WHO चा दणका! आता चीनची पोलखोल होणार; तज्ज्ञांनी शोधलं कोरोना विषाणूच्या प्रसाराचं मुळ
By ऑनलाइन लोकमत | Published: August 4, 2020 01:06 PM2020-08-04T13:06:09+5:302020-08-04T13:12:00+5:30
CoronaVirus News :आता व्हायरसच्या उत्पत्तीबाबत अधिक माहिती मिळवण्यासाठी चीनच्या वुहान शहरातून अभ्यासाला सुरूवात करण्यात येणार आहे
कोरोना व्हायरसच्या प्रसाराचे मुळ शोधून काढण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेनं आपली शोधप्रक्रिया सुरू केली आहे. जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रोस एडनॉम गेब्रियेसस यांनी एका परिषदेदरम्यान दिलेल्या माहितीनुसार चीनमध्ये गेलेल्या जागतिक आरोग्य संघटनेच्या तज्ज्ञांनी कोरोना व्हायरसच्या उत्पत्तीबाबत माहिती गोळा केली आहे. आता व्हायरसच्या उत्पत्तीबाबत अधिक माहिती मिळवण्यासाठी चीनच्या वुहान शहरातून अभ्यासाला सुरूवात करण्यात येणार आहे.
काही चीनी वैज्ञानिक जागतिक आरोग्य संघटनेच्या शास्त्रज्ञांची मदत करत आहेत. हा जीवघेणा व्हायरस निर्माण कसा झाला. माणसांकडून पसरला किंवा प्राण्यांमार्फत याबाबत संशोधन केलं जात आहे. जागतिक आरोग्य संघटनेचे तज्ज्ञ वुहान इंस्टिट्यूट ऑफ वायरोलॉजीचा दौरा करणार नाहीत. त्या ठिकाणाहून व्हायरसचा प्रसार झाला होता असं अनेक देशांतील तज्ज्ञांचे मत आहे.
जागतिक आरोग्य संघटनेचे तज्ज्ञ चीनला गेल्यानंतर नेमंक काय सिद्ध होईल याचा अंदाज लावता येणार नाही. पडताळणीत दिसून आलं की चीनने कोरोना विषाणूंशी निगडीत असलेले काही पुरावे नष्ट केले आहेत. अमेरिकेने कोरोनाची माहामारी सुरू झाल्यापासूनच चीनला दोषी ठरवलं आहे. याशिवाय अमेरिकेने जागतिक आरोग्य संघटनेलाही व्हायरसच्या प्रसाराबाबत जबाबदार ठरवलं आहे. जागतिक आरोग्य संघटनेनं हे आरोप मान्य करण्यास नकार दिला आहे.
दरम्यान कोरोना व्हायरसचा प्रसार सुरु होऊन आता 7 महिन्यांपेक्षा जास्त कालावधी झाला आहे. आपातकालीन बैठकीत कोरोनाच्या वाढत्या प्रसाराबाबत माहिती देण्यात आली. या बैठकीनंतर तज्ज्ञांनी कोरोनाच्या माहामारीचा धोका दीर्घकाळसोबत राहणार असल्याचे सांगितले आहे. कोरोनाच्या संसर्गामुळे जवळपास 6,80,000 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. 1 कोटी 80 लाखांपेक्षा जास्त लोकांना कोरोनाची लागण झाली आहे.
जागतिक आरोग्य संघटनेतील 17 सदस्य आणि 12 सल्लागार यांनी दिलेल्या माहितीनुसार आंतरराष्ट्रीय पातळीवर सार्वजनिक आरोग्यविषयक आणीबाणीत या माहामारीचा समावेश झाला आहे. अनेक देशांनी कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी लॉकडाऊन केलं होतं. सगळेच क्षेत्र बंद असल्यामुळे अनेक देशांच्या अर्थव्यवस्थेवर तणाव पडला आहे.
चिंताजनक! आता कोरोना विषाणू दीर्घकाळ पाठ सोडणार नाही; WHO ची धोक्याची सुचना
पावसाळ्यात चुकूनही करू नका 'या' पदार्थांचे सेवन; रोगप्रतिकारकशक्ती होईल कमी, वेळीच सावध व्हा