CoronaVirus News : समजून घ्या ‘कोरोना’; ज्येष्ठांसाठी लसीकरण
By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2020 01:23 AM2020-05-19T01:23:48+5:302020-05-19T01:24:17+5:30
CoronaVirus News in Marathi and Live Updates : पुढील लसी ६० वर्षा पुढील व ६० वर्षांखाली मधुमेह, किडनीचे आजार, कॅन्सरचे रुग्ण व आधी कॅन्सरची औषधे घेतलेले ६० वर्षा खालील ज्येष्ठ आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेऊन लसी घेऊ शकतात.
आपल्याला आजवर लहान मुलांसाठी लसीकरण माहीत आहे. पण लसीकरण हे ज्येष्ठांसाठी ही असते याबद्दल कोणाला माहिती नसते. त्यातच कोरोनासारख्या साथीमध्ये या लसीकरणाला वेगळे महत्व आहे. पुढील लसी ६० वर्षा पुढील व ६० वर्षांखाली मधुमेह, किडनीचे आजार, कॅन्सरचे रुग्ण व आधी कॅन्सरची औषधे घेतलेले ६० वर्षा खालील ज्येष्ठ आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेऊन लसी घेऊ शकतात .
या लसी पुढीलप्रमाणे आहेत.
- दरवर्षी फ्लू म्हणजे सर्दी, खोकल्याची लस
- न्यूमोकोकल लस : दोन प्रकारच्या, एकदाच : एक डोस
- टायफॉईड एक डोस
- कावीळ बी - आधी घेतला नसल्यास तीन डोस : पहिला, त्यानंतर १ व सहा महिन्यांनी
- कावीळ ए : २ डोस
- टिटॅनस व डीपथीरीया : टीडी दर १० वर्षांतून एकदा
या लसी घेण्याचे फायदे
वयामुळे कमी झालेल्या प्रतिकारशक्तीमुळे हे जंतुसंसर्ग टळतील. हे आजार कमी झाल्यामुळे कोरोनामुळे तणावाखाली असलेल्या आरोग्य व्यवस्थेवरचा ताण कमी होईल.
कोरोना झाला तर न्यूमोकोकल लसीमुळे त्यासोबत होणाऱ्या बॅक्टेरियल जंतुसंसर्गाची शक्यता कमी होईल.
कुठल्याही आजारानंतर प्रतिकारशक्ती कमी होते व आजारानंतर काही दिवस कोरोनाच नव्हे, तर इतर सर्व व्हायरल आजारांची शक्यता वाढते. लसींमुळे आजार कमी झाल्या मुळे कोरोनाच नव्हे, तर इतर व्हायरल आजारांची जोखीम वाढवणारे घटक कमी होतील.
आजारी रुग्णाला तपासताना व कोरोनाचे निदान करताना लस घेतली असल्याने ‘हे आजार नाही’ हा निष्कर्ष काढणे सोपे जाईल.
- अमोल अन्नदाते
(लेखक बालरोगतज्ज्ञ असून, वैद्यकीय साक्षरतेसाठी कार्यरत आहेत.)