चिंताजनक! दर आठवड्याला कोरोनाच्या रुग्णांमध्ये १० टक्क्यांनी होतेय वाढ; WHO चा धोक्याचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2021 01:11 PM2021-03-21T13:11:22+5:302021-03-21T13:22:55+5:30

CoronaVirus News : आता ५० लाखांपेक्षा जास्त केसेस समोर आल्याचं दिसून येत आहे. फेब्रुवारीमध्ये या आकड्यांमध्ये घट होऊन २५ लाखांवर संख्या पोहोचली होती. 

CoronaVirus News : Who says corona cases increases 10 percent every week | चिंताजनक! दर आठवड्याला कोरोनाच्या रुग्णांमध्ये १० टक्क्यांनी होतेय वाढ; WHO चा धोक्याचा इशारा

चिंताजनक! दर आठवड्याला कोरोनाच्या रुग्णांमध्ये १० टक्क्यांनी होतेय वाढ; WHO चा धोक्याचा इशारा

Next

जागतिक आरोग्य संघटनेनं (डब्ल्यूएचओ) दिलेल्या माहितीनुसार जगभरात कोरोनाच्या केसेसमध्ये १० टक्क्यांनी वाढ होत  आहे. सगळ्यात जास्त रुग्णसंख्या अमेरिका आणि युरोपात आहे. जागतिक माहामारीविषयी बुधवारी प्रकाशित केलेल्या आकडेवारीनुसार जानेवारीच्या सुरूवातीला या माहामारीचं स्वरूप तीव्र नव्हतं. पण आता ५० लाखांपेक्षा जास्त केसेस समोर आल्याचं दिसून येत आहे. फेब्रुवारीमध्ये या आकड्यांमध्ये घट होऊन २५ लाखांवर संख्या पोहोचली होती. 

जागतिक स्तरावर वाढतोय कोरोनाचा धोका

संयुक्त राष्ट्रांच्या आरोग्य एजन्सीने अधोरेखित केले की संसर्ग दर कमी झाल्यानंतर नवीन प्रकरणांमध्ये वाढ झाल्याचा सलग तिसरा आठवडा होता. जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे की युरोपमध्ये नवीन प्रकरणांमध्ये सहा टक्के वाढ झाली आहे, तर मृतांची संख्या सातत्याने कमी होत आहे. 

डब्ल्यूएचओच्या अहवालानुसार सर्वाधिक प्रकरणे फ्रान्स, इटली आणि पोलंडमध्ये आहेत. युरोपियन देशांमध्ये प्रकरणे वाढली आहेत, दरम्यानच्या काळात डझनापेक्षा जास्त देशांनी एक्स्ट्राजेनकाची कोरोना लस आणण्यास तात्पुरती बंदी घातली आहे. या लसीमुळे रक्त गोठण्यासंबंधी माहिती समोर आल्यानंतर या देशांनी हे पाऊल उचलले. दरम्यान कोणत्या देशात आतापर्यंत किती कोरोना रुग्णांची नोंद झालीये हे खालील आकडेवारीतून स्पष्ट होईल.

अमेरिका -2,93,99,832

ब्राजील -1,14,39,558

भारत -1,13,33,728

रशिया - 43,31,396

यूके -42,67,015

फ्रांस -41,05,527

इटली -32,01,838

स्पेन – 31,83,704

तुर्की -28,66,012

जर्मनी -25, 69,86o4

दरम्यान  देशातील पाच राज्यांत काेराेनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत असून, नवीन 80 टक्के रुग्णांची नाेंद झाली आहे.  देशातील सक्रिय रुग्ण वाढण्यामागे महाराष्ट्र, केरळ आणि पंजाब या राज्यातील रुग्णसंख्या कारणीभूत आहे. देशातील सक्रिय रुग्णांच्या संख्येत या राज्यांतील रुग्णांचे प्रमाण 76.48 टक्के इतके आहे. त्यामुळे पुन्हा एकदा केंद्र सरकारसह त्या - त्या ठिकाणचे राज्य सरकारही सतर्क झाले असून, त्यांनी कठोर निर्बंधांची प्रक्रिया हाती घेतली आहे. आता आणखी काळजी घ्यावी लागणार! किडनीवर हल्ला करतोय कोरोना व्हायरस; संशोधनातून मोठा खुलासा

देशात दैनंदिन रुग्णसंख्या वाढीस महाराष्ट्र, पंजाब, कर्नाटक, गुजरात आणि छत्तीसगड या राज्यांतील संसर्ग कारणीभूत आहे. देशातील दैनंदिन रुग्णसंख्येत त्यांचे प्रमाण तब्बल ८०.६३ टक्के इतके आहे. राज्यात सलग दोन दिवस २५ हजारांहून अधिक रुग्णांची नोंद झाली, तर पंजाबमध्ये २ हजार ३६९, केरळमध्ये १ हजार ८९९ इतके रुग्ण आढळले. सध्या देशात २ लाख ७१ हजार २८२ रुग्ण उपचाराधीन आहेत. तब्बल ५ वर्ष माणसांच्या शरीरात लपून होता हा व्हायरस; आता पुन्हा वेगानं होतंय संक्रमण, ९ रूग्णांचा मृत्यू

Web Title: CoronaVirus News : Who says corona cases increases 10 percent every week

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.