व्हिटामीन्समुळे कमी होत आहे 'या' देशातील कोरोना विषाणूंचे संक्रमण; तज्ज्ञांनी सांगितले मागचं कारण
By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2020 07:40 PM2020-07-23T19:40:46+5:302020-07-23T19:46:26+5:30
काही देशांमध्ये शरीरातील व्हिटामीन डी च्या कमतरतेमुळे लोकांना कोरोना विषाणूच्या संक्रमणचा सामना करावा लागला.
जगभरातील देशांमधील लोकांना कोरोनाच्या संक्रमणाचा सामना करावा लागत आहे. तर अनेक ठिकाणी संक्रमणाचं प्रमाण वाढत आहे. काही देशांमध्ये व्हिटामीन डी मुळे कोरोना व्हायरसचा प्रभाव कमी होत आहे. म्हणजचे कोरोना व्हायरस कमी नुकसानकारक ठरत आहे. तर काही देशांमध्ये शरीरातील व्हिटामीन डी च्या कमतरतेमुळे लोकांना कोरोना विषाणूच्या संक्रमणचा सामना करावा लागला. नॉर्वे, डेनमार्क, फिनलँड, स्वीडन या देशांमध्ये व्हिटामीन डी लोकांसाठी सुरक्षा कवच ठरले आहे. व्हिटामीनमुळे कोरोना व्हायरसच्या संक्रमणाचं प्रमाण कमी झालं आहे.
तसंच कोरोनामुळे होत असलेल्या मृत्यूंची संख्याही कमी झाली आहे. कारण लोकांच्या शरीरात व्हिटामीन डी पुरेश्या प्रमाणात आहे. युरोपीय तज्ज्ञांनी केलेल्या संशोधनातून ही माहिती समोर आली आहे. आरयरिश मेडिकल जर्नलमध्ये हा रिपोर्ट प्रकाशित करण्यात आला आहे. यातून संशोधकांनी दावा केला आहे की, व्हिटामीन डी ची कमतरता असलेल्या लोकांमध्ये कोरोनाचं संक्रमण मोठ्या प्रमाणात झाले आहे.
व्हिटामीन डी ची कमतरता स्पेन, फ्रान्स, इटली, अमेरिका, चीन या देशातील लोकांमध्ये आढळून येते. म्हणून लाखोंच्या संख्येने लोक कोरोना संक्रमणाचे शिकार झाले आहेत. व्हिटामीन डी ची कमतरता असलेल्या देशांमध्ये कोरोनाचं संक्रमण वेगाने पसरलं आहे. तज्ज्ञांनी युरोपीय देशातील लोकांच्या शरीरातील व्हिटामीन डी चे अध्ययन करून १९९९ चा डेटा घेऊन त्याबाबत विश्लेषण केले. व्हिटामीन डी आणि कोरोनामुळे होत असलेले मृत्यू यांतील संबंधांचा अभ्यास करण्यात आला होता. व्हिटामीन डी च्या कमतरतेमुळे आशियाई देशात, ब्रिटनमध्ये तसंच अमेरिकेत मोठ्या संख्येने लोकांचा मृत्यू झाला आहे.
नॉर्वे, फिनलँड आणि स्वीडनच्या भौगोलिक स्थितीमुळे त्या ठिकाणी अल्ट्रा वायलेट किरणं कमी प्रमाणात पोहोचतात व्हिटामीन डी चं प्रमुख स्त्रोत सुर्यप्रकाश आणि दुग्धजन्य पदार्थ आहे. व्हिटामीन डी ची कमतरता पूर्ण करण्यासाठी लोक दुग्धजन्य पदार्थांचा आहारात समावेश करतात. तज्ज्ञांना दिसून आले की भारत, चीन, उत्तरेकडील अनेक देशात सुरूवातीला हिवाळ्याचं वातावरण होतं. संक्रमणाापासून बचाव करण्यासाठी लॉकडाऊन करण्यात आलं. लोकांच्या सतत घरात राहण्यामुळे व्हिटामीन डी ची कमतरता जाणवायला सुरूवात झाली.
दिलासादायक! अखेर 'या' देशात पुढच्या महिन्यापासून सर्वसामान्यांना दिली जाणार कोरोनाची लस
आदार पूनावाला म्हणतात, भारतात 'एवढ्या' रुपयांत मिळणार कोरोना लस; जाणून घ्या किंमत