा
जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रोस अडनहॅम यांनी मंगळवारी एक धक्कादायक विधान केलं होतं. 'कोविड १९ ज्या ज्या लसींवर काम सुरू आहे. त्या लसी कोरोनावर मात करण्यासाठी यशस्वी ठरतील याची कोणतीही शाश्वती देता येणार नाही.' जागतिक आरोग्य संघटनेच्या बैठकीदरम्यान प्रमुख टेड्रोस अडनहॅम यांनी सांगितले होते की, ''जगभरात ज्या कोरोना लसींवर काम सुरू आहे. त्या लसी प्रत्यक्षात कितपत परिणामकारक ठरतील याची शाश्वती देता येणार नाही.
आतापर्यंत अनेक लसींची पडताळणी जागतिक आरोग्य संघटनेकडून करण्यात आली आहे. लवकरच सुरक्षित आणि प्रभावी लस मिळेल अशी आशा आम्हाला आहे.'' याशिवाय त्यांनी सांगितले होते की, २०० लसींवर सध्या काम सुरू आहे. कोविड १९ च्या अनेक लसी प्री क्लीनिकल टेस्टिंगमध्ये आहे. लस निर्माण प्रक्रियेत काही लसी यशस्वी होतात. तर काहींना अपयशाचा सामना करावा लागतो.