ज्या व्यक्तीला भेटलात तीच व्यक्ती कोरोना पॉझिटीव्ह आल्यास; संक्रमणापासून कसा कराल बचाव?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2020 09:44 AM2020-07-19T09:44:27+5:302020-07-19T09:51:14+5:30

CoronaVirus News & Latest: जर तुम्ही एखाद्या व्यक्तीच्या संपर्कात आलात आणि तिच व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह निघाल्यास  घाबरून न जाता परिस्थितीपासून कसा बचाव करायचा याबाबत काही गोष्टी सांगण्यात आल्या आहेत.

CoronaVirus News : What to do if you get exposed to a covid 19 positive | ज्या व्यक्तीला भेटलात तीच व्यक्ती कोरोना पॉझिटीव्ह आल्यास; संक्रमणापासून कसा कराल बचाव?

ज्या व्यक्तीला भेटलात तीच व्यक्ती कोरोना पॉझिटीव्ह आल्यास; संक्रमणापासून कसा कराल बचाव?

googlenewsNext

देशभरात कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. कोरोना रुग्णांच्या संख्येत भारत आता तिसऱ्या क्रमांकावर आहे. अमेरिका आणि ब्राझिल हे देश कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येत सगळ्यात पुढे आहेत. कोरोनाला हरवण्यासाठी सरकारने दिलेल्या गाईडलाईन्सचं पालन करायला हवं.  कोरोना व्हायरसचा वाढता प्रसार रोखण्यासाठी सीडीसीने काही गाईडनाईन्स दिल्या आहेत. जर तुम्ही एखाद्या व्यक्तीच्या संपर्कात आलात आणि तिच व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह निघाल्यास  घाबरून न जाता परिस्थितीपासून कसा बचाव करायचा याबाबत काही गोष्टी सांगण्यात आल्या आहेत.

जर तुम्ही एखाद्या व्यक्तीच्या संपर्कात आलात ती व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह असेल आणि त्याबाबत  त्या व्यक्तीलाही कल्पना नाही असं होण्याची शक्यता असते. पण काही दिवसांनी त्या व्यक्तीने चाचणी केल्यास कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यास तुम्ही घाबरून न जाता स्वत:ला क्वारंटाईन करून घ्या. १४ दिवस तुम्ही तुमच्या कुटुंबापासून स्वतःला वेगळं ठेवणं फायदेशीर ठरेल. घरीच क्वारंटाईन होत असाल तर स्वतः एका वेगळ्या खोलित ठेवा. या १४ दिवसात तुम्हाला प्रकृतीकडे अधिक लक्ष देता येईल.

या दरम्यान तुमच्या कुटुंबातील व्यक्तींकडून  जेवणं, पाणी, काढा घेताना दरवाज्यातूनच द्यायला सांगा. सोशल डिस्टेंसिंगवर लक्ष ठेवा. ताण तणावमुक्त राहण्यासाठी पुस्तकं वाचा, मेडीटेशन करा, व्यायाम करा.  १० दिवस स्वतःची काम स्वतः करा. कोणाशीही जवळून संपर्क साधू नका. या १४ दिवसात गरम पाणी, काढा प्या. शक्यतो रोगप्रतिकारकशक्ती वाढवत असलेल्या पदार्थांचा आहारात समावेश करा. 

या १४ दिवसात तुम्हाला खोकला, सर्दी, श्वास घ्यायला त्रास होणं, ताप, थकवा येणं अशी लक्षणं दिसून आल्यास लगेच डॉक्टरांशी संपर्क करा. तुमची रोगप्रतिकारकशक्ती चांगली असल्यास हा आजार जास्त तीव्रतेने तुम्हाला उद्भवणार नाही. जरी रिपोर्ट पॉझिटिव्ह आला तरी तुम्हाला मानसिकदृष्या बळकट राहणं फायद्यांच ठरू शकतं. त्यासाठी शांतीने आणि हिम्मतीने संकटाचा सामना करा.

त्वचेवरचे 'ते' डाग असू शकतात कोविड 19 चे लक्षणं; कोरोना संसर्ग झाल्यास जाणवतो असा त्रास

कोरोना विषाणूंचा रहस्यमय हल्ला; वेगवेगळं राहत असूनही ३५ दिवसात ५७ लोकांना कोरोनाची लागण

Web Title: CoronaVirus News : What to do if you get exposed to a covid 19 positive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.